Translate

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

गोठा माझा मोठा!

साहित्य संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का या डॉ. सदानंद मोरे, नियोजित अध्यक्ष, घुमान साहित्य संमेलन (घुमान हे गावाचे नाव असून, त्याचा गपघुमान या साहित्यिक प्रकृतीशी काहीही संबंध नाही.) यांच्या सवालावर उभ्या-आडव्या महाराष्ट्रातील साहित्यिक गट, तट, पीठे आणि गिरण्या यांमधून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या हे समजण्यास मार्ग नाही. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तोंडासमोर बूमचे बोंड धरल्याशिवाय आपण बोलायचे नाही असा प्रण येथील साहित्यशार्दूलांनी मागेच केल्यामुळे त्यांच्या साद-प्रतिसादास मराठी समाज नेहमीच मुकतो व त्याचे नुकसान होते. तसेच या वेळीही झाले. एक मात्र खरे की रा. रा. मोरे यांचा हा सवाल चांगलाच मर्मभेदी होता. मोरे हे संतवाङ्मयाचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेची वळणे बऱ्यापैकी ऋजू आहेत. तरीही त्यांचे हे उद्गार ऐकून काही जाणत्यांना थेट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचीच आठवण झाली. मुंबई येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैल असे संबोधले होते. महाराष्ट्रातील अनेक लेखक खासगीत 'ग्रंथवाचना'चे कार्यक्रम करतात. अर्थात खासगीत कोणी काय करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. तेव्हा त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. आक्षेप यावर आहे, की या बैठकांमध्ये अनेकदा ही लेखकमंडळी अनुपस्थित साहित्यिकांचा समावेश विविध प्राणिजातांमध्ये करीत असतात. 'ग्रंथवाचना'ने जीभ सलावते. त्याला कोण काय करणार? तेव्हा मा. बाळासाहेबांनी साहित्यिकांना वृषभ राशीत ढकलल्याने कोणाचीही कातडी थरथरण्याचे काही कारणच नव्हते. उलट काही जणांनी तर, जाऊ दे, आपण अनेकदा राजकारण्यांना गेंडा म्हणतो, त्यांनी आपल्याला बैल म्हटले, फिट्टमफाट झाली, असे म्हणत तेव्हा वृत्तपत्रांतून आपले हातही झटकले होते. मा. बाळासाहेबांनी मांडलेल्या निष्कर्षांवर गोंधळ माजला तो त्यांनी त्याचा जाहीर उच्चार केला त्यामुळे. आताचा रा.रा. मोरे यांचा ऋजू सवालही वस्तुत: तसाच खळबळयोग्यच होता. परंतु त्यांनी तो अधिकच उच्चस्तरावरून केल्यामुळे असेल कदाचित, लोकांना त्याचा वाच्यार्थ, ध्वनितार्थ, भावार्थ, अन्वयार्थ असा कोणताही अर्थच लागला नाही असे दिसते. बरे या सवालाचे उत्तरही होय वा नाही असे द्विपर्यायी असूच शकत नाही. होय म्हटले तर वेगळी आफत येते. पण नाही म्हटले, तर त्याहून मोठी अडचण होते. कारण त्यातून आणखी उपप्रश्न निर्माण होतात. तो पवित्र गायींचा गोठा नसेल, तर जर्सी गायींचा गोठा आहे का? समजा त्यांचाही नसेल, तर मग तो बैलांचा गोठा आहे का? समजा तो गोठाच नसेल, तर मग रिकामटेकडय़ांचा अड्डा आहे का? सांप्रतचे लेखकराव भालचंद्र नेमाडे यांनी असे बोलून संमेलनोत्सुकांची पंचाईत करणे आपण समजून घेऊ शकतो. नियोजित संमेलनाध्यक्षांनी मात्र साहित्यिकांची अशी अडचण करणे कदापि योग्य नव्हे. त्यांनी आपलीच जीभ चावून आपलाच निषेध करावा असे आम्ही त्यांना सुचवून पाहतो.
रा.रा. मोरे यांनी केवळ संमेलन आणि गोठा यांचा उल्लेख केल्यानेच साहित्यिकांची अडचण झाली असे मानण्याचे मात्र कारण नाही. उलट त्यांनी हा सवाल ज्या संदर्भात केला तो संदर्भच अधिक पंचाईतखोर आहे. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग असावा की नसावा असा तो संदर्भ. अर्थात हा प्रश्न तर अजिबातच नवा नाही. संमेलनाच्या तोंडावर संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीची पद्धत, मग निवडणूक, त्यातच मध्ये कुठे तरी संमेलन असावे की नसावे असे नेहमीचे वाद सालोसाल खेळले जात असतातच. त्यामुळे सर्वाचाच वेळ बरा जातो. तर त्याच धर्तीवर संमेलनातील राजकारण्यांच्या समावेशावरही तावातावाने साधक-बाधक चर्चा दरसाली झडतच असतात. मोरे सरांनी नेमका त्याच मुद्दय़ाचा समाचार घेतला आहे. साहित्य संमेलन हा काही घरगुती हळदीकुंकू समारंभ नसतो. तसा तो असतो हे अनेकांचे मत येथे अमान्य करण्यास हरकत नाही. एखाद्या बडय़ा घरच्या लग्नकार्यासारखे हे कार्य. त्याला खर्च येणारच. बरे साहित्यशारदेच्या अनेक उपासकांना असे वाटते की, ते भव्य-दिव्य व्हावे, त्यासाठी आलिशान शामियाने उभारावेत, खानपानसेवा तारांकित असावी, साहित्याची रूक्ष परिसंवादीय चर्चा झाल्यानंतर रात्री मन रंजनाचे बहारदार कार्यक्रम व्हावेत. हा खर्च आपल्या बँक खात्यातून होणार नसल्याने असे वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. परंतु हल्लीची महर्गता पाहता शासकीय अनुदानातून आणि तुटपुंज्या देणग्यांतून हे कसे जमावे? तेव्हा मग आयोजकांची तोंडे आपोआपच राजकीय नेत्यांकडे वळतात. ही मंडळी तशी जीवनवादीच. पैसा फेकला तर तमाशाला गेलेच पाहिजे असे मानणारी. तर आपल्याला नेमके तेच नको असते. आपले म्हणणे असे, की बाबांनो या, पण व्यासपीठावर बसू नका. तेथे बसलात तर आपले राजकीय जोडे मंडपाबाहेरच काढून ठेवा. त्या िहदी मसालापटांतील पात्रे कधी कधी म्हणतात, की मी येथे पुलीस इन्स्पेक्टरच्या हैसियतीने नाही तर एका बापाच्या हैसियतीने आलो आहे, तसे साहित्यरसिकाच्या हैसियतीने या. संमेलनाच्या एकंदर व्यवहारात साहित्यिक मंडळी राजकारण करीत असतात. तेव्हा तेथे आणखी राजकारण्यांची गरज नाही, असे त्यांनी स्पष्टच म्हटले असते तर ते एक वेळ चालून गