चहा असा करावा
चहाला वेळ नसते. पण, वेळेला चहा लागतोच. पण, चहा म्हणजे बासुंदी नव्हे हे ध्यानात घ्यावे. उकळलेल्या पाण्यात किंचित मीठ टाकून लिंबू पिळावे. दूध आणि साखर वगळून एक दशांश चहा पावडर आणि आलं टाकून चहा प्राशन करावा. या चहामुळे वात निघून जाईल आणि दिवसभर उत्साह राहील.
गुणकारी ज्वारी
ज्वारी सोडली म्हणून मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढेल हा गैरसमज आहे. सकाळी ज्वारी, दुपारी जोंधळा आणि रात्री शाळू खावी. शिरा, भेळ, मिसळ, वडापाव खाण्यापेक्षा ज्वारीची उकड खावी. त्याला केवळ एक मिनिट लागतो. उकळत्या पाण्यामध्ये थोडे ज्वारीचे पीठ, किसलेले आलं, कडीपत्ता आणि ताक घातले की झाली उकड. अशी न्याहरी करा. ज्वारीशिवाय काही खाल्ले, तर उलट रक्तशर्करा वाढेल.
दही-ताकाविषयी गैरसमज
दुधाला विरजण लावून दही होते. मात्र, दही गरम असते. आयुर्वेदानुसार जितके संस्कार करू तेवढे गुणांतरण होते. घुसळण्याने गरम दह्य़ाचे ताक होते. ताक शीत असते. मूळव्याध बरी करण्यासाठी ताक घ्यावे. पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असल्याने दही शक्यतो रात्री खाऊ नये.
आलं-लसूण
रस आणि रक्ताचे आरोग्य ठेवण्यासाठी आहारामध्ये लसूण घ्यावा. ज्यांना तोंड येते किंवा परसाकडला गेल्यावर आग होते त्यांनी लसूण टाळावा. मधात टोचून ठेवला कांदा सात दिवसांनी खायचा. कांदा खाणे आवश्यक आहे. मात्र, बैठे काम करणाऱ्यांनी कांदा कमी खावा किंवा शक्य असेल तर टाळावा. चातुर्मासामध्ये चहा-कॉफी चालते. मग, कांदा-लसूण नाही हे काही समजत नाही.
खोकल्यासाठी उपचार
कोरडय़ा खोकल्यासाठी दूध, मनुका, खजूर आणि मध घ्यावे. कफप्रधान खोकल्यासाठी पुदिना, आलं-लसूण, ओली हळद यांची चटणी खावी आणि तुळशीची पाने सेवन करावीत. मीठ आणि गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. सर्दी-पडसं, खोकला, दमा यासाठी कोरफड किंवा कुमारी आसव घ्यावे.
हृदयापेक्षा मूत्रपिंड महत्त्वाचे
शरीरातील हृदयापेक्षाही मूत्रपिंडाचे काम व्यवस्थित कसे चालेल हे पाहावे. म्हणजे रक्तदाब किंवा मधुमेह होणार नाही.
सूर्यनमस्कार व्यायाम
जिममध्ये जाण्यापेक्षा दररोज किमान सहा सूर्यनमस्कार घालावेत. योगा म्हणजे दुसरे काही नाही तर सूर्यनमस्कारच आहेत. रात्री जेवणानंतर झोपायला जाण्याआधी थोडे फिरणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन्स थायरॉइडच्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही. धुतलेल्या पालेभाज्या, दूध, टरफलासह कडधान्ये यामध्ये व्हिटॅमिन आहे. कृश माणसाने ओले खोबरे आणि स्थूल माणसाने तीळ सेवन करावे.
चंदन हा मित्र
'बघणेबल चेहरा' ही गरज असल्याने तारुण्यपीटिका ही समस्या सर्वाना भेडसावते. त्या फोडू नका. तर, चंदनाचे खोड उगाळून गंध लावले तर तारुण्यपीटिका निघून जाईल. चंदन हा आपला मित्र आहे.
लाह्य़ा उत्तम आहार
लाह्य़ा हा उत्तम आहार असून जो लाह्य़ा खाईल तो आम्ल-पित्त दूर ठेवेल. मधुमेहींनी राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर, इतरांनी साळीच्या लाह्य़ा खाव्यात. सफरचंद, डाळिंब खावे. तर, केळं टाळावे. फळामध्ये दही घालणे योग्य नाही. कारण दही हे विरुद्ध अन्न आहे.
पाणी किती प्यावे
स्थूल व्यक्तीने जेवणापूर्वी पाणी प्यावे. म्हणजे जेवण कमी जाईल. कृश व्यक्तीने जेवणानंतर दोन तासाने पाणी प्यावे. उकळलेले पाणी प्रकृतीसाठी उत्तम. चुन्याची निवळी किंवा सागरमोथा चूर्ण घातलेले पाणी पिण्यास हरकत नाही.