Translate

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

कथा... तिजोरीतील सोन्याची अन् 'लाखमोला'च्या भंगारवाल्याची!

'तो' भंगारचा माल घेणारा साधा माणूस. त्याच्याकडे भंगारात दोन कपाटे आली, त्यांच्यासाठी लगेच गिऱ्हाईकही मिळाले. गिऱ्हाईकाला विकण्यापूर्वी सहजच म्हणून त्याने कपाट तपासले, तर तिजोरीत एक कापडी पिशवी मिळाली. त्यात होते किलोपेक्षाही जास्त वजनाचे सोन्याचे दागिने. त्याने दागिन्यांची पिशवी उचलली आणि जशीच्या तशी मूळ मालकाकडे सोपवली. त्याची बक्षिशी म्हणून मूळ मालकाने या व्यावसायिकाला पाचशे रुपयांची बक्षिशी दिली!
अशी ही कथा आहे, घरी चालत आलेला लाखोंचा पण फुटकचा ऐवज नाकारणाऱ्या 'लाखमोला'च्या भंगारवाल्याची. त्यांचे नाव सुभाष वडवराव! मूळचे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजापूरचे. सध्या ते पुण्यात शिवाजीनगर परिसरात राहतात. ते गेली २५ वर्षे पुण्यात दारोदार फिरून हातगाडीवर भंगार माल गोळा करतात. शिवाय ओळखीच्या कोणी बोलवले तर तेथे जाऊन भंगार विकत घेतात. अशाच प्रकारे गेल्या २२ डिसेंबरला त्यांना बांधकाम व्यावसायिक रमण निरगुडकर यांचा फोन आला. हिराबाग परिसरातील त्यांच्या परिचयाचे श्रीराम पेंडसे यांच्या घरी काही भंगार माल असल्याचे त्यांनी वडवराव यांनी सांगितले. त्यानुसार वडवराव पेंडसे यांच्या घरी गेले. पेंडसे यांच्याकडे आजीची दोन जुनी कपाटे होती. ती प्रत्येकी एक हजार रुपयाला विकत घेतली.
ही कपाटे विकत घेतल्यावर वडवराव यांना पुण्यात प्रभात रस्त्यावर त्या कपाटांसाठी गिऱ्हाईक मिळाले. ते देण्याआधी कपाट तपासून पाहावे तेव्हा त्यात एक कापडी पिशवी होती. ती उघडली तर ती पिशवी भरून सोन्याचे दागिने होते. त्यांचे वजन एक किलोपेक्षा जास्त होते. ही पिशवी मिळताच वडवराव यांनी लगेचच ते निरगुडकर यांना कळवले. मग निरगुडकर आणि वडवराव हे पेंडसे यांच्या घरी गेले आणि त्यांना सोन्याची पिशवी परत केली. त्या वेळी पेंडसे यांनी वडवराव यांचे आभार मानले आणि त्यांना पाचशे रुपयांची बक्षिशी दिली.
या प्रामाणिकपणासाठी रोटरी क्लब ऑफ अपटाऊन यांच्यातर्फे नुकताच सुभाष वडवराव यांचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

''सुभाष वडवराव आणि माझी गेल्या दहा वर्षांपासून ओळख आहे. माझी बांधकामाची कामे असतात. तिथे अनेकदा भंगार असते. ते घेऊन जाण्यासाठी मी वडवराव याला सांगतो. आताही तसेच झाले, हिराबागेजवळील साठे कॉलनीत माझे काम सुरू आहे. त्या वेळी पेंडसे यांनी भंगार आहे, ते द्यायचे असल्याचे सांगितले. म्हणून मी वडवरावला सांगितलं होते. त्याच्या या कृत्यातून त्याचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला.''
- रमण निरगुडकर, बांधकाम व्यावसायिक

स्वच्छ भारत ????


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. स्वच्छता हा विषय देशाच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला ही स्वागतार्ह बाब झाली. स्वच्छता, साफसफाई ही फक्त दलितांनीच का करावी, असा सवाल महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व समाजाला विचारला आणि जातिव्यवस्थेला हादरा दिला. गांधीजींच्या विचारांनी अनेक कार्यकर्ते प्रभावित झाले आणि त्यांनी सार्वजनिक स्वच्छता हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवला. स्वच्छतेचे व्रत स्वीकारले. मात्र नरेंद्र मोदी यांच्या अभिनयामुळे लोकांना स्वच्छतेचा उपदेश देणारे आणि केवळ उपचार म्हणून हातात झाडूsam05 धरणारे अ‍ॅम्बॅसिडर्स तयार झाले. नरेंद्र मोदी यांनी 'झाडू'ला प्रतिष्ठा दिली खरी, पण वर्षांनुवर्षे सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांबाबत, त्यांच्या परिस्थितीबाबत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत चकार शब्दही उच्चारला नाही.


आज आपल्या देशातील जातिव्यवस्था पूर्वीपेक्षा खिळखिळी झाली आहे हे जरी खरे असले तरी काही क्षेत्रांत ती अजूनही पाय घट्ट रोवून उभी आहे. त्यातील एक ठळक क्षेत्र म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेचे काम. संपूर्ण भारतात सफाई कामगार म्हणून काम करणारे लोक हे प्रामुख्याने दलित समाजातील पाच-सहा विशिष्ट जातींमधीलच आहेत असे दिसून येते. ''सफाई क्षेत्रात जवळजवळ शंभर टक्के कामगार दलित समाजातीलच का? आम्हालाही सफाई कामगार म्हणून नोकरी द्या'' अशी मागणी दलितेतर संघटनांनी, समाजविभागांनी केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. या बाबीची आपण नोंद घ्यायला हवी. मुंबई महानगरपालिकेत सुमारे २८ हजार सफाई कामगार कायमस्वरूपाच्या नोकरीत आहेत. त्यांपैकी सरासरी ३०० कामगार दरवर्षी आजारपणामुळे मृत्यू पावतात. मृत्युमुखी पडणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांचा आकडा यात धरलेला नाही. कारण प्रशासनाकडे त्याची नोंदच नाही.
कंत्राटी कामगार कायद्यात आता 'सुधारणा' केली गेली आहे. एखाद्या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या ५० किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला लायसन्स घेण्याची गरज नाही, ही ती सुधारणा. आजपर्यंत ही मर्यादा २० कामगारांपर्यंत होती. म्हणजे जोपर्यंत कामगारांची संख्या २० किंवा त्यापेक्षा कमी असेल तोपर्यंत कंत्राटदारावर लायसन्स घेण्याचे बंधन नाही. कामगार संख्येबरोबर अजून एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे कंत्राटदाराने 'समान कामाला समान पगार' दिला पाहिजे. ही लायसन्ससाठी असलेली अट पूर्ण केली जात आहे की नाही हे तपासण्याचे काम कामगार आयुक्त कार्यालयाचे आहे. कंत्राटदाराने ही अट पाळली तरच त्याला लायसन्स दिले जावे, असे कायदा म्हणतो. पण प्रत्यक्षात ही अट पाळली जात नाही. पण आता फडणवीस सरकारने यातही बदल केला आहे. कंत्राटदाराने अर्ज केल्यापासून तीन दिवसांच्या आत जर त्याला लायसन्स दिले गेले नाही तर ते 'प्राप्त झाले' असे समजावे, असा बदल त्यांनी सुचविला आहे.
कामगार कायद्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका कायमच करीत असते. २००४ साली मुंबई महानगरपालिकेने ३०० कंत्राटदारांना सफाई कामासाठी नेमले आणि प्रत्येकाला फक्त १८ सफाई कामगार नेमण्याची परवानगी दिली. म्हणजे महानगरपालिकेत पाच हजारांहून जास्त कंत्राटी सफाई कामगार काम करू लागले. मात्र लायसन्ससाठी २० कामगारांपेक्षा जास्त संख्येची अट असल्यामुळे या कंत्राटदारांना लायसन्स घ्यावे लागले नाही आणि आपोआपच 'समान कामाला समान पगार' या अटीतून कंत्राटदार आणि महानगरपालिका मुक्त झाले. मुंबई महानगरपालिकेनेच कायद्यातील ही पळवाट कंत्राटदारांना दाखवली. सर्वप्रथम ही पळवाट चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशात जन्माला आल्यामुळे तिला 'हैदराबाद पॅटर्न' असे नाव दिले गेले आहे.
कंत्राटी सफाई कामगारांना आपले हक्क मागता येऊ नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक नामी युक्ती शोधून काढली. सफाईचे काम करणारे कामगार हे 'कामगार' नसून 'स्वयंसेवक' आहेत आणि त्यांना कामावर ठेवणारे हे 'कंत्राटदार' नसून 'स्वयंसेवी संस्था' आहेत, असे महानगरपालिकेने टेंडरमध्येच नमूद करून ठेवले आहे. या कामगारांना 'स्वयंसेवक' म्हटल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, बोनस, समान पगार आणि कायम नोकरी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक कंत्राटी कामगाराला किमान वेतनापेक्षा दोन हजार रुपये कमी मासिक वेतन मिळत असे. 'मला पगार कमी का देता?' असा प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कामावरून काढले जात असे. सध्या प्रत्येक शहरातील नगरपालिका, महानगरपालिका येथे राज्यकर्त्यांनी कंत्राटी पद्धत आणली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपापल्या ताकदीप्रमाणे वशिले लावून 'आपले' कंत्राटदार नेमले आहेत. २००३ साली नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी रामराव तुकाराम पाटील या कंत्राटदाराने एकाच दिवशी १८० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले. कारण या सर्व कामगारांनी नाशिक महानगरपालिकेकडे किमान वेतनाची मागणी केली म्हणून. या कामगारांनी दोन वर्षे मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना परत नोकरीवर जाता आले. पण या कामगारांना नाशिक पालिका प्रशासन, कामगार आयुक्त कार्यालय आणि राज्य सरकार यांच्याकडून काहीही मदत झाली नाही. 
आजही सोलापूर, नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर, जळगाव अशा सर्व नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये किमान वेतनापेक्षा कमी पगारावर सफाई कामगार काम करीत आहेत. नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येही किमान वेतनापेक्षा कमी वेतन कामगारांना मिळते. राजकोट महानगरपालिकेत 'सखी मंडळ' असे गोंडस नाव देऊन महिला सफाई कामगारांना अत्यंत अल्प पगारावर राबवले जात आहे. नरेंद्र मोदी सध्या ज्या वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या वाराणसीत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात सफाई कामगारांना कायद्याबाहेर ठेवण्याची एक नामी युक्ती वापरली जात आहे. तेथील नगरविकास खात्याने 'संविधा कामगार' असा नवीन शब्द शोधला आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक महानगरपालिकेने २०० ते १००० पर्यंत संविधा कामगार कामावर ठेवले आहेत. प्रत्येक संविधा कामगाराने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक ठरावीक अर्ज केलेला आहे. त्या अर्जातील मुद्दे असे- ''मी संविधा कामगार म्हणून काम करण्यास तयार आहे, मला सरकारने ठरविलेले 'मानधन' मान्य आहे. मी पगारवाढीची आणि कायम नोकरीची मागणी करणार नाही. माझे काम चालू ठेवण्याचा किंवा बंद करण्याचा संपूर्ण अधिकार प्रशासनाचा असेल. याबाबत माझी कोणतीही तक्रार असणार नाही.'' उत्तर प्रदेश सरकारचे सफाई कामगारांसाठीचे किमान वेतन दर दिवशी रु. १८० आहे. पण सरकारच्या आदेशानुसार या संविधा कामगारांना मात्र दर दिवशी फक्त रु. १२० मानधन मिळते. 
२००१ साली तामिळनाडू सरकारने एक वटहुकूम काढला की, 'चेन्नई शहरात प्रचंड कचरा साठत आहे, हे आरोग्याला धोकादायक आहे. ही परिस्थिती आणीबाणीची आहे. आणि म्हणून त्यावर मात करण्यासाठी चेन्नई महानगरपालिकेला कायद्यातून सूट दिली जात आहे. पुढील ७ वर्षे येथे कंत्राटी कायदा लागू होणार नाही.' या वटहुकमानुसार चेन्नई महानगरपालिकेने 'ओनेक्स' या फ्रेंच कंपनीला सफाईच्या कामाचे कंत्राट दिले. कायदाच लागू नसल्यामुळे या कंपनीने अत्यंत कमी पगारावर कामगारांकडून काम करून घेतले. आज भारतात काही अपवाद वगळता कंत्राटी सफाई कामगारांना हजेरी कार्ड दिले जात नाही, ओळखपत्र दिले जात नाही, त्यामुळे काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोणीच स्वीकारत नाही, या कामगारांना आठवडय़ाची भरपगारी सुट्टी नाही, वार्षिक हक्काची रजा नाही, फंड नाही, हातात ग्लोव्ह्ज, पायात बूट, तोंडाला मास्क, पावसाळ्यात रेनकोट या सुविधा नाहीत. 
या परिस्थितीला अपवाद आहे तो मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा. या भागांतील कामगारांनी आपल्या संघटना उभारून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष केला, लढे उभारले, प्रसंगी न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या न्याय्य मागण्या मिळविल्या. येथे एका गोष्टीची नोंद करायला हवी की, सफाई खात्यातील कायम कामगारांनी, त्यांच्या संघटनांनी या कंत्राटी कामगारांना साथ दिली नाही. कंत्राटी कामगारांना हा संघर्ष एकाकीपणेच करावा लागला.
सध्याचा कंत्राटी कामगार कायदा हे सांगतो की, जे काम सांविधानिक आहे आणि दररोज चालणारे आहे ते कंत्राटी पद्धतीने करून घेता येणार नाही. असे असताना सरकारच आपला कायदा धाब्यावर बसवून सफाईचे काम कंत्राटावर देत आहे. या कामात दलित कामगारच प्रामुख्याने असल्यामुळे त्यांची पिळवणूक करणे तुलनेने सोपे आहे. कामाच्या स्वरूपामुळे अंगाला सतत येणारी दरुगधी, हाता-पायांना होणारे त्वचारोग, दारूचे व्यसन, निरक्षरता आणि जातिव्यवस्थेमुळे कायम दबून राहून जगण्याची लागलेली सवय या सर्वामुळे हा कंत्राटी कामगार नरकयातना भोगत आहे. त्याचे जीवन फार खडतर आहे.

कामगार कायदे असताना जर ही स्थिती आहे, तर नरेंद्र मोदींनी सुचविलेल्या बदलाप्रमाणे जेव्हा ५० कामगारांपर्यंत कंत्राटदाराला कायद्यातून 'अधिकृतपणे' सूट दिली जाईल तेव्हा कंत्राटी कामगारांची स्थिती कशी होईल? ''कम, मेक इन इंडिया'' असे आवाहन जेव्हा मोदी करतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ''या, भारतात या, आमच्या कामगारांचे श्रम वापरा, त्यांना कमी पैशात घाम गाळायला लावा आणि त्यांच्या जिवावर आमच्या देशातून भरपूर पैसे घेऊन जा.'' 'अच्छे दिन आएँगे' असे म्हणत असताना हे अच्छे दिन कोणासाठी येणार आहेत, याचे उत्तरही आपल्याला मिळायला हवे.
*लेखक लेखक कामगार चळवळीत कार्यरत आहेत. 

इंसान का मांस खाने वाले

पाक: इंसान का मांस खाने वाले भाइयों को 12 साल की सजा

लाहौर: पाक की एक आतंकवाद निरोधक अदालत ने इंसान का ताजा मांस खाने के मामले में 2 भाइयोंं को 12 साल के सश्रम कारावास की सजा सुनाई। इससे पहले भी दोनों भाई 2011 में मांस खाने के मामले में 2 साल की सजा काट चुके हैं। पंजाब प्रांत के सरगोधा जिले की आतंकवाद निरोधक अदालत ने अप्रैल में उनके गिरफ्तार होने के दो महीने बाद फैसला सुनाया। मुहम्मद आसिफ (35) और फरमान अली (30) मियांवाली जिला जेल में अपनी सजा काटेंगे। ये दोनों लाहौर से करीब 400 किलोमीटर दूर स्थित भाखड़ जिले के कस्बे दरयां खान के रहने वाले हैं। उन्हें अपने घर में मृत बच्चे का मांस खाने के आरोप में अप्रैल में दोबारा गिरफ्तार किया गया था। पुलिस के अनुसार, दोनों भाइयों ने वर्ष 2011 में स्थानीय कब्रिस्तान में 100 से अधिक कंकाल खोदकर निकाले और उनका मांस खाया था। पड़ोसियों द्वारा शिकायत करने पर उन्हें गिरफ्तार किया गया था। ये दोनों भाई शादीशुदा हैं लेकिन उनके नरभक्षी होने की बात सामने आने पर उनकी पत्नियों ने उन्हें कथित रूप से छोड़ दिया था।

कागदी फुले

गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकजण आपल्या कलाकृति सादर करत आहेत त्या बघुन मला स्फुर्ती आली. मी आज कागदाची फुले केली. मी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला कि हि करतच असतो.
आपण जी क्रेप कागदाची फुले करत असू, तशीच हि करतो. पण यासाठी मी कॉम्प्यूटरच्या कंटिन्यूअस स्टेशनरीचा कागद वापरतो. मला यासाठी कात्री, गोंद वगैरे काहीच लागत नाही. या पाकळ्या मी हातानेच कागद फाडून बनवतो. आधी मधे एक कपटा चुरगाळून कळीसारखा आकार करुन घेतो, आणि त्याभोवती पाकळ्या रचत जातो. या पाकळ्यांच्या कडा किंचीत गुंडाळून घेतो. तळाशी हातानेच पिळ देत पाकळ्या घट्ट बसवत जातो. शेवटी देठाला, याच कागदाची कडेची पट्टी, गुंडाळून घेतो.

अरे वा, इथे अनेक लोकांना हि फुले करुन बघाविशी वाटताहेत का ?
(करायला घेतल्यावर तूम्हाला नक्कीच असे
जाणवेल, कि हे काम अतिशय सोप्पे आहे.)
पहिल्यांदा कागदाचा एक कपटा चुरगाळुन त्याला खाली रुंद व वरती निमुळता
होत गेलेला आकार द्या. याच्या कडा निमुळत्या टोकाकडे असू द्या, म्हणजे कळीचा
भास होईल.
पाकळ्या शक्यतो हातानेच फाडा. म्हणजे कडा अनियमित होतात, व नैसर्गिक
दिसतात. या पाकळ्या फाडताना, वरुन गोलाकार आणि खाली निमुळत्या आकारात
फाडा. निमुळते टोक जरासे लांब असू द्या, म्हणजे ते टोक, त्या भागात पिळून त्याचा
देठ करता येतो. आतल्या पाकळ्या थोड्या कमी रुंद ठेवा व बाहेरचा थोड्या रुंद ठेवा.

