Translate

मंगळवार, ४ जुलै, २०१७

FULL FORMs

ही कंपनी वेस्टर्न इंडिया पाल्म रिफाईंड ऑईल लिमिटेड या नावाने स्थापन करण्यात आली होती. १९४५ मध्ये महाराष्ट्राच्या जळगावमधील अंमळनेर येथे मोहम्मद प्रेमजी यांनी कंपनी सुरु केली. कालांतराने कंपनी मोठ्या प्रमाणात विस्तारत गेली. भाजी आणि तेल ही दोन उत्पादने बनविण्यात कंपनी अग्रेसर होती. सुरुवातीला कंपनी किसान, सनफ्लॉवर आणि कॅमल या तीन नावांनी आपली उत्पादने बाजारात सादर करत होती. १९६६ मध्ये मोहम्मद प्रेमजी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अझिम प्रेमजी यानं कंपनीची सूत्रे स्विकारली. १९७७ नंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात शिरुन कंपनीने आपला आणखी विस्तार केला. यावेळी कंपनीचे जुने नाव बदलून वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स लिमिटेड असे करण्यात आले. आता कंपनी माहिती तंत्रज्ञानाबरोबरच वैद्यकीय, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात आपला विस्तार करत आहे.

तर या ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या बीएमडीब्ल्यूचा फुलफॉर्म माहितीय का तुम्हाला? ‘बेरिश मोटरेन वर्क’ चं संक्षिप्त रुप म्हणजे BMW होय. ही जर्मन कंपनी असून लक्झरी कारच्या निर्मितीसाठी ती ओळखली जाते. जर्मनीच्या म्यूनिच शहरात या कंपनीचं मुख्यालय आहे. या इमारतीची रचना ही एका इंजिन सारखी करण्यात आलीय. ऑटोमोबाईल इण्डस्ट्रीत येण्याआधी ही कंपनी एअरक्राफ्ट इंजिन बनवायची. पहिल्या महायुद्धानंतर या कंपनीवर एअरक्राफ्ट इंजिन बनवण्यात एका करारानुसार बंदी घालण्यात आली त्यानंतर या कंपनीने पहिल्यांदा मोटार सायकल बनवली होती. ७ मार्च १९१६ मध्येही कंपनी स्थापन करण्यात आली. डिक्सी ही बीएमडब्ल्यूने बनवलेली पहिली कार होय.


‘LG’जी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची वेगवेगळी उत्पादने आपल्याला माहिती असतात. मात्र, ‘LG’चा नेमका अर्थ काय हे फार कमी जणांना माहिती असते. असाच विचार करुन या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवले आणि अतिशय आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. १९५८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीचे नाव सुरुवातीला गोल्डस्टार होते. कालांतराने १९९५ मध्ये कंपनीचे लकी केमिकल या कंपनीसोबत एकत्रीकरण करण्यात आले. लकी या नावामुळे पुढे ‘LG’चे नाव लकी गोल्डस्टार झाले. मूळ साऊथ कोरियाच्या असलेल्या या कंपनीचे मुख्य ऑफीस साऊथ कोरियाची राजधानी सेऊल येथे असून, जगभरात कंपनीची ११९ कार्यालये आहेत. सध्या कंपनीचे एकूण ८२ हजार कर्मचारी आहेत. सध्या कंपनी घरगुती उपकरणे, मोबाईल, घरातील मनोरंजनाची साधने आणि गाड्यांचे भाग तयार करण्याच्या उद्योगात अग्रेसर आहे. भारतात मुख्यतः रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनमध्ये कंपनी आघाडीवर असून, २०११ मध्ये ‘LG’ टीव्ही बनविणारी दुसरी मोठी कंपनी होती. आपण अनेकदा मोठ्या ब्रॅंडचा वापर करतो मात्र त्याचा फूलफॉर्म काय असतो याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. ‘प्रिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘व्हीलेज रोडशो लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी एकत्र येत १९९५ मध्ये ‘PVR’ हा संयुक्त उद्योग सुरु केला. दोन्ही कंपनींच्या नावांचा समावेश या नव्या नावात असावा या उद्देशाने या नव्या उद्योगसमूहाचे नाव प्रिया व्हीलेज रोडशो असे ठेवण्यात आले.

इंडोनेशीयामध्ये एक उत्सव

प्रेत पुरुन दफन विधी एकदा झाला की पुन्हा ते प्रेत बाहेर काढले जात नाही हे तुम्हालाही माहिती असेल पण जर तुम्हाला कोणी सांगितले की एक गाव असेही आहे जिथे पुरलेली प्रेतं दर तीन वर्षांनी बाहेर काढली जातात इतकेच नाही तर त्यांना नवनीन कपडे घालून सजवण्यात येते तर तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल का? ऐकायला  थोडे विचित्र वाटत असले तरी इंडोनेशीयामध्ये एक उत्सव आहे या उत्सवाच्या काळात नातेवाईक पुरलेली प्रेत बाहेर काढून त्यांना नवीन कपडे घालून तयार करतात. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर ‘मानेने’ नावाचा सण साजरा केला जातो. या सणात पुरलेले प्रेत बाहेर काढून साफ करण्याची प्रथा आहे. इतकेच नाही तर प्रेत बाहेर काढून ते नीट साफ केले जाते, त्याला नवीन कपडे घालण्यात येतात त्यानंतर या नटवलेल्या प्रेतांसोबत त्याचे नातेवाईक फोटो देखील काढतात. 

या उत्सवाच्या काळात घराघरात लज्जतदार पदार्थांची दावत असते. घरात गोड, तिखट असे विविध पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांवर घरातील मंडळी ताव मारतातच पण त्याचबरोबर शवाला देखील पदार्थांचा भोग दाखवला जातो. सुलावेसी बेटावर गेल्या कित्येक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात की गेल्या १०० वर्षांहूनही अधिक काळापासून हा सण साजरा केला जातो. हा उत्सव जवळपास आठवडाभर देखील चालतो. त्यामुळे या प्रेतांना दोन तीन दिवस बाहेरच ठेवले जाते. प्रेत खराब होऊ नये यासाठी त्यांच्यावर रासायिक पदार्थांचे लेपनही केले जाते. मरणावर यांचा विश्वास नाही. मरणानंतरही त्या व्यक्तीचा जीवन प्रवास सुरू राहतो अशी या लोकांची मान्यता आहे. १९७० पर्यंत या बेटावरील लोकांचा बाहेरील जगाशी कोणताच संपर्क नव्हता.