Translate

बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

धर्मातर आणि 'घरवापसी'

जगातील बहुतेक लोकांचा धर्म त्यांना जन्मासोबत, म्हणजे अपघातानेच प्राप्त झालेला असतो. स्वेच्छेशी त्याचा संबंध नसतो. कोणत्या माता-पित्याच्या पोटी जन्म घ्यावा, हे कोणाच्याही अखत्यारीत नसते आणि म्हणूनच कोणी कोणत्या धर्माचे असावे हेसुद्धा या बहुतेकांनी स्वेच्छेने ठरविलेले नसते. काही लोक नक्कीच पुढे आपापल्या धर्माचा सखोल अभ्याससुद्धा करतात, अभ्यासान्ती आपल्या धर्माचा विचार पटल्यास, त्या धर्माचा मनाने अंगीकार करतात आणि विचार न पटल्यास त्याच धर्मात राहिले तरी निष्क्रिय होऊन, नावापुरते त्या धर्माचे सदस्य राहतात. आजच्या समाजात अशा धर्मनिष्क्रिय लोकांची संख्या अधिक असते. असे लोक निधर्मी किंवा अश्रद्ध म्हणवून घेणे पसंत करीत नाहीत; परंतु काही लोक खरोखर अश्रद्ध बनून राहतात. याखेरीज ज्यांना असे वाटते की, मानवजातीसाठी धर्म ही अत्यावश्यक बाब आहे, असे लोक सर्वच धर्माचा सखोल आणि तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर जो धर्म त्यांना मानवाच्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जगण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याची खात्री विचारान्ती देतो, असा धर्म स्वीकारतात. यालाच खऱ्या अर्थाने 'धर्मातर' म्हणता येईल. 
याउलट, समूहाने घडणारे धर्मातर हे या खऱ्या अर्थाने धर्मातर नसते. त्यात बहुतेकदा आध्यात्मिक वा नैतिक उन्नतीपेक्षा सामाजिक आणि राजकीय हेतूच जास्त प्रभावी असतात. ज्या ज्या ठिकाणी अशी समूहाने धर्मातरे घडली असतील, तेथे सामाजिक आणि राजकीय हेतूच त्यांचे मूळ कारण असावे, असे मानण्यास जागा आहे. मात्र 'दबावाने' किंवा तलवारीच्या धाकाने, पैशाच्या प्रलोभनाने आणि राजकीय पदाच्या आमिषाने घडणारी धर्मातरे ही अपवादात्मक असतात. 'गरीब, नादार आणि उपेक्षित लोक पैशांच्या प्रलोभनाने आणि शस्त्रांच्या धाकाने धर्म बदलतात' अशी जी धारणा आहे, ती सर्वस्वी चुकीची ठरावी. कारण श्रीमंत लोकांपेक्षा आणि वरिष्ठ जातींच्या लोकांपेक्षा गरीब, निष्कांचन लोकच धर्माच्या बाबतीत जास्त चिवट असतात. त्याउलट जे लोक वरिष्ठ जातींचे मानले जातात, तेच सत्तापदांच्या अभिलाषेला लवकर बळी पडतात. 
भारतीय संदर्भात, तथाकथित उच्च जातींचे धर्मातर नेहमीच दोन उद्दिष्टांनी झाले आहे. क्षत्रिय जातींची (राजपूत, ठाकूर वगैरे) धर्मातरे सत्तापदासाठी झाली आणि तत्कालीन ब्राह्मणांची धर्मातरे होण्यामागे सत्तापद मिळवून समाजावर असलेली पकड कायम ठेवण्याचा हेतू असावा, असे इतिहास सांगतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वैदिक आणि सनातनी धर्मातील वर्णव्यवस्थेला कंटाळून आणि जातव्यवस्थेच्या शोषणातून मुक्त होण्याच्या हेतूने ज्या निम्न (तसे समजल्या जाणाऱ्या) जातींच्या लोकांनी धर्मातर केले त्यांना त्या दुसऱ्या धर्मातदेखील सुख लाभू नये व तेथेदेखील त्यांना नीच ठरवून त्यांचे शोषण करता यावे, असे प्रयत्न अनेकदा झालेले दिसतात. म्हणूनच महाराष्ट्रातही आपण सवर्ण ख्रिश्चन आणि दलित ख्रिश्चन अशा संज्ञा ऐकतो. मुसलमानांची जातीव्यवस्थादेखील त्याच दुराग्रहांमुळे निर्माण झाली आहे. परंतु इस्लाम वा ख्रिस्ती धर्मात उपासनागृहांतील प्रवेशबंदी आणि एकत्र रोटीव्यवहार भेद हे अडथळे निर्माण करण्यात त्या धर्मातील कथित उच्चवर्णीयांना फारसे यश मिळाले नाही. भारतातील कनिष्ठ जातींना हेच सुख फार मोठे होते. त्यांच्या आत्मसन्मानासाठी हेसुद्धा पुरेसे होते. सर्वच बाबतींत पाळली जाणारी अस्पृश्यता हीच त्यांना सर्वाधिक अपमानित करणारी गोष्ट होती. म्हणूनच भारतातील दलित शोषितांचे धर्मातर बळजबरीने किंवा आमिषाने केले गेले म्हणणे हा शुद्ध कांगावा ठरतो. अर्थात हेही खरे की, कोणत्याही धर्मात, तथाकथित नीच-जातींच्या लोकांना अन्य जातींशी (मग त्या उच्च समजल्या जाणाऱ्या असल्या तरी) बेटीव्यवहार करणे आजही सहज शक्य होत नाही. 
डॉ. रावसाहेब कसबे यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास- ''इस्लामी आक्रमकांचे क्रौर्य आणि त्यांच्या अत्याचारांच्या कथा सांगून, तरुण मनांना भूतकाळात नेऊन त्यांच्या डोळय़ांत पाणी आणणे आणि अंत:करणात स्वाभिमानाच्या भावना पेटविणे तुलनेने सोपे आहे. मध्ययुगीन वास्तव समजावून सांगणे फार अवघड आहे.'' (हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद- पृष्ठ १०३). 
'मध्ययुगीन वास्तव'देखील आपण कसबे यांच्याच शब्दांत पाहू. ''इस्लाम आक्रमक आहे. त्याचे मूळ रूपच तसे आहे. त्यामुळे कोणत्याही देशात जे कष्टकरी आणि शेतकरी वर्ग तिथल्या सत्ताधाऱ्यांनी दाबून ठेवलेले असतात, त्या दबलेल्यांचा इस्लाम 'आवाज' होतो. त्यासाठी इस्लामी राज्यकर्त्यांना फारशी बळजबरीही करावी लागत नाही आणि धर्मातराचे 'आवतण'ही द्यावे लागत नाही. .. अमेरिकेतील निग्रोंच्या चळवळीत इस्लामचा जो प्रभाव जाणवतो, त्यासही ही उपेक्षाच कारणीभूत आहे. आणि इस्लाम आज निग्रोंचाच नव्हे तर जगातील सर्व उपेक्षितांचा आवाज बनत आहे.'' (तत्रव- पृ. १०४) 
याच पुस्तकात रावसाहेब कसबे म्हणतात- ''हिंदूंना आपल्या दोषांची जाणीव सांस्कृतिक अहंकारामुळे होणे शक्यच नव्हते. बंगालमध्ये तर कहार ही एक अस्पृश्य जात आहे, ते लोक नावाडी म्हणून काम करतात. अस्पृश्याच्या नावेत बसल्याने वरिष्ठ जातीय हिंदूंना विटाळ होतो म्हणून या उच्चजातीय हिंदूंनी, कहारांनी मुसलमान व्हावे यासाठी पुढाकार घेतलेला होता, तर दक्षिणेतील नाडर समाजाच्या मुलींना चोळी घालण्याची परवानगी नव्हती. .. .. या हिंदूंच्या जाचाला कंटाळून, शिकू लागलेल्या मुलींनी केवळ चोळय़ा घालण्यासाठी ख्रिस्ती मिशनरी ननशी संबंध वाढविले आणि मग कृपाळू परमेश्वराचा दयाळू पुत्र येशूच्या नावाने त्यांना चोळय़ा घालता आल्या.'' (तत्रव- पृ. १०५ व अधिक संदर्भ- द नाडर्स ऑफ तमिळनाडू, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले, १९७९)
आता जी मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची धर्मातरे घडवून आणली जात आहेत, त्याला रा. स्व. संघ परिवारातील लोक धर्मातर न म्हणता 'घरवापसी' म्हणत आहेत. आणि ते वास्तवात तसेच आहे. कारण धर्मातर ही एक सखोल अभ्यासानंतर केलेली अतिशय विवेकपूर्ण कृती असते. नुसत्या गोल टोप्या घालून वा अग्नीत तूप आणि काही काही समीधा टाकून ते घडत नसते. ज्या लोकांनी घरातील जाचाला कंटाळून घरातून पलायन केले आणि शोषणमुक्त जीवन जगण्याचे मार्ग शोधले, त्यांना पकडून घरात 'वापस' आणून परत त्यांना वर्णव्यवस्थेच्या नावाने शोषणाच्या घाण्याला जुंपण्याचा हा कार्यक्रम असल्याचे मानण्यास जागा आहे. त्यांचे धर्मातरच घडवायचे असते तर सर्वप्रथम त्यांच्या गोल टोप्या काढण्यात आल्या असत्या, दाढीसह त्यांच्या डोक्याचे मुंडन करून शेंडय़ा ठेवता आल्या असत्या. त्यांना आंघोळ घालून सोवळे नेसवून जानवे घालण्यात आले असते आणि मग त्यांच्या हस्ते होमहवन करविले गेले असते. परंतु 'घरवापसी' घडविणाऱ्यांनी स्पष्टच म्हटले आहे की, जे ज्या जातीतून पळाले होते त्यांना परत त्याच जातीत समाविष्ट केले जाईल. वाल्मीकींना वाल्मीकी, चर्मकारांना चर्मकार, राजपूतांना राजपूत आणि ब्राह्मणांना ब्राह्मण जातीत गणले जाईल. सरसकट सर्वानाच ब्राह्मण किंवा राजपूत केले जाईल असे म्हटले असते, तर अशा धर्मातराला ब्राह्मण आणि/ किंवा राजपूतांकडूनच प्रखर विरोध झाला असता. 
आता हेदेखील सिद्ध झाले आहे की, त्या घर-वापस येणाऱ्यांमध्ये अनेक जण बांगलादेशी होते. म्हणूनच रेशनकार्ड आणि आधारकार्ड मिळवून देण्याचे आमिष अत्यंत प्रभावी ठरले आहे. कारण या कार्डाच्या माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळेल आणि आता ते 'घुसखोर' न राहता 'निर्वासित' ठरविण्यात येतील. ते पूर्वी जितक्या प्रमाणात मुसलमान होते तितक्याच प्रमाणात हिंदू राहतील. तिकडेही त्यांच्या मतांच्या संख्येलाच महत्त्व होते; इकडेही मतांच्या संख्येलाच महत्त्व राहील. त्यांच्या शिक्षण- प्रशिक्षण आणि प्रबोधनाची चिंता ना मुस्लीम मौलवींना होती ना हिंदू पुरोहित-पंडितांना असेल. आग्रा येथील घरवापसी कार्यक्रमासंदर्भात उत्तर प्रदेशातील सत्ताधाऱ्यांच्या लबाडीचा भाग असा की, 'सक्तीच्या धर्मातरा'च्या 'गुन्ह्या'साठी नंदकिशोर वाल्मीकी या महादलिताला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश धर्मातर कार्यक्रमाचे प्रमुख राजेश्वर सिंह आणि कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणारे सर्व उच्चवर्णीय भाजप खासदार साफ विसरले आहेत आणि दलितच बळीचा बकरा ठरला आहे. 
इस्लामचा प्रसार जगभर तलवारीच्या बळावरच झाला हा प्रचार असत्य असल्याचे एच. जी. वेल्स, थॉमस कार्लाइल, मायकेल एस. हार्ट आदी पाश्चात्त्य आणि महात्मा गांधी, प्रा. ग्यानेंद्रदेव शर्मा शास्त्री, आदी एतद्देशीय विद्वान/ विचारवंतांनी दाखवून दिले आहे; परंतु त्यापेक्षाही आजघडीला, हिंदुत्ववादय़ांना प्रात:स्मरणीय असणारे विनायक दामोदर सावरकर या संदर्भात काय म्हणतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. ''आजच्या प्रगतिशील परिस्थितीत अरब संस्कृती कितीही मागासलेली दिसली तरी हे विसरता कामा नये की, यापूर्वी एकदा जगाच्या फार मोठय़ा भागातील मरणासन्न समाजात त्या संस्कृतीने नवचैतन्याचे वारे संचारविले होते. मानवी प्रगतीत एके काळी नवतत्त्वे, नवधर्म, नवशिल्प यांची बहुमोल भर तिनेच घातलेली होती. तिचा उगम मुहम्मद पैगंबरांनी मुस्लीम धर्माची मुहूर्तमेढ हजार-बाराशे वर्षांपूर्वी जेव्हा रोवली तेव्हा झाला. ज्या दिवशी मुहम्मद पैगंबरांनी कुरआन शरिफचे पहिले आयत- पहिला मंत्र उचारला आणि तलवार अशी पहिल्यानेच उपसली त्या दिवसापासून एका शंभर-दीडशे वर्षांच्या आत, तिकडे स्पेन नि इकडे सिंधूपर्यंत त्या संस्कृतीतील अंतर्गत आवेशाने व शक्तीने अध्र्या जगाचे रूप बदलून टाकले. जिच्या विजयाच्या अप्रतिहत वेगास स्पेनची सामुद्रधुनी, इराणचा अग्नी, सिंधूची अटक, चीनची भिंत वा हिमालयाची शिखरे अडवू शकली नाहीत. जिने आपल्या धर्माची, भाषेची, लिपीची, शिल्पांची, शास्त्रांची राजमुद्रा ठोकून खंडेच्या खंडे अंकित करून टाकली. त्या अरब संस्कृतीत तिच्याशी टक्कर देत आलेल्या त्या त्या काळाच्या अनेक जीर्णशीर्ण संस्कृतींपेक्षा जे एकंदरीत या काळच्या जगतात नुसते जगण्यास नव्हे तर या जगास जिंकण्यासही समर्थतर आणि योग्यतर ठरेल असे काही तरी असामान्य श्रेष्ठत्व, काही तरी नवे जीवनतत्त्व होतेच हे निर्विवाद आहे. 
६ लेखक धर्माभ्यासक असून मुस्लीम ओबीसी चळवळीत कार्यरत आहेत. 
त्यांचा ई-मेल drbasharatahmed@gmail.com

मासिक पाळीतील त्रासावरचे उपाय

मुलगी वयात येऊ लागली की तिची मासिक पाळी कधी सुरू होतेय याची आईला अगदी डोळ्यात तेल घालून काळजी करावी लागते. कारण दर महिना येणारी ही पाळी बर्याच मुलींना तसेच महिलांनाही त्रासदायक ठरत असते. एकतर या काळात शरीरातील रक्त मोठ्या प्रमाणावर जात असल्याने अशक्तपणा येतोच पण पाळीच्या काळात पाय दुखणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे यासारखे त्रासही भोगावे लागतात. मात्र या काळात वेळीच काळजी घेतली तर हा त्रास कमी करता येतो.
१) मासिक पाळीचा स्त्राव अधिक होत असल्यास - साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून कधीही पाळी सुरू होते. काही वेळा रक्तस्त्राव अधिक असतो तर काही वळा तो अगदीच कमी असतो. स्त्राव साफ असणे हो आरोग्यासाठी महत्वाचे असते. जादा स्त्राव असेल तर कोहळा आणून किसावा. त्याचा पिळून रस काढावा व १ कप रस अधिक २ चमचे साखर असे दिवसातून दोन वेळा घ्यावे. आवश्यकतेनुसार वापरून उरलेला कोहळा रेफ्रिजिरेटरमध्ये न ठेवता ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा.
२) मासिक पाळीचा स्त्राव कमी असेल तर - तिळाचे सेवन उपयुक्त ठरते. १ महिनाभर रोज १ - २ चमचे तीळ खावेत. तीळकूट, तीळगुळ अशाही प्रकारात खाता येतील. दुसरा उपाय म्हणजे २० ग्रॅम कुळीथ अधिक १ लिटर पाणी उकळावे व हे मिश्रण १०० सीसी पर्यंत आटवावे.मग त्यात साखर व मीठ घालून प्यावे. हा उपाय पाळी अगोदर पाच दिवस करावा.
३) अंगावर पांढरे जाणे- ज्याना हा त्रास होतो ती स्त्री बारीक असेल तर कोहळारस अधिक साखर मिश्रण दिवसातून दोन वेळा प्यावे. पण जाड अथवा स्थूल असेल तर डाळिबाचा रस १ ग्लास १० दिवस घ्यावा. डाळिबाचे दाणे स्वच्छ रुमालात घालून पिळावेत. निघालेल्या रसात साखर व मीठ घालावे.हा रस एकाच वेळी न पिता थोडया थोडया वेळाने दिवसभर प्यावा.
४) लघवी होताना जळजळ-रात्री पाण्यात धने भिजत घालून सकाळी हे पाणी प्यायल्याने हा त्रास कमी होतो. विशेषतः उष्णतेमुळे हा त्रास होत असेल तर तो या उपायाने नक्कीच कमी होतो

भारताचे अनमोल रत्न, हे आहेत आतापर्यंतचे 45 'भारतरत्न' !

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय हे भारतरत्नचा गौरव मिळवणारे अनुक्रमे 44 आणि 45 वे रत्न ठरले आहे.

त्यामुळं त्यांच्याआधी कोणत्या महान व्यक्तींना या बहुमोल सन्मानांना गौरवण्यात आलं आहे, हे जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता आहे. त्या सर्वांची यादी खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी 

2013 पर्यंत एकूण 43 भारतीयांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या बहुमोल कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आलं आहे. त्यांची यादी खास तुमच्यासाठी..  

आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :


 पुरस्कारार्थीचे नाववर्ष
1.चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972)  1954
2.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 )1954
3.डॉ. सी.व्ही. रमण (188-1970)1954
4.डॉ. भगवान दास (1869 – 1958)1954
5.डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 )1955
6.पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 )1955
7.पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 )1957
8.डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 )1958
9.डॉ. बी. सी. रॉय  (1882 - 1962 )1961
10.पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 )1961
11.डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963)1962
12.डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 )1963
13.डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 )1963
14.लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 )1966
15.इंदिरा गांधी (1817 - 1984 )1971
16.व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 )1975
17.के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 )1976
18.मदर टेरेसा (1910 - 1997 )1980
19.आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 )1983
20.खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 )1987
21.एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 )1988
22.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 )1990
23.डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 )1990
24.राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 )1991
25.सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 )1991
26.मोरारजी देसाई (1896 - 1995 )1991
27.मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958)1992
28.जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 )1992
29.सत्यजीत रे (1922 - 1992 )1992
30.गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 )1997
31.श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 )1997
32.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931)1997
33.श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 )1998
34.सी. सब्रमण्यम (1910 - 2000 )1998
35.जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 )1999
36.प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 )1999
37.लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 )1999
38.पंडीत रवी शंकर (1920 - 2012 )1999
39.लता मंगेशकर (जन्म 1929 )2001
40.उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 )2001
41.पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 )2009
42.प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 )2014
43.सचिन तेंडुलकर  ( जन्म 1973 )2014
44.मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)  (1861 - 1946)2015
45.अटलबिहारी वाजपेयी  ( जन्म 25 डिसेंबर 1924 )

'पीके'मधील 5 सेकंदाच्या रोलनंतर भिकाऱ्याचं जीवनच बदलून गेलं!

पीके चित्रपटात भीक मागणाऱ्या अंध व्यक्तीची भूमिका साकारल्याने एका भिक मागणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून गेलं आहे. काही दिवसांपर्यंत रस्त्यावर भीक मागणाऱ्या
मनोज रॉय याच्याकडे सध्या आपल्या गावात नोकरी, फेसबूक अकाऊंट आणि प्रेयसी देखील आहे.


39 वर्षाचे मनोज रॉय हे काहि महिन्यांपर्यंत दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानजवळ अंध बनून भीक मागत होते. मनोजने सांगितलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दोन व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांची विचारले की, चित्रपटात अॅक्टींग करणार का? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दोन वेळच्या अन्नासाठी अॅक्टींग करणं हेच माझं एकमेव साधन आहे. त्यानंतर त्यांनी मला 20 रूपयांची नोट आणि एक फोन नंबर देऊन तेथून निघून गेले.