आतली एखाद, दुसरी पाकळी तशीच गुंडाळा, कारण गुलाबाच्या आतल्या पाकळ्य़ा
बाहेर वळलेल्या नसतात. नंतरच्या पाकळ्या गुंडाळण्यापुर्वी, त्याच्या कडा किंचीत
बाहेरच्या बाजूला वळवा.
या पाकळ्या गुंडाळल्यानंतरही, त्यांना हवा तसा आकार देता येतो. पाकळ्या करताना
गुलाबाचे फुल कसे दिसते, ते डोळ्यासमोर ठेवा. एखादी पाकळी मनासारखी नाहीच, जमली
तर काढून टाका. व दुसरी घ्या.
साधारण सहा सात पाकळ्यात फुल पुर्ण होते. शेवटी, या कागदाची कडेची पट्टी देठाला
घट्ट गुंडाळा. मी कागदाशिवाय कुठलेच साधन वापरत नाही, पण जर हिरवा दोरा
गुंडाळता आला, तर फुल मजबूतही होईल आणि जास्त नैसर्गिक दिसेल.

हा कागद शक्यतो पांढराच असतो. याला रंग देण्यासाठी, त्यावर स्प्रे मारता येईल, म्हणजे
आवश्यक ते शेडींगही दिसेल. सगळे फूलच रंगात बुडवले, तरी चालू शकेल.

मी शक्यतो न वापरलेलेच कागद घेतो, त्यामुळे ते टाकाऊतून टिकाऊ या व्याख्येत बसत नाही.
एका बाजूने प्रिंट केलेला कागद वापरला, तर ते जरा विचित्र दिसते. पण प्रॅक्टीससाठी तो
वापरता येईल.
शाळेतल्या क्रेप फुलानंतर मी फुले कधी केली नव्हती. पण एका प्रदर्शनात, मला सुनीता नागपाल
या कलाकार भेटल्या. त्या सॅटिनच्या कापडांना, मेण लावून फुले करत असत (अजूनही असतील)
त्या काळात जाहिरातींसाठी लागणारी, बहुतेक फुले त्या करत असत. माहीमला त्यांचे टेंपल ऑफ़
फ्लॉवर्स नावाचे दुकान होते. मी रस दाखवल्यावर त्यांनी मला त्यांच्या दुकानात बोलावून, ती
पुर्ण प्रक्रिया शिकवली होती. त्यांचे कसब इतके पराकोटीचे होते, कि कुठलेही खरे फुल आणून द्या,
मी तसे खोटे फुल करुन देते, असे त्या म्हणत असत. पण त्यासाठी आकार आणि गोलाकार देण्यासाठी त्या काही खास उपकरणे वापरत असत, त्यामुळे मला स्वतंत्ररित्या तशी फुले करणे, शक्य झाले नाही.

हा प्रकार मात्र मी स्वत: चाळा म्हणून सुरु केला. कागदाच्या कलाकृतीच्या बाबतीत, मला एका
कलाकाराची आवर्जून आठवण येते. त्यांचे नाव बहुदा श्री गोळे किंवा भोळे असे होते. ते कार्ड पेपर
वापरुन कागदांची शिल्प बनवत असत. म्हणजे अगदी मंदिरावर कोरीव काम असते तसे शिल्प.
त्या शिल्पातल्या मानवी आकृत्या देखील ते बनवत असत. त्यासाठी अगदी खसखशीएवढे तुकडे
वापरत असत. या प्रकारात त्यांनी भारतीय तसेच पाश्चात्य शैलीतील शिल्प बनवली होती.
त्यातले बारकावे तर इतके असत, कि ती शिल्प जिवंत वाटत. उदा पाश्चात्य धर्तीच्या शिल्पात
एक तरुण जोडपे, एक कारंजे, झाड, त्यावरचे पक्षी सर्व होते आणि हे सगळे केवळ फुटभर
उंचीचे. एखादा पक्षी जर बोटभर उंचीचा असेल, तर त्याच्या प्रत्येक पिसाचे बारकावे त्यात असत.
नंतर त्यावर ते फेव्हीकॉल स्प्रे करत असत. या कलाकृतींचे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटरमधे
भरले होते, आणि त्यावेळी लोकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. (नेहरु सेंटरच्या इतिहासात हे
पहिल्यांदाच घडले होते.) पण या कलाकाराबद्दल नंतर कुठेच काहि वाचनात आले नाही.
(इथे कुणी आहे का, ज्यांना ते प्रदर्शन आठवतेय ?)
माझ्याकडे इतक्या बारकाव्याने कोरलेली चिनी लाकडी शिल्प पण होती.
या सगळ्या कलाकृतींच्या तूलनेत, हि फुले अगदीच बाळबोध आहे, आणि म्हणुनच, मी या
प्रशंसेला अजिबात पात्र नाही.

तर हे फोटो. आतल्या कळी पासून सुरवात. मग पाकळीचा आकार, वळवलेली पाकळी. मग एकेक पाकळी लावल्यावर ... (आता बघा करुन, नक्कीच जमेल)

'सततच्या टीकेमुळे मेंदू मंदावतो'

जर्कीनऐवजी स्वेटर घेऊन दिले म्हणून पुण्यात अलीकडेच एका निरागस कोवळ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर टीनेजर्सच्या मानसशास्त्राची उकल करणाऱ्या एका संशोधनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 'अकारण होणाऱ्या टीकेमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होऊन सारासारबुद्धीने विचार करण्याची त्यांची क्षमता हरवते. त्यामुळे ज्या घरातली मुले कॉलेजच्या वाटेवर आहेत, त्या घरातल्या पालकांनी अधिक सावध राहायला हवे,' असा इशारा संशोधन अहवालात दिला आहे.
बालपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील पौगंडावस्थेतील मुलांची मानसिक अवस्था दोलायमान असते. त्यामुळे या वयातील मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सतत संघर्षाचे खटके उडत असतात. चारचौघांमध्ये मुलांना घालून-पाडून बोलल्याने मुले पालकांच्या विरोधात बंड पुकारू लागतात. मुले आणि पालकांमधील यामुळे दरी देखील वाढत जाते. आजवरच्या या अनुभवाला आता शास्त्रीयदृष्ट्या जोड मिळाल्याने पालकांच्या अशा वागण्याने मुलांच्या मेंदूत होत असलेल्या उलथापालथी त्यांना कशाप्रकारे नकारात्मकतेकडे नेतात याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्युरोफिजिशियन आणि मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
पौगंडावस्थेतील मुलांमध्ये वाढत असलेल्या नकारात्मकतेवर अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील पिटर्सबर्ग विद्यापीठातील केयुंग हॉ ली यांच्या नेतृत्त्वात कॅलिफोर्निया-ब्रेकिन्ले आणि हॉवर्ड विद्यापीठाने हे संशोधन केले. यात एकूण ३२ मुलांच्या ब्रेनचे मॅपिंग करण्यात आले. यात १४ वर्षांच्या वयोगटातील २२ मुली आणि १० मुलांचा समावेश होता. संशोधकांनी या मुलांच्या मेंदूतील तीन भागांवर आपले लक्ष केंद्रित केले. यासाठी या मुलांना त्यांच्याच पालकांच्या आवाजातील काही संवाद एकविण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की, जेव्हा या मुलांवर त्यांच्याच पालकांनी टीकात्मक भाषा वापरली, तेव्हा या मुलांच्या मेंदूतील एका कप्प्यातील हालचालींमध्ये साधर्म्य आढळले. मेंदुतील हा भाग नकारात्मक विचारसरणीवर प्रभाव टाकतो. ज्यावेळी मुलांनी ही टीका ऐकली, तेव्हा त्यांच्या मेंदूतील दुसऱ्या भागात कसलीही प्रतिक्रिया जाणवली नाही. विशेष म्हणजे हा भाग एखाद्याने दिलेल्या सल्ल्यावर सकारात्मकतेने विचार करतो. मात्र, पालकांनी जेव्हा एखाद्या गोष्टीवरून जाब विचारला असेल, तर या मुलांमध्ये त्यावर सकारात्मकतेने विचारच केला जात नसल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. या वयातली मुले बंडखोरी करतात, ऐकूनच घेत नाहीत, असा पालकांचा तक्रारीचा सूर असतो. मात्र, त्यांच्या अशा वागण्यामागे मेंदूत होणारे हे बदलच कारणीभूत असल्याचे हा अभ्यास म्हणतो. त्यामुळे या वयातल्या मुलांचे मानसशास्त्र व त्यांच्या मेंदूत होणारे बदलही समजून घेण्यास मदत होणार आहे.
अभ्यासकांनी मेंदूच्या ज्या भागावर हे संशोधन केले तो कानाच्या वरचा भाग आकलन शक्तीवर फोकस करतो. वैद्यकीय परिभाषेत याला टेंपरो परायटल जंक्शन म्हणतात. समोरच्या माणसाच्या बोलण्याचा सारासार विवेकबुद्धीने अर्थ लावून हा भाग सकारात्मकतेने विचार करतो. मात्र, या संशोधनात हा भागच डिअॅक्टिव्ह आढळला. त्यामुळेच मुलांमध्ये नकारात्मक आणि बंडखोरी वाढते. यातून पौगंडावस्थेतील मुलांचे मानसशास्त्र समजून घेण्यास मदत होईल.

दमा

'दमा' या शब्दावरूनच यात दम लागतो हे समजू शकते. खरोखरच दम काढणारा असा हा दमा आयुर्वेदातही "महाव्याधी' म्हणजे कठीण रोगांपैकी एक आहे असे सांगितले आहे. दम्याला आयुर्वेदात "श्‍वास' असे म्हटले आहे.
"श्‍वस्‌ जीवने' या मूळ धातूपासून श्‍वास हा शब्द तयार झालेला आहे. ज्या रोगात जीवनावश्‍यक श्‍वसन कष्टाने होते, तो रोग म्हणजे "श्‍वास' होय.
दम्याचे वर्णन करताना सुरवातीलाच आचार्य सांगतात, की श्‍वासावर योग्य उपचार वेळेवर केले गेले नाहीत, तर त्यामुळे हृदय व रस-रक्‍तादी धातूंना अशक्‍तता येते. योग्य औषधे, आवश्‍यक उपचार, उचित आहार-विहार करून दम्याला आटोक्‍यात ठेवले, तर ठीक, नाहीतर संतापलेला साप जसा मृत्यूला कारणीभूत ठरतो, तसाच योग्य उपचार न केला गेलेला दमा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो म्हणून दम्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य औषध असे, की ज्यात खऱ्या अर्थाने दमा बरा करण्याचे सामर्थ्य असते. अर्थातच बरोबरीने खाणे, पिणे, वागणे याचेही पथ्य सांभाळावे लागते.
दमा हा कफ-वातात्मक रोग सांगितलेला आहे, त्यामुळे ज्या ज्या गोष्टींनी कफ व वात असंतुलित होतात, प्रमाणापेक्षा अधिक वाढतात त्या सर्व गोष्टी दम्याला कारणीभूत असतात. यातील काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे -
•धूळ किंवा धुराच्या संपर्कात अधिक काळ राहणे. 
•अति थंड पाणी सेवन करणे. 
•अधिक प्रमाणात व्यायाम करणे. 
•अति मैथुन करणे. 
•जास्त चालणे. 
•सतत कोरडे व निःसत्त्व अन्नपदार्थ खाणे. 
•नियमाविरुद्ध व प्रकृतीला प्रतिकूल अन्नपान करणे. 
•शरीरात आमदोष अति प्रमाणात वाढणे. 
•पोटात सतत वायू साठून राहणे. 
•शरीरात काही कारणाने रुक्षता वाढणे. 
•दीर्घकाळ उपवास करणे किंवा शरीराचे पोषण व्यवस्थित न होणे. 
•मर्मस्थानावर आघात होणे. 
- शीत व उष्ण या दोघांचा शरीराशी एकत्र संबंध येणे. 
- आहारात वाल, उडीद, तिळाचे तेल यांचा अति प्रमाणात समावेश असणे; विदाही म्हणजे पोटात जळजळ करणारे पदार्थ खाणे; पचावयास जड पदार्थ तसेच मासे, खेकडा, डुक्‍कर वगैरे प्राण्यांचे मांस खाणे; दही, निरसे दूध वा इतरही कफवर्धक आहार-विहार करणे या सर्वांमुळे दम्याचा त्रास होतो.

दम्याचे पाच प्रकार आहेत. महाश्‍वास, ऊर्ध्वश्‍वास, छिन्नश्‍वास, क्षुद्रश्‍वास व तमकश्‍वास. यातील पहिले तीन असाध्य होत, कारण ते मृत्यूकाळीच होतात व त्यामुळे त्यावर उपचार करण्याचा प्रसंग सहसा येतच नाही आणि क्वचित उपचार केले तरी फारसा उपयोगही होत नाही.
क्षुद्रश्‍वास आपण अनेकदा अनुभवतो. अधिक शारीरिक श्रमाने लागणारा दम म्हणजे क्षुद्रश्‍वास होय. भरभर चालण्याने, पळण्याने, घाईघाईने जिने चढल्याने काही वेळ श्‍वास घ्यायला व सोडायला जो त्रास होतो तो म्हणजे क्षुद्रश्‍वास. अल्पशी विश्राती हा यावरचा उपाय.
आज आपण ज्याला दमा म्हणून ओळखतो तो म्हणजे तमकश्‍वास. याची सामान्य लक्षणे अशी होत. सर्दी होते, घशात कफ साठल्याने श्‍वासोच्छ्वासाच्या वेळी घुरघुर आवाज येतो, खोकला येतो, खोकल्याची उबळ तीव्र असते; पण छातीत कफ इतका चिकटलेला असतो. खोकून खोकून व्यक्‍ती बेजार होते; पण कफ सुटत नाही. बराच वेळ खोकल्यावर जर थोडा कफ पडला, तर काही वेळापुरते बरे वाटते; पण पुन्हा खोकला येतोच, दम लागतो, बेचैनी वाटते, खूप तहान लागते.
दम लागायला लागला की बोलावयास त्रास होतो. दम्याने त्रस्त मनुष्य आडवा पडू शकत नाही कारण त्यामुळे छातीवर दाब येतो, वेदना होतात, दम अजूनच वाढतो, डोळ्यांवर सूज येते, डोक्‍याला व संपूर्ण अंगाला घाम येतो, काहीतरी गरम घ्यावे किंवा छातीवर शेक घ्यावा अशी इच्छा होते.
बहुधा असा त्रास रात्रीच्या अंतिम प्रहरी म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर एक-दोन तास असताना होतो. पावसाळा, ढगाळ वातावरण, थंडी असताना त्रासाचे प्रमाण वाढते, तसेच कफकारक आहार-विहारानेही त्रास होतो.राग, भय, अतिरिक्‍त ताण यामुळेही दम्याचा त्रास होतो किंवा वाढतो. तमकश्‍वासाचे म्हणजेच दम्याचे दोषानुबंधानुसार दोन प्रकार होतात.
वात-कफदोषाच्या कमी-अधिक प्रमाणावरून त्याचे कफप्रधान तमकश्‍वास व वातप्रधान तमकश्‍वास असे दोन प्रकार करता येतात.
कफप्रधान प्रकारात छातीत कफ अधिक असतो, खोकल्याची ढास त्यामानाने कमी लागते व हा कफ लवकर सुटतो. वातप्रधान प्रकारात मात्र खोकला कोरडा असतो, खूप खोकल्यावर थोडासा कफ सुटतो. हा प्रकार अधिक कष्टकारक असतो. दम्याच्या रोग्यामध्ये वरील कोणत्या प्रकारचा दमा आहे हे सर्वप्रथम ठरवावे लागते, कारण त्यानुसार उपचारांची दिशा बदलते. तमकश्‍वास योग्य प्रयत्नांनी बरा होऊ शकतो. मात्र व्यक्‍ती अत्यंत दुर्बल असेल व रोग खूप वाढलेल्या अवस्थेत असेल तर मात्र असाध्य ठरू शकतो.
दम्यावरचे काही घरगुती उपचार
•दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ, जायपत्री व खडीसाखर समभाग एकत्र करावे. हे अर्धा चमचा मिश्रण मधासह सकाळ, संध्याकाळ घ्यावे. 
•अडुळश्‍याची पाने वाफवून रस काढावा व दोन चमचे रसात चिमूटभर दालचिनीचे चूर्ण टाकून मधासह दिवसातून तीन वेळा घ्यावे. 
•दम्याचा तीव्र वेग असता आल्याचा रस व मध हे मिश्रण वारंवार चाटवावे. 
•दम्याचा तीव्र वेग असता लवंग व वेलची घालून विड्याचे पान चघळून खावे व हळूहळू रस गिळत राहावा. 
•दम्याचा तीव्र वेग असता कोमट तीळ तेलामध्ये थोडेसे मीठ घालून छाती व पोटावर हलक्‍या हाताने चोळावे. संतुलन अभ्यंग तेलाचाही उपयोग होतो. उकळत्या पाण्यात लवंग, तुळशी, ओवा, अक्कलकरा, कापूर यापैकी मिळतील तेवढ्या गोष्टी टाकून वाफारा घ्यावा किंवा निलगिरी वा लवंगाच्या तेलाचा वाफारा घ्यावा. 
•दम लागत असताना रुईच्या पानास तेलाचे बोट लावून तव्यावर गरम करावे व त्याने छाती व पोटाला तेल लावून शेकावे. 
•कपभर पाण्यात थोडे किसलेले आले उकळावे. गाळल्यावर खडीसाखर, चिमूटभर कापूर व थोडा हिंग टाकून गरम असताना घोट घोट प्यावे. याने दम लागायचा कमी होतो. 
•दम्याचा विकार असणाऱ्यांनी गवती चहा, तुळशीची पाने, आले, दालचिनी टाकून केलेला चहा नियमित प्यावा. 
•दम्याचा त्रास असता वर्षभर, विशेषत- त्रास होतो त्या ऋतूत, सकाळी एक कप पाण्यात एक चमचा मध घालून घ्यावा (पाणी गरम नसावे). 
•जेवणात फोडणीमध्ये लसणाचा वापर दम्यासाठी उपयुक्‍त ठरतो. 
•दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पोट हलके व साफ राहील याकडे लक्ष ठेवावे. 
•दम्याचा आवेग कमी करण्यासाठी 8-10 थेंब दालचिनीचे तेल साखरेत मिसळून खावे. 
•आल्याचा रस, विड्याच्या पानाचा रस व मध समप्रमाणात एकत्र करून घ्यावा. 
•लहान मुलांना वेखंड मधात उगाळून चाटण दिल्यास फायदा होतो. 
•दम्यामध्ये धुरीचाही खूप चांगला उपयोग होताना दिसतो. देवदाराची साल, गुग्गुळ, धूप, ओवा, तगरीची सुकवलेली फुले यांची धुरी घेतल्यास किंवा संतुलन टेंडरनेससारख्या धुपाची धुरी घेतल्यास फायदा होतो. 
•डॉक्‍टरांच्या सल्ल्याने प्राणसॅन योग, श्‍वाससॅन, श्‍वासकुठार, श्‍वासचिंतामणी ही औषधे घेता येतात व त्याचाही दम्यावर उत्तम उपयोग होताना दिसतो.

