भूत (प्रेतआत्मा) म्हणजे नेमकं काय असते, एखादी आत्मा भूत (प्रेतआत्मा) कशी बनते..त्यांचे प्रकार कित्ती…इत्यादी सर्व प्रथम… आपण आत्माविषयी जाणून घेऊया…जो तुमच्या आमच्या मध्ये प्रत्येक सजीव, जिवंत प्राणिमात्रांण मध्ये सामावलेला आहे त्याचे विषयी…म्हणजेच तुमच्या आत्म्या विषयी जाणून घेऊया…
आपल्या हिंदू धर्म ग्रंथप्रमाणे आत्मा एक विश्वव्यापी अविनाशी (विनाश न पावणार) तत्त्व आहे पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते.आता नीट ऐका..तुमच्या आत्म्याविषयी आहे…सर्वकर्मा सर्वकामा: सर्वगन्धा: सर्वरसह: सर्वमिदं अभ्यात्तोवाक्यानादार: एष म आत्मान्तर्ह्रिदये एतत ब्रम्ह: एतं इति: ई (छांदोग्य उपनिषद )
अर्थ…..तो(तुमच्यातीलआत्मा),ज्याच्या मुळे ह्या सर्व दृश्य व अदृश्य जगाचे अस्तित्व आहे,ज्याच्या मध्ये हे सर्व समाविष्ट आहे व या सर्वां मध्ये जो सुप्रतीष्टापित (प्रमाणीकरण केले ) आहे. तो (तुमच्यातील आत्मा), जो सर्वकर्मांचा, कामांचा, गंधांचा आणी रसांचा जनिता (जन्म)व भोगता असूनही कर्म ,काम ,गंध आणी रस रहितआहे.तो इंद्रिय रहित, निराकार व निर्गुण आहे…असा तो परब्रम्ह:म्हणजेच माझा (सर्वांचा) आत्मा आहे. जो माझ्या ह्रिदयकमळांत (हृदय) विराजमान आहे..
आत्म्याबाबत श्रीमद्भगवद्गीतेत दिलेली माहिती वर्णन असे आहे की,अविनाशी, जो मरत नाही, कोणाला मारत नाही, शाश्वत व पुरातन आहे, शरीर नाश पाविले तरी हा नाश पावत नाही…अजन्मा, अव्ययी, न कापता येण्याजोगा..,न जळणारा..,न भिजणारा..,न सुकणारा..,अचल.., सनातन..,अव्यक्त..इंद्रियांना अगोचर..,अचिन्त्य..,अविकारी असा हा आत्मा आहे. आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. हा आलाही नाही की गेलाही नाही. हा स्थिर आहे- पुरातन आहे. देहाला मारले तरी हा मरत नाही. याला शस्त्रे मारू शकत नाहीत. त्याला अग्नी जाळू शकत नाही. याला पाणी भिजवू शकत नाही की याला वारा वाळवू शकत नाही. हा सर्वव्यापी आहे. याला पाहता येत नाही. याची कल्पना करता येत नाही. हा निविर्कार आहे असा हा तुमचा आमचा आत्मा आहे…असो, आत्म्याची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात (तुमचा आमचा आहे तो) जेव्हा या जीवात्मा चा वासना आणि कामानामय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात..हिच आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्मात म्हणून संबोधले जाते…
वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते. भूताप्रेतांची गती तसेच शक्ती अपार असते यांचे वेगवेगळे प्रकार असतात.हिंदू धर्मातात गती व कर्मनुसार मेलेल्या जीवांचे वर्गीकरण केले जाते.भुता ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते…आयुर्वेदात 18 प्रकारचे प्रेतात्मा आहेत असे सांगितले आहे, तसेच पिचाश, प्रेत, आसरा, डाकिन, शाकिन, ब्रह्मसमंध, मुंजा, गिऱ्हा, लावसटीन, हडळ, हाकाट्या, वेताल, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिचाश, विरीकास असे अनेक प्रकर सांगितले जातात या प्रेतयोनीत जाणारे लोक अदृश व बलवान बनतात परंतु सगळेच मरणारे जीव प्रेतयोनीत जात नाहीत वा सगळेच बलवान होत नाहीत. ते आत्माच्या कर्म व गतीवर अवलंबून असते.
भूता मध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे
प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत.
हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात.
शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात.
डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात.
जखिन : जखिन नाव घेताच एक चिञ विचिञ प्रतिमा डोळ्या समोर उभी रहाते.जी स्ञी बाळंतपणा नंतर दहा दिवसात मरते किंवा विटाळात मरते. किंव्हा जिचा नवरा जिवंत आहे. पण असंख्य यातना घेऊन जी मरते तीला जखिन म्हणतात.आपल्या शञूनां ञास देण्यासाठी लोक हीचा वापर करतात.
जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ‘ अलवंतीण ‘असे म्हणतात ! हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अलवंतीण हमखास दिसते .’ अस्रा ‘ सात असून त्या ब्राम्हण स्त्रियांप्रमाणे दिसतात . प्रत्येक अस्रेचा पोशाख वेगवेगळा असतो . या अस्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे वळतात . मुसलमानातील ‘ परिस ‘ व हिंदूंमधील ‘ अस्रा ‘ एकच होत .
समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
ब्रम्ह राक्षस- ब्राम्हणाचा जर खून झाला तर तो ब्रम्हराक्षस होतो…विद्वान ब्राम्हण मारून जर पिशाच्च योनीत गेला तर “ब्रम्ह्समन्ध” होतो .ब्रम्ह्समन्ध सहसा कोणाला त्रास देत नाहीत उलट लोकांची मदत करतात . ब्रम्ह्समन्ध माणसांप्रमाणेच दिसतो . त्यांना स्पर्श केला तर ते ‘ केळीच्या खुंट्या ‘ प्रमाणे थंड स्पर्श जाणवतो.
गिऱ्हा :- पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. गिऱ्हा नेहमी ज्या ठिकाणी मारतो तेथेच घुटमळत असतो..हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव येतो.
“वेताळ” हा भूत – पिशाच्चांचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणेच असतात . डोळे हिरव्या रंगाचे असून डोक्यावरील केस ताठ उभे असतात . तो आपल्या उजव्या हातात चाबूक व डाव्या हातात शंख धारण करतो . तो फेरीस जातो त्या वेळी संपूर्ण हिरवा पोशाख करून पालखीतून किंवा घोड्या वरून फिरतो . त्याच्या आगेमागे बरीच भूते असतात . त्यांच्या हातात जळत्या मशाली असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारीत असतात..
म्हसोबा : हा ही भूतांचा राजा आहे जो वेताळा प्रमाणे ताकदवान आहे.
खवीस- खवीस पठाण लोकांचे भुत आहे, अफगाणिस्तान, गल्फ ई देशांत जास्त प्रमाणात असतें काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखल जात. अस म्हणतात की, खाविस लोखंडाहून जास्त बळकट असतो. जो पण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व ती व्यक्ती श्रीमंत बनते.
चकवा :- हा भूताचा प्रकार नसून ही एकप्रकारची भूतांची भूल देण्याची पद्धत आहे. हा जास्त करून रात्री दिला जातो . यात त्या व्यक्तीला एकप्रकारचा आभास होतो . आणि तो व्यक्ती त्या आभासाच्या पाठीपाठी जातो . आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेत . अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकाच जागेवर भटकत असते पण तिला त्याच भान राहत नाही .
मानकाप्या :- याला स्वताला मुंडक नसत . हा कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो . अस म्हणतात कि मानकाप्या हा लोकांची मुंडकी उडवतो .
हाकाट्या जे लोक अपघातात मारतात ते हाकाट्या होतात. हाकाट्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो, याला जर चुकून ओ दिलीत की काम तमाम. हाकाट्या निर्जन स्थळी जास्त आढळतो .
कर्णपिशाच्च भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच्च म्हणतात. कर्णपिशाच्च हा साधनेद्वारे प्राप्त करता येतो . पण एकदा का त्याला वश केल का तो आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतो . साधकाचा शेवटी अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो.
चेटकीण: हे मागासर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते
झोटिंग: हे भूत खारवी किव्वा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.
लावसट: ओली बाळन्तिन मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्युनंतर लावसट मध्ये होते.
विर: हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते.निम्याचे अतृप्त आत्म्याचे भूत आपली वासना पुरी करण्यासाठी दुसर्याच्या शरीरात जाऊन वासना पुरी करते, असे अनेक समज – अपसमज आहेत.
खुन्या: हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते.
चेडा : हे डोगंरावर जंगलात किव्हा गावाच्या सिमेच्या बाहेर वास्तव्यात असते.ह्याचा उपयोग हा सहसा कोणाची शेती बांधायची असेल किंव्हा कोणाच्या शेतीला नूसकान द्यायाचे असेल.ह्या साठी वापरतात. ह्या दर वर्षी कोबंडा द्यावा लागतो.
देवचार :- म्हणजे गावचा राखणदार होय. अपरात्री निर्जनस्थळी अथवा रस्त्यावरून जाणार्या माणसाला भुताखेतांनी त्रास दिल्यास देवचार त्यांच्यापासून माणसांचे रक्षण करतो व घरची वाट दाखवतो असे मानतात. देवचार अथवा राखणदार पांढरे धोतर नेसलेला, खांद्यावर कांबळ व पायात जाड चामड्याचे चप्पल व हातात दांडा घेतलेला समजला जातो. प्रत्येक गावच्या राखणदाराची हद्द असते.कित्येक गावांत त्याची व वेताळाची देवळेही उभारलेली आहेत.
वायंगी भूत-कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणातील हे वायंगी भूत फार प्रचलित आहे. हा प्रकार केवळ कोकणातच पहावयास मिळतो.घराच्या भरभराटी साठी या भूताचा वापर करतात.
ही भूते भारण्यासाठी नारळ किंव्हा नदीच्या पञात मिळणारे काटेरी वांगे जे आकाराने लहाण असते आशा वस्तूत भारले जाते व जातकाला दिले जाते.हे भूत मुदतीच्या स्वरूपात दिले जाते. ज्या माणसाला जितके वर्ष पाहीजे असते. तितक्या वर्षासाठी हे भूत विकत मिळते.व जितके वर्ष हे त्या माणसाच्या घरात रहाते तितके वर्ष हे त्या माणसाला धन संप्पती प्रदान करते. त्याला भरभराट देते. हे भूत मुख्यत: गरीबाला श्रीमंत व श्रीमंताला गरीब बनवण्याचे काम करते.पण याचे काही दुष्ट परिणाम ही आहेत. हे भूत जितक्या वर्षासाठी आहे तितक्या वर्षासाठी भरभराट देते. व एकदा या भूताची मुदत संपली की ते माणसाला मुळा सकट घेऊन जाते. त्याला जितके त्याने प्रदान केले आहे त्याच्या कितीतरी पट जास्त घेऊन जाते.त्या माणसाचा सर्वनाश करते.व त्याला अचानक काळाच्या पडद्याआड करते. एवढेच नव्हे तर त्याच्या वारसांना,नाते वाईकांना देखिल ञास देण्यास सुरूवात करते.कधीकधी ते शेजा-यांना देखिल बाधते.अक्षरक्ष: माणसाला नरक यातना भोगावयला भाग पाडते हे भूत. ज्यानां आपल्या भावी पिढीची व वंशाची किंमत नसेल त्यांनीच हे भूत आणायच्या भानगडीत पडावे. लक्ष्मी ही चंचल असते ती केंव्हाही योग्य मार्गाने प्रसन्न करून घ्यावी..
मित्रांनो, वरील आत्मा विषयी ची माहिती आपल्या हिंदू ग्रंथाप्रमाणे आहे तसेच बक्कीची भूतखेतन विषयी ची माहिती… एकमेकांचे समज-अपसमज, अनुभव, कथा, गोष्टी यांतून पुढे आलेली आहे…ते खरंच आहेत किंवा हे असेच आहे..असे मी सांगत नाही…बाक्की हे आपल्या my horror experience विश्वाचे वेगवेगळे पात्र आहेत व ते आपल्या वेगवेगळ्या कथा तुन भेटून घाबरून सोडतीलच….याची खात्री बाळगा..