Translate

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

कोण आहे छोटा राजन

कोण आहे छोटा राजन?

  • छोटा राजनचं संपूर्ण नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे
  • छोटा राजनचा जन्म 05/12/1959 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला, तिथेच तो वाढला.
  • छोटा राजन मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी गावचा
  • छोटा राजनने 80 च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकमध्ये तिकीट विकायला सुरुवात केली छोटे मोठे गुन्हे करताना राजेंद्र निकाळचे बडा राजनच्या संपर्कात आला
  • बडा राजन आणि छोटा राजन यांनी बराच काळ दाऊद इब्राहिमसााठी काम केलं
  • राजन दाऊदच्या टोळीचा सदस्य होता.
  • 1993 च्या बॉम्बस्फोटनंतर छोटा राजन आणि दाऊदमध्ये  वाद
  • 12 मार्च 1993 मध्ये मुंबईत स्फोट घडवल्याचा दाऊदवर आरोप
  • दाऊदच्या माणसांची हत्या केल्याचा छोटा राजनवर आरोप
  • त्यानंतर छोटा शकील आणि दाऊदने अनेकदा छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न केला
  • छोटा राजन गँगकडून दाऊद इब्राहिमचा हस्तक फिलू खानला संपवलं.
  • 2000 मध्ये बँकॉकमध्ये दाऊदकडून छोटा राजनवर जीवघेणा हल्ला झाला
  • बँकॉकच्या रुग्णालयात उपचार घेत असताना राजनने अचानकपणे पलायन केलं
  • हल्ल्याचा बदला म्हणून राजनने विनोद शेट्टीला मुंबईत संपवलं
  • सुनील सोन याने दाऊदला माहिती दिल्याचा संशय आल्याने छोटा राजनने त्याचाही खून केला
  • 2003 मध्ये छोटा राजन गँगने शरद शेट्टीची हत्या केली
  • हत्येचा प्रयत्न, हत्या, प्राणघातक हल्ला, कट, खंडणी, संघटित गुन्हेगारी, आर्म्स अक्ट, बेकायदा शस्त्र बाळगणं इत्यादी आरोप
  • पत्रकार जे डे यांच्या हत्येचा आरोप छोटा राजनवर आहे
  • सुजाता ही छोटा राजनची पत्नी असून त्यांना अंकिता, निकीता आणि खुशी या तीन मुली आहेत
  • छोटा राजनच्या आयुष्यावर ‘कंपनी’ नावाचा सिनेमा बनला आणि तो प्रचंड गाजला.

स्मार्टफोनमध्ये व्हायरस हल्ला

अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचे (OS) स्मार्टफोन वापरणारे युजर्स जगभरात आहेत. अनेकजण अँड्रॉईड टॅब्लेटचाही वापर करतात. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हायरस हल्ला होण्याची भीती अधिक असते. व्हायरस हल्ला स्मार्टफोन किंवा टॅब्लेटमध्ये झाल्यास सर्व डेटा करप्ट होण्याची भीती असते. अतिशय महत्त्वाची माहिती, फोटो गमावून बसण्याची शक्यता या व्हायरसमुळे उद्भवते. मात्र, अशा व्हायरसना तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसमधून काढून टाकलं जाऊ शकतं.

स्टेप 1 : स्मार्टफोनला सेफ मोडमध्ये रिबूट करा

युजर्सनी सर्वात आधी स्मार्टफोन किंवा टॅब्लेटला सेफ मोडमध्ये रिबूट करायला हवं. यामुळे थर्ड पार्टी अॅप्ससोबत येणाऱ्या व्हायरसना प्रतिबंध लागेल. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेफ मोड रिबूटसाठी ऑप्शन येत नसेल, तर पॉवर बटन काही वेळासाठी दाबून ठेवा. असे केल्याने रिबूटचं ऑप्शन येतं.

स्टेप 2 : डिव्हाईस सेटिंग

स्मार्टफोन किंवा टॅब्लेट रिस्टार्ट झाल्यानंतर सर्वात आधी डिव्हाईस सेटिंगमध्ये जाऊन अॅप्सच्या ऑप्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल असलेले सर्व अॅप्स दिसतील. यावेळी कोणतंही अॅप रनिंग मोडमध्य नसेल. इथे तुम्हाला व्हायरसही दिसेल.

स्टेप 3 : मालवेअर अॅप्स अनइन्स्टॉल करा

अॅप्सच्या यादीत तुम्हाला व्हायरस असलेले मालवेअर अॅप्स दिसल्यास ते डिलिट किंवा अनइन्स्टॉल करा किंवा रिमोव्ह असा ऑप्शन दिसल्यास रिमोव्ह करा. यासाठी तुम्हा डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन सेटिंगमध्ये जावं लागेल.

स्टेप 4 : डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन

डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन सेटिंगमध्ये जाऊन अॅडमिनिस्ट्रेशन स्टेटसमध्ये इन्स्टॉल अॅप्सच्या पूर्ण यादीवर नजर टाका. जे अॅप्स काहीच कामाचे नाहीत किंवा तुम्ही ज्या अॅप्सचा कधीच वापर करत नाहीत, ते अॅप अनइन्स्टॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर डिअॅक्टिव्हचा ऑप्शन दिसेल.

स्टेप 5 : नॉर्मल मोडमध्ये रिस्टार्ट करा

नको असलेले अॅप्स अनइन्स्टॉल केल्यानंतर स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पुन्हा एकदा नॉर्मल मोडमध्ये रिस्टार्ट करा. असे केल्याने तुमचं डिव्हाईसमधून व्हायरस निघून जातील. शिवाय तुमचं डिव्हाईसही सेफ मोडमध्ये राहील.

फ्री व्हिडीओ वेबसाईट्स

काही दिवसांपूर्वीच यू ट्यूबने पेड व्हर्जन लॉन्च केला आहे. या अॅड-फ्री व्हर्जनला कंपनीने ‘YouTube Red’ असं नाव दिलं आहे. युजर्सना यू ट्यूबवरील अॅड-फ्री व्हिडीओ पाहण्यासाठी महिन्याला जवळपास 630 रुपये मोजावे लागणार आहेत.

व्हिडीओ, सिनेमा पाहण्यासाठी युजर्स यू ट्यूबचीच निवड करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे की, यू टयूब वगळता आणखीही काही वेबसाईट्स आहेत, जिथे फ्री व्हिडीओ पाहणं शक्य आहे. या वेबसाईट्सवरही यू ट्यूबप्रमाणे व्हिडीओ पाहू शकता आणि अपलोडही करु शकता.

Dailymotion (URL- http://www.dailymotion.com/in)

डेलीमोशन वेबसाईटवर भारतीय आणि परदेशी टीव्ही शो आणि सिनेमे पाहता येतात. मूळची फ्रेंच वेबसाईट 18 भाषांमध्ये उपलब्ध आहे. युजर्सना लोकेशननुसार होम पेजवर त्या त्या देशातील व्हिडीओ पाहता येणार आहे. जर तुम्हाला तुमचा व्हिडीओ अपलोड करायचा करायचा असल्यास व्हिडीओ 2 जीबी आणि 60 मिनिटांचा असायला हवा. विशेष म्हणजे व्हिडीओ एचडी क्वालिटीमध्ये असेल तरीही अपलोड करता येतो.

Bigflix (URL- https://www.bigflix.com/)

जर तुम्हाला ऑनलाईन सिनेमा पाहायचे आहेत, तर बिगफ्लिक्स वेबसाईट एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमध्ये सिनेमे उपलब्ध आहेत. बिगफ्लिक्समध्ये युजर्स व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत, मात्र यू ट्यूबप्रमाणे फ्री सिनेमे पाहता येणार आहेत.
Metacafe (URL- http://www.metacafe.com/)

मेटाकॅफे वेबसाईटचे 4 कोटींहून अधिक व्हिजीटर्स आहेत. शॉर्ट व्हिडीओ हे या वेबसाईट्सचं वैशिष्ट्य आहे. गेम्स, स्पोर्ट्स, म्युझिक व्हिडीओज या वेबसाईट्सवर पाहता येतात. या वेबसाईट्सवर हायक्वालिटीचे व्हिडीओ अपलोड करता येतात.

CC:Studios (URL- http://www.cc.com/not-for-tv)

सीसी स्टुडिओजचं अधिकृत कंटेट या वेबसाईटवर पाहता येतं. मनोरंजनात्मक व्हिडीओ पाहण्यासाठी सीसी स्टुडिओज वेबसाईटला पर्याय नाही, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या वेबसाईटला MTV ने टेकओव्हर केलं होतं.

TED (URL- http://www.ted.com/)

टेड ही यूनिक व्हिडीओ स्ट्रीमिंग वेबसाईट आहे, जी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करते. या वेबसाईटवर वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखती आणि सेमिनारच्या व्हिडीओ उपलब्ध आहेत. यू ट्यूबपेक्षा अतिशय आकर्षक थीम, शैक्षणिक व्हिडीओज इत्यादी या वेबसाईटवर आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी ही वेबसाईट आहे.
Blip.tv (URL- http://blip.tv/)

यू ट्यूब आणि ब्लिप या दोन्ही वेबसाईट्स 2005 मध्ये लॉन्च झाल्या होत्या. यू ट्यूबच्या थीमपेक्षा थोडी वेगळी थीम ब्लिपची आहे. इंडिपेंडेंट आर्टिस्ट ब्लिपवर व्हिडीओ अपलोड करतात. या वेबसाईटवर सुमारे 48 हजार युजर्स व्हिडीओ पोस्ट करतात आणि 2 कोटी व्ह्यूअर्स आहेत.