दम्याचे पथ्य-अपथ्य खालीलप्रमाणे होय... 
पथ्य - साठेसाळीचे तांदूळ, साळीच्या लाह्या, कुळीथ, गहू, यव, तूप, मध, जुने मद्य, बकरीचे दूध, परवर, तोंडली, वांगी, चवळईची पालेभाजी, माठ, मसूर, मूग, तूर, द्राक्षे, मनुका, गरम पाणी, लसूण, आले, ओली हळद, आंबेहळद, वेलची, केशर, दालचिनी, लवंग, तमालपत्र, मिरे. 
अपथ्य - मासे, रताळे, सुरण वगैरे कंदमुळे, तांबडा भोपळा, भेंडी, वाल, वाटाणे वगैरे पचावयास जड कडधान्ये, साबुदाणा, मोहरी, अननस, फणस, चिकू, सीताफळ, कैरी, लोणची, दही, थंड पाणी, शीतपेय, रात्रीचे आइस्क्रीम

सफरचंद

अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे... रोज एक सफरचंद खाल्ल्यास सर्व व्याधींपासून दूर राहता येत असल्याने फळांमध्ये सफरचंदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारा महिने सहज उपलब्ध होणाऱ्या सफरचंदासाठी भारतात काश्मीर प्रांत प्रसिद्ध आहे. पण काश्मिर हे सफरचंदाचं उगमस्थान आहे, हा समज चुकीचा असून कॅस्पियन तसेच काळ्या समुदाच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये सफरचंदाची ओळख झाली, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
एका सफरचंदापासून शरीराला एक वाटी कडधान्याच्या तुलनेत जास्त फायबर मिळते. यामुळे दैनंदिन कामासाठी खचीर् पडणारी ऊर्जा भरून निघते. सफरचंदामधील 'पेक्टिन' (क्कद्गष्ह्लद्बठ्ठ) या सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया जलदरित्या होत असल्याने जेवण झाल्यानंतर एक सफरचंद खाण्यात आलंचं पाहिजे. तसेच 'पेक्टिन'मुळे रक्तपेशींमध्ये कोलेस्ट्रॉल वाढीस प्रतिबंध बसत असल्याने हृदयविकाराच्या रुग्णांना हे फळ फायदेशीर आहे. सफरचंदामधील 'बॉरोन' (क्चश्ाह्मश्ाठ्ठ) या घटकामुळे हाडांना मजबूती येण्यास मदत होते, म्हणून भविष्यात संधिवाताचा त्रास उद्भवू नये यासाठी रोज सफरचंद खाल्लच पाहिजे.
या दोन महत्त्वाच्या फायद्यांव्यतिरिक्त सफरचंदामध्ये असणाऱ्या आयर्न, पोटॅशियम, काबोर्हायड्रेट्स. फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, कॅल्शियम तसेच व्हिटॅमीन ए आणि सीचेही असंख्य फायदे आहेत.
सफरचंदाच्या सालीमध्येच (थीन स्कीन) व्हिटॅमीन सीचं प्रमाण जास्त असल्याने ती न काढताच सफरचंद खाल्लं पाहिजे. व्हिटॅमीन सी आणि कॉपरच्या एकत्रितरित्या कामामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत तर होतेच तसेच 'कोलॅजिन' फॉमेर्शनही सहजरित्या होते. विटॅमीन सीमुळे उच्च रक्तदाब, हृदय, डोळे, त्वचा आणि हाडांच्या विकारांवर नियंत्रण ठेवता येतं. मुख्य म्हणजे त्वचा आणि हाडांमध्ये 'कोलॅजिन' या घटकाची निमिर्ती करण्यासाठी या व्हिटॅमीनची भूमिका महत्त्वाची आहे. दात किडणं आणि वारंवार रक्त येत असल्याच्या तक्रारीवर प्रभावी उपचार म्हणून व्हिटॅमीन सी खाण्यात आलं पाहिजे. तसेच वातावरणातील बदलांचा शरीराच्या क्रियाशीलतेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून हे विटॅमीन 'उत्तेजक' म्हणून काम करतं.
डायबिटिक आणि किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हिटॅमीन ए आवश्यक असतं. तसेच त्वचेला चमक येण्यासाठी, दृष्टीमध्ये स्पष्टता आणण्यासाठी आणि दातांच्या बळकटीसाठी या व्हिटॅमीनची गरज असते.
शरीरात पाण्याची पातळी समतोलित ठेवणं, मंेदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि हृद्याच्या ठोक्यांवर उचित नियंत्रण ठेवण्यासाठी पोटॅशियमची नितांत गरज भासत असते. तसेच चामखिळीवर उपचार म्हणून फळांच्या माध्यमातून पोटॅशियम खाणं फायदेशीर ठरतं. हाडांना आणि दातांना मजबूती आणण्याचं काम फक्त कॅल्शियममुळे होत नाही तर फॉस्फरसच्या संगतीमुळे कॅल्शियमचं काम जलद आणि अधिक प्रभावशाली होतं. फॉस्फरसमुळे शरीराला 'फॉस्फेट' हे मिनरल मिळतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडांच्या फॉमेर्शनसाठीही याचा उपयोग होतो. 'नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स'नुसार रोज शरीराला ७०० मिलीग्रॅम फॉस्फरस मिळालं पाहिजे.
आयर्नही सर्वात महत्त्वाचं मिनरल आहे. आयर्नमुळे फुफ्फुसातून ऑक्सिजन इतर अवयवांपर्यंत वाहून नेण्यास मदत होते. ३० टक्के आयर्न शरीरात साठ्याच्या स्वरूपात असते. वेळप्रसंगी गरज पडल्यास या आयर्नचा शरीराला फायदा होतो. आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमिया सारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागण्याची शक्यता असते तसेच ऑक्सिजनचं वितरणंही मंदावतं. फॉलिक अॅसिड आणि आयर्न शरीरात एकत्रितरित्या काम करत असतात. गरोदर महिलांना स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी वाढीसाठी फॉलिक अॅसिड नियमितपणे घेण्याचा सल्ला दिला जातो. 
सफरचंदपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तयार होतात. ते पित्तनाशक, वातनाशक, शीतल, जड, हृदयासाठी हितावह, वीर्यवर्धक आणि पोट व मूत्रपिंड साफ राखणारे आहे. त्यामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा व बी गटातील व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत. कार्बोहायड्रेटचे एक रूप पेक्टीनही यात भरपूर आढळते. मूतखड्याच्या रोग्यांनी रोज पूर्णपणे पिकलेली चार-पाच सफरचंद खावीत. लिव्हरच्या रोग्यांनी जेवणापूर्वी प्रत्येकवेळी दोन ताजी सफरचंद खावीत वा सफरचंदाचा चहा प्यावा. तापात रोग्याला तहान, जळजळ, थकवा, व बैचेनी होत असेल तर सफरचंदाचा चहा वा त्या सफरचंदाचा रस पाजावा. घशात जखम, व्रण असेल वा गिळायला त्रास होत असेल तर उत्तम ताज्या सफरचंदाचा रस घशापर्यंत नेऊन काही वेळ तेथे अडवून ठेवावा. यामुळे आश्चर्यजनक फायदा होतो.

मेंदूचा अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज एक सफरचंद खावे तसेच दुपारच्या वा रात्रीच्या जेवणात कच्च्या सफरचंदाची भाजी खावी. सायंकाळी ग्लासभर सफरचंदाचा रस प्यावा व रात्री झोपण्यापूर्वी एक पिकलेले गोड सफरचंद खावे. यामुळे महिन्याभरातच फरक दिसू लागतो. जुनाट खोकला असेल तर पिकलेल्या सफरचंदाच्या ग्लासभर रसात खडीसाखर मिसळून रोज सकाळी नियमित प्यायल्यास जुनाट खोकलाही बंद होतो. बध्दकोष्ठता नष्ट करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन सफरचंद चावून खावीत यामुळे अग्निमांश नष्ट होऊन भूक वाढते. पोटात गॅस असेल तर गोड सफरचंदात १० ग्रॅम लवंगा टोचून ठेवाव्यात व दहा दिवसांनी लवंगा काढून तीन लवंगा व एक गोड सफरचंद खाण्यास द्यावे. या दरम्यान तांदूळ व तांदळाचे पदार्थ रोग्यास खाण्यास देऊ नये.

केशर

फुलाच्या आतले केशरी-लाल रंगाचे तंतू म्हणजे केशर. केशराचे फूल दिसायला फारच मनमोहक असते. तसेच केशराचा सुगंधही अप्रतिम असतो. खाद्यपदार्थांना रंग व सुगंध यावा यासाठी केशर उत्तम असतेच, पण ते औषधी गुणांनीही परिपूर्ण असते.

केशर चवीला कडू व तिखट असते, गुणाने स्निग्ध असते, डोकेदुखीसाठी उपयुक्‍त असते, उलटी थांबवते, वर्ण उजळवते व तिन्ही दोषांना संतुलित करते.

केशराचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे उपयोग करून घेता येतो.
- लहान मुलांसाठी केशर उत्तम असते. कारण त्यामुळे वारंवार सर्दी, ताप, खोकला होणे टळते तसेच जंतांची प्रवृत्तीही कमी होते. यासाठी दोन चमचे दुधामध्ये केशराच्या दोन काड्या बारीक करून देता येतात.
- पित्त वाढल्यामुळे डोके दुखत असल्यास चंदन उगाळून त्यात चिमूटभर केशर मिसळून तयार केलेला लेप लावण्याचा उपयोग होतो.
- हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर रोज चिमूटभर केशर मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र, बरोबरीने मूळ कारणावर उपचार होणे आवश्‍यक होय.
- अर्धशिशीचा वारंवार त्रास होत असेल, तर चमचाभर तुपात छोटी चिमूट केशरपूड नीट खलून त्याचे डाव्या व उजव्या नाकपुडीत दोन-तीन थेंब नस्य टाकण्याचा उपयोग होताना दिसतो. जुनाट सर्दी असेल, तर त्यावरही वरील प्रकारे केशरयुक्‍त तुपाचे नस्य करण्याचा उपयोग होतो.
- संपूर्ण गर्भारपणात नियमितपणे केशर घेतले तर बाळाची त्वचा सतेज व निरोगी होण्यास मदत मिळते, तसेच योग्य वेळेला कळा सुरू होऊन प्रसूती होण्यास मदत मिळते असा अनुभव आहे.
- दहा वर्षांपेक्षा छोट्या बालकाला जंत होण्याची प्रवृत्ती असेल, तर छोटी चिमूटभर केशराची पूड व तेवढाच कापूर एकत्र करून पाव चमचा मधाबरोबर देण्याचा उपयोग होतो.
- अशाप्रकारे खाद्यपदार्थांना केवळ रंग येण्यासाठीच केशर वापरले जात नसून, त्याच्या अंगी अनेक उत्तम गुणधर्म आहेत. म्हणूनच प्रत्येक स्वयंपाकघरात केशर असणे आणि ते गरजेनुसार योग्य प्रमाणात वापरले जाणे आरोग्यासाठी आवश्‍यक होय.