मी त्या नंबरवर कॉल केल्यानंतर मला मनोज स्टेडीअमवर बोलावण्यात आले. तिथे आणखी 7 भिकारी ऑडीशनसाठी आले होते. मला चित्रपटाविषयी किंवा त्यातील कलाकाराविषयी फार आकर्षण नव्हते. मला फक्त आठवडाभर मोफत मिळणाऱ्या जेवणाशी घेणं देणं होतं. त्यानंतर माझं सिलेक्शन झाल्याची माहिती मनोजने दिली.

 सिलेक्शन झाल्यानंतर मला दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चित्रपटाच्या युनीटसोबत राहण्याची संधी मिळाली. पाण्याच्या कमतरतेमुळे मी अनेकदा अंघोळदेखील करत नव्हतो मात्र चित्रपटात सिलेक्शन झाल्यानंतर मी फाईव्ह स्टार हॉटेलमधील स्विमींग टँकमध्ये अंघोळ करत होतो. त्याठिकाणी माझ्या आजूबाजूला आमिर खान, अनुष्का शर्मासारखे कलाकार फिरत असल्याचंही मनोजने सांगितले

अटलबिहारी वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न'

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे प्रणेते पंडीत मदन मोहन मालवीय यांना बुधवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यामुळे 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाजपेयी यांना 'भारतरत्न' देण्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. केंद्रात सत्तापालट होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच वाजपेयी यांना यंदा 'भारतरत्न' जाहीर होणार, या स्वरुपाची चर्चा सुरू झाली होती. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या वाजपेयी यांनी १९९८ ते २००४ या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषविले आहे. जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले वाजपेयी यांनी केंद्रामध्ये विविध प्रकारची पदे सांभाळली आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासोबतच परराष्ट्रमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्त घेतलेल्या वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय ठरल्या आहेत.
पंडित मदन मोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते. जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक सदस्य म्हणूनही मालवीय परिचित आहेत. राजकीय क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही कौतुकास्पद ठरते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी दोन वेळा भूषविले होते. मालवीय यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर १८६१ असून, १२ नोव्हेंबर १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरिचय!

अटल बिहार वाजपेयी आणि पंडीत मदन मोहन मालवीय यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची माहिती खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याबाबतची माहिती दिली. अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी ते एक सदस्य आहेत. तर पंडीत मदनमोहन मालवीय यांनी हिंदू बनारस विद्यापीठाची स्थापना केली आहे. या दोन्ही व्यक्तींचा अल्पपरिचय खालीलप्रमाणे-


अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय-
  • 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.
  • श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचे ते शिष्य आहेत.
  • भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक आहेत.
  • 1968 ते 1973 या काळात अटल बिहारी वाजपेयींनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यसह विविध माध्यमात त्यांनी पत्रकारिताही केली आहे.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक होते तसंच ते आजन्म अविवाहित राहिले आहेत.
  • पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
  • अटलबिहारी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात दोन वेळा पंतप्रधानही राहिले आहेत.
  • अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांनी केले.
  • सुवर्ण चतुष्कोन या रस्ते विकास प्रकल्पाचे ते प्रणेते आहेत.
  • दिल्ली-लाहोर बस यात्रा सुरू करून भारत-पाक संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
  • कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला वाजपेयींच्या काळातच धूळ चारली होती.
  • उत्कृष्ट वक्ता आणि कवी मनाचा नेता अशी त्यांची ओळख राहिली आहे.
पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरिचय-

  • 25 सप्टेंबर 1861 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला
  • संस्कृत हिंदी भाषेत त्यांनी विपूल लेखन केले आहे. तसंच त्यांना पंडित हि उपाधी दिली गेली आहे.
  • कोलकाता विद्यापीठातून पदवी प्रात्प केली
  • मालवीय यांनी बनारस विद्यापीठाची स्थापना केली
  • मालावीय हे चार वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले आहेत.
  • हिंदू महासभेची स्थापना त्यांनी केली आहे.
  • 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
  • भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच 12 नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांचे निधन झाले.