Translate

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

स्मार्टफोनमध्ये व्हायरस हल्ला

अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचे (OS) स्मार्टफोन वापरणारे युजर्स जगभरात आहेत. अनेकजण अँड्रॉईड टॅब्लेटचाही वापर करतात. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हायरस हल्ला होण्याची भीती अधिक असते. व्हायरस हल्ला स्मार्टफोन किंवा टॅब्लेटमध्ये झाल्यास सर्व डेटा करप्ट होण्याची भीती असते. अतिशय महत्त्वाची माहिती, फोटो गमावून बसण्याची शक्यता या व्हायरसमुळे उद्भवते. मात्र, अशा व्हायरसना तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसमधून काढून टाकलं जाऊ शकतं.

स्टेप 1 : स्मार्टफोनला सेफ मोडमध्ये रिबूट करा

युजर्सनी सर्वात आधी स्मार्टफोन किंवा टॅब्लेटला सेफ मोडमध्ये रिबूट करायला हवं. यामुळे थर्ड पार्टी अॅप्ससोबत येणाऱ्या व्हायरसना प्रतिबंध लागेल. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेफ मोड रिबूटसाठी ऑप्शन येत नसेल, तर पॉवर बटन काही वेळासाठी दाबून ठेवा. असे केल्याने रिबूटचं ऑप्शन येतं.

स्टेप 2 : डिव्हाईस सेटिंग

स्मार्टफोन किंवा टॅब्लेट रिस्टार्ट झाल्यानंतर सर्वात आधी डिव्हाईस सेटिंगमध्ये जाऊन अॅप्सच्या ऑप्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल असलेले सर्व अॅप्स दिसतील. यावेळी कोणतंही अॅप रनिंग मोडमध्य नसेल. इथे तुम्हाला व्हायरसही दिसेल.

स्टेप 3 : मालवेअर अॅप्स अनइन्स्टॉल करा

अॅप्सच्या यादीत तुम्हाला व्हायरस असलेले मालवेअर अॅप्स दिसल्यास ते डिलिट किंवा अनइन्स्टॉल करा किंवा रिमोव्ह असा ऑप्शन दिसल्यास रिमोव्ह करा. यासाठी तुम्हा डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन सेटिंगमध्ये जावं लागेल.

स्टेप 4 : डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन

डिव्हाईस अॅडमिनिस्ट्रेशन सेटिंगमध्ये जाऊन अॅडमिनिस्ट्रेशन स्टेटसमध्ये इन्स्टॉल अॅप्सच्या पूर्ण यादीवर नजर टाका. जे अॅप्स काहीच कामाचे नाहीत किंवा तुम्ही ज्या अॅप्सचा कधीच वापर करत नाहीत, ते अॅप अनइन्स्टॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर डिअॅक्टिव्हचा ऑप्शन दिसेल.

स्टेप 5 : नॉर्मल मोडमध्ये रिस्टार्ट करा

नको असलेले अॅप्स अनइन्स्टॉल केल्यानंतर स्मार्टफोन किंवा टॅब्लेट पुन्हा एकदा नॉर्मल मोडमध्ये रिस्टार्ट करा. असे केल्याने तुमचं डिव्हाईसमधून व्हायरस निघून जातील. शिवाय तुमचं डिव्हाईसही सेफ मोडमध्ये राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा