ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'चार नगरातील माझे विश्व' या आत्मचरित्रासाठी जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जयंत नारळीकर यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात केलेलं काम मोठं तर आहेच, पण या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या साहित्य मुशाफिरीचाही गौरव करण्यात आला आहे. पन्नासहून अधिक देशांत जयंत नारळीकरांचा नैमित्तिक संचार झाला असला तरी वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे असे नारळीकरांच्या जीवनमार्गाचे चार प्रमुख टप्पे आहेत. हा चार नगरातच प्रामुख्याने त्यांच्या जीवनाला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला, त्या आठवणींचा या पुस्तकात समावेश आहे. तसंच कोंकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारसाठी माधवी सरदेसाय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 'मंथन' या लेखसंग्रहासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
Translate
शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४
अमेरिका आणि क्युबा यांच्यात तब्बल ५४ वर्षांनंतर पुन्हा राजनतिक संबंध प्रस्थापित होत असल्याची घोषणा बराक ओबामा यांनी केली आहे. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार असली तरी तो क्युबा वा कॅस्ट्रो यांचा विजय आहे, असेही म्हणता येणार नाही.
१६ एप्रिल १९५९ हा दिवस जागतिक इतिहासास कलाटणी देणारा. त्या दिवशी अमेरिकेतील लिंकन आणि थॉमस जेफरसन स्मृतिस्थळास भेट देणाऱ्यांपकी एक होते फिडेल कॅस्ट्रो. नजीकच्या क्युबा या देशात क्रांती करून सत्ता हाती घेतलेल्या या तरुणाने अमेरिकेस दिलेली ही शेवटची भेट. त्या दिवसानंतर उभय देशांनी परस्परांशी संबंध तोडले आणि तत्कालीन शीतयुद्धास मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा दिली. त्यानंतर नव्याने इतिहास घडला तो बुधवारी. जवळपास ५४ वष्रे आणि या काळातील अमेरिकेचे ११ अध्यक्ष यांना जे जमले नाही ते बराक हुसेन ओबामा यांनी करून दाखवले. अमेरिका आणि क्युबा यांच्यात पुन्हा राजनतिक संबंध प्रस्थापित होत असल्याची घोषणा ओबामा यांनी केली आणि काळ नावाच्या एका अंतहीन ग्रंथातील एक अध्याय संपला. आपण त्याच त्याच गोष्टी करत राहिलो तर वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही, अशा आशयाचे उद्गार ओबामा यांनी हे क्युबाख्यान संपवताना काढले. ते अनेक अर्थानी महत्त्वाचे असून आपला भूतकाळ बिघडवणाऱ्या, वर्तमान घडवणाऱ्या आणि भविष्यास दिशा देणाऱ्या या घटनेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
पन्नासच्या दशकात अमेरिका खंडातील क्युबा या तुलनेने कमी महत्त्वाच्या देशात राज्य होते ते अमेरिकेचे. अर्ल् स्मिथ या क्युबातील अमेरिकी राजदूताने सेनेटसमोर निवेदन करताना काढलेले उद्गार या संदर्भात वास्तव स्पष्ट करणारे आहेत. कॅस्ट्रो यांच्या उदयापूर्वी क्युबात सर्वात सामथ्र्यशाली व्यक्ती असे ती म्हणजे अमेरिकेचा राजदूत. प्रसंगी त्यास खुद्द क्युबाच्या अध्यक्षापेक्षाही अधिक महत्त्व होते, असे या स्मिथ यांनी सोदाहरण नमूद केले होते. अमेरिकी कंपन्या आणि त्यांची आíथक ताकद हा क्युबाच्या व्यवस्थेचा कणा होता आणि जनरल फल्जिनशियो बॅतिस्ता यांची राजवट हा एक विनोद होता. अमेरिकेच्या हातातील बाहुले एवढीच काय ती त्यांची ओळख. या पाश्र्वभूमीवर क्रांतीचे स्वप्न दाखवीत जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे असे म्हणणारे फिडेल कॅस्ट्रो हे क्युबन जनतेत लोकप्रिय होऊ लागले नसते तरच नवल. साम्यवादाचा दुरून दिसणारा डोंगर रम्य भासू लागण्याचा हा काळ. जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे आणि संपत्तीचे वाटप समानच झाले पाहिजे हा उद्घोष करीत साम्यवादी विचारधारा जनमानसास मोहवू लागली होती. उत्तर अमेरिका खंडातील दारिद्रय़ाने पिचलेल्या अनेक देशांतील जनतेच्या डोळ्यांत या साम्यवादी स्वप्नांमुळे एक वेगळीच चमक निर्माण होऊ लागली होती आणि हे स्वप्न सत्यात कसे आणता येईल याबाबत अनेकांचे प्रयत्न सुरू होते. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे फिडेल कॅस्ट्रो. क्युबात क्रांती करावयास हवी या त्यांच्या स्वप्नास आणखी तितकीच स्वप्नाळू साथ मिळाली. ती म्हणजे चे गव्हेरा. जगभरातील आíथक वास्तव बदलू पाहणाऱ्या करोडो तरुणांना आजही ज्याचे आकर्षण वाटते तो चे आणि फिडेल हे १९५५ साली एकमेकांना भेटले. समान विचारधारा बाळगणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले आणि चेने कॅस्ट्रो यांच्या २६ जुल क्रांती गटात सामील होण्याचे मान्य केले. चे हा मूíतमंत डावा होता आणि त्यामुळे क्युबा ही त्याची मायभूमी नसतानाही त्याने क्युबन क्रांतीत सक्रिय सहभाग घेतला. या आधीच्या वर्षी २६ जुल या दिवशी क्रांतिकारकांनी लष्करी तळावर केलेल्या, परंतु फसलेल्या, हल्ल्याच्या गौरवार्थ या डाव्या मंडळींनी आपल्या नावात २६ जुल ही तारीख ठेवली होती. १९५५ साली मेक्सिकोत या गटाची पुन्हा जुळवाजुळव झाली. १९५९ साली बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून पाडण्यात या मंडळींना यश आले. कॅस्ट्रो हे क्युबाचे अध्यक्ष बनले आणि चे गव्हेरा हे मंत्री. सत्ता हाती आल्यानंतर पुढल्याच वर्षी या कॅस्ट्रो यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आíथक र्निबध घातले आणि राजनतिक संबंधही तोडून टाकले.
शीतयुद्धाचा भडका उडण्याची ती नांदी होती. याचे कारण अमेरिकेचा खंडीय शेजारी असूनही कॅस्ट्रो मायभूमीस भांडवलशाहीपासून दूर नेऊ पाहत होते आणि अमेरिकेपेक्षा सोविएत युनियन हा त्यांना अधिक जवळचा वाटू लागला होता. परिणामी अमेरिका आणि सोविएत रशिया या दोन आंतरराष्ट्रीय सांडांच्या संघर्षांत कॅस्ट्रो हे उत्साही प्यादे बनले. वाचाळ वाटावा इतका बोलका स्वभाव, बेदरकार वृत्ती आणि कोणी जर जग बदलणारा असेल तर तो आपणच असे मानण्याचा अस्थायी आगाऊपणा या अंगभूत गुणांमुळे कॅस्ट्रो हे जगभरातील अमेरिकाविरोधाचा चेहरा बनले आणि अमेरिकेसाठी अर्थातच डोकेदुखी. वास्तवात क्युबा आणि कॅस्ट्रो यांच्यात अमेरिकेच्या आíथक साम्राज्यास आव्हान मिळेल इतकी ताकद कधीही नव्हती. परंतु त्यांच्यामागे सोविएत रशिया असल्यामुळे रशियास धडा शिकवण्याचा भाग म्हणून अमेरिका कॅस्ट्रो यांच्या मागे हात धुऊन लागली. त्यातून बे ऑफ पिग्जचे प्रकरण घडले आणि त्यात अमेरिकेचे नाक आणखीनच कापले गेले. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने कॅस्ट्रो यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना रसद पुरवली होती आणि प्रतिक्रांती करून आपण कॅस्ट्रो यांची राजवट उलथून पाडू असा त्यांचा समज होता. तो कॅस्ट्रो यांनी हाणून पाडला. तीन वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर कॅस्ट्रो यांचा विजय झाला आणि अमेरिकेस माघार घ्यावी लागली. पुढच्याच वर्षी सोविएत रशियाने या शीतयुद्धास क्षेपणास्त्रांची फोडणी दिली आणि अमेरिकेच्या विरोधात आंतरखंडीय क्षेपणास्त्रे क्युबाच्या भूमीवर रोवली. शीतयुद्धाचा हा उत्कलन बिंदू होता आणि जग आता तिसऱ्या महायुद्धास सामोरे जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या संहारापासून जग थोडक्यात वाचले. पण अमेरिकेच्या जवळपास प्रत्येक अध्यक्षाने आणि सोविएत रशियाचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने क्युबाच्या निमित्ताने शीतयुद्धाचा दाह वाढवण्याच्या दिशेनेच प्रयत्न केले. या सर्व काळात अमेरिकेचे क्युबावरील र्निबध कायमच होते आणि तरीही कॅस्ट्रो यांच्या केसालाही धक्का लागत नव्हता. क्युबन जनतेने त्यांच्या विरोधात उठाव करावा यासाठीदेखील अमेरिकेने जंगजंग पछाडले. परंतु तरीही काही झाले नाही आणि कॅस्ट्रो यांची राजवट अबाधित राहिली. पुढे १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर शीतयुद्धाची एकतर्फी अखेर झाली आणि क्युबावरील अमेरिकेच्या र्निबधांनाही काही अर्थ राहिला नाही. दरम्यान जिमी कार्टर वा पुढे बिल क्लिंटन यांनी क्युबन जनतेस अमेरिकेत येण्यासाठी उत्तेजन दिले आणि त्याबाबतचे र्निबधही सल केले. तरीही ते पूर्णपणे उठवले जाण्यासाठी २०१४ सालाची अखेर उजाडावी लागली. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार असली तरी तो क्युबा वा कॅस्ट्रो यांचा विजय आहे, असेही म्हणता येणार नाही. सत्ता हाती आल्यानंतर चारच वर्षांत कॅस्ट्रो आणि चे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्याची परिणती चे याने क्युबा सोडण्यात झाली. पुढे तो बोलिव्हियात गेला आणि १९६७ साली त्याला अज्ञात ठिकाणी फाशी देण्यात आले. त्यानंतर ३० वर्षांनी १९९७ साली त्याचे पार्थिव समारंभपूर्वक क्युबात नेण्यात आले आणि सर्व शासकीय इतमामात त्याच्यावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. हा सर्व काळ ज्यांनी घडवला ते फिडेल कॅस्ट्रो यांच्यादेखतच हे सर्व घडत गेले. आज अमेरिकेने क्युबाशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला, त्याचेही ते साक्षीदार आहेत. तेज निर्माण करणारी ज्योत क्षीण झाल्यावर जगण्यात अर्थ राहत नाही, असे कॅस्ट्रो म्हणत. पण तरीही त्यांना जगावे लागत आहे आणि भांडवलशाही म्हणजे जणू शिवी आहे आणि अमेरिका तिचे मूíतमंत प्रतीक हा आयुष्यभराचा सिद्धान्त डोळ्यादेखत ढासळताना पहावे लागत आहे.
हा काळाचा महिमा. अमेरिकेत आज क्युबन्स मोठय़ा प्रमाणावर आहेत आणि त्यांना क्युबाने अमेरिकेशी संघर्ष करण्यात काहीही शहाणपणा वाटत नाही. या बदलत्या जागतिक वातावरणास जागत अमेरिकेने क्युबासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि क्युबाने तो स्वीकारला हेदेखील कॅस्ट्रो यांना पाहावे लागले. हा काव्यात्म न्याय. क्रांतिकार्यातील त्यांचा सहकारी चे गव्हेरा याचे दफन दोन वेळा झाले. अमेरिका आणि क्युबा या देशांतील मत्रीपर्वाच्या निमित्ताने चे गव्हेरा याच्या मरणाचा तिसरा अध्याय सुरू झाला आहे. तोदेखील फिडेल कॅस्ट्रो यांच्या डोळ्यादेखत. क्रांतीची भाषा करणाऱ्या सर्वानीच शिकावा इतका हा धडा मोठा आहे.

'पीके' का पाहाल .........
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पीके' आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विधू विनोद चोप्राची निर्मिती असलेल्या 'पीके'मध्ये संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत आणि बूमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण केली आहे. पण, तरीही जर तुम्हाला शंका असेल की हा चित्रपट पहावा की नाही तर आम्ही तुमच्यासाठी पाच कारणे घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहाल.
पाहा: 'पीके'च्या संवादांसाठी आमिरने घेतलेली मेहनत१. आमिर खान-राजकुमार हिराणीः या दोघांनी यापूर्वी हिट चित्रपट '३ इडियट्स' साठी एकत्र काम केले होते. ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू चालवेल याबाबत काहीच शंका नाही. आमिर आणि राजकुमार हिरानी या जोडगोळीच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटाने एकूण ३९५ कोटींची कमाई क रत विक्रम केला होता. हा विक्रम अजून कोणालाही मोडता आलेला नाही. 'हॅप्पी न्यू इअर'नेही एकूण ३७७ कोटी कमाई केली असली तरी तो 'थ्री इडियट्स'चा विक्रम मोडू शकलेला नाही. आता या जोडीचा दुसरा चित्रपट 'पीके' हा विक्रम मोडणार का? हे लवकरचं कळेल.
आमिरचा लकी 'डिसेंबर'२. रहस्यः प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यात आमिरचा हातखंडा असून तो आता पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाने लोकांमध्ये उत्सुकता तर निर्माण केलीच आहे. पण, 'पीके'च्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या कथेच रहस्य अद्याप उलगडू दिलेले नाही. या विनोदी चित्रपटाची कथा नक्की काय आहे? याचा थांगपत्ताही कोणाला नाही. कोणी म्हणत हा चित्रपट अक्षय कुमारच्या 'ओएमजीः ओह माय गॉड'सारखा आहे तर कोणी म्हणत चित्रपटात आमिर एलियन सारखे वागतो. आता चित्रपट नक्की कशावर आहे हे तर आज पाहिल्यावरच कळेल.
पाहा: कोण ठरला 'पीके'चा बॅटरी रिचार्ज?३. अनुष्का शर्मा-सुशांत सिंग राजपूतः गेले दोन वर्ष अनुष्का पडद्यावर झळकलेली नाही. 'जब तक है जान'नंतर अनुष्काने एकही चित्रपट केलेला नाही. आपल्या भूमिकांवर सतत प्रयोग करणा-या अनुष्काचे काम पाहणे नेहमीच मजेशीर असते. 'काय पो छे' अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अनुष्का ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
'पीके' चित्रपट ६ हजार चित्रपटगृहांत४. संजय दत्त-बूमन इराणीः सध्या जेलमध्ये असलेल्या संजय दत्तने जेलमध्ये जाण्यापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. संजय दत्तलाही पडद्यावर बघितल्यावर बरेच महिने झाल्यामुळे त्यालाही काम करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचे असेल. बूमन इराणीने 'लगे रहो मुन्ना भाई' आणि '३ इडियट्स'मध्ये राजकुमार हिराणीसोबत काम केले होते. बूमन पुन्हा एकदा आपल्याला भूमिकेला न्याय देतील अशी आशा आहे.
संगीतः अजय-अतुल, शांतनु मोइत्रा, अंकित तिवारी यांनी पीकेसाठी संगीत दिले आहे. 'लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम', 'नंगा पुंगा दोस्त' ही गाणी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत.
'पीके'कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टीचित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आमिरने वेगवेगळ्या शहरात जाऊन भेट दिली. ५२०० चित्रपटगृहे आणि परदेशातील ८२० चित्रपटगृहांमधून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित केला जाणारा 'पीके' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

एचपीसीएल मध्ये पदवीधारक अभियंत्याची नियुक्तीकरिता गेट - 2015 परीक्षा
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये पदवीधारक अभियंत्याची नियुक्तीकरिता गेट - 2015 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 फेब्रुवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 18 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.hindustanpetroleum.com व www.hpclcareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीसाठी भारत परिक्रमा
मानसिक आरोग्याबाबत असणारे अज्ञान आणि गैरसमज दूर करण्याच्या हेतूने डोंबिवलीतील सायकलपटू सचिन गावकर भारत परिक्रमा करणार आहे. मानसिक आरोग्याासाठी कार्यरत येथील 'आयपीएच' अर्थात 'इन्स्टिटय़ूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ' या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त त्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.
५ जानेवारी रोजी ठाण्यातून त्याच्या परिक्रमेस सुरुवात होईल. देशभरातील २५ राज्ये पालथी घालून, १४ हजार किलोमीटर अंतर कापून २२३ दिवसांनी १५ ऑगस्ट रोजी तो पुन्हा ठाण्यात परतणार आहे. परिक्रमेतील या अनुभवांचे एका माहितीपटाच्या आधारे सचिन संकलनही करणार आहे. आधी दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत, त्यानंतर कोलकत्ता, पूर्वाचल, मग काश्मीर, दिल्ली, पंजाब असा त्याचा प्रवास असेल.
डोंबिवलीत राहणारा सचिन गावकर याने जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेमधून शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने घोडबंदर येथील एका शाळेमध्ये कलाप्रशिक्षक म्हणून काम केले. या काळात ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर हा प्रवास अत्यंत खर्चीक ठरत असल्याने त्याने सायकलवरून हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तेथूनच त्याला सायकलिंगची आवड निर्माण झाली. डोंबिवलीतील एका सायकलप्रेमी क्लबमध्येही तो जाऊ लागला. बदलापूरमधील सायकलप्रेमी हेमंत जाधव आणि पनवेलचे धनंजय मदन यांनी सचिनच्या सायकलप्रेमास खतपाणी घातले. त्यातूनच त्याने गोवा-मुंबई अशी सायकलस्वारी केली. जून २०१२ मध्ये त्यांनी लडाखच्या मनाली ते खार्दुगला असा ५७० किमीचा प्रवास पूर्ण केला. हिमालय आणि ट्रेकिंग या दोन्ही गोष्टींबद्दलचे अज्ञान यामुळे त्याला या प्रवासापूर्वी कोणतीच भीती वाटली नाही. प्रवास खडतर होता. मात्र ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने आतापर्यंत तब्बल साडे आठ हजारांहून अधिक किमीचा सायकल प्रवास केला आहे.
ठाण्यातील इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ संस्थेशी गेल्या १४ वर्षांपासून सचिन गावकर संलग्न आहे. संस्थेच्या 'आवाहन' या दृक्श्राव्य विभागासाठी तो काम करतो. यंदा संस्था २५ र्वष पूर्ण करत असल्याने या निमित्ताने संस्थेसाठी वैयक्तिक पातळीवर काहीतरी करण्याचे आवाहन संस्थेचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले होते. गावकर याने त्याला प्रतिसाद देत भारत परिक्रमेची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. सचिन गावकर कोणत्याही स्व-मदत गटाशिवाय एकटय़ाने हा प्रवास करणार आहेत. आयपीएच संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून हा प्रवास केला जाणार असून या प्रवासादरम्यान तो शाळा, महाविद्यालय आणि मानसिक आरोग्याशी संबधित संस्थांच्या भेटी घेऊन विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधणार आहे. तसेच ती माहिती चित्रित करून ठेवणार आहे.
दररोज आठ ते दहा तासांत सुमारे ८० किलोमीटर अंतर तो कापणार असून उर्वरित वेळेत लोकांशी संवाद साधणार आहे. तसेच जनजागृतीसाठी पत्रके वितरित करणार असल्याची माहिती सचिन गावकरने 'ठाणे वृत्तान्त'शी बोलताना दिली. ठाणे वेध परिषदेत रविवारी डॉ. आनंद नाडकर्णी आणि समस्त ठाणेकरांनी सचिनच्या या सायकल प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)