Translate

बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

'पीके'मधील 5 सेकंदाच्या रोलनंतर भिकाऱ्याचं जीवनच बदलून गेलं!

पीके चित्रपटात भीक मागणाऱ्या अंध व्यक्तीची भूमिका साकारल्याने एका भिक मागणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून गेलं आहे. काही दिवसांपर्यंत रस्त्यावर भीक मागणाऱ्या
मनोज रॉय याच्याकडे सध्या आपल्या गावात नोकरी, फेसबूक अकाऊंट आणि प्रेयसी देखील आहे.


39 वर्षाचे मनोज रॉय हे काहि महिन्यांपर्यंत दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानजवळ अंध बनून भीक मागत होते. मनोजने सांगितलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दोन व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांची विचारले की, चित्रपटात अॅक्टींग करणार का? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दोन वेळच्या अन्नासाठी अॅक्टींग करणं हेच माझं एकमेव साधन आहे. त्यानंतर त्यांनी मला 20 रूपयांची नोट आणि एक फोन नंबर देऊन तेथून निघून गेले.

मी त्या नंबरवर कॉल केल्यानंतर मला मनोज स्टेडीअमवर बोलावण्यात आले. तिथे आणखी 7 भिकारी ऑडीशनसाठी आले होते. मला चित्रपटाविषयी किंवा त्यातील कलाकाराविषयी फार आकर्षण नव्हते. मला फक्त आठवडाभर मोफत मिळणाऱ्या जेवणाशी घेणं देणं होतं. त्यानंतर माझं सिलेक्शन झाल्याची माहिती मनोजने दिली.

 सिलेक्शन झाल्यानंतर मला दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चित्रपटाच्या युनीटसोबत राहण्याची संधी मिळाली. पाण्याच्या कमतरतेमुळे मी अनेकदा अंघोळदेखील करत नव्हतो मात्र चित्रपटात सिलेक्शन झाल्यानंतर मी फाईव्ह स्टार हॉटेलमधील स्विमींग टँकमध्ये अंघोळ करत होतो. त्याठिकाणी माझ्या आजूबाजूला आमिर खान, अनुष्का शर्मासारखे कलाकार फिरत असल्याचंही मनोजने सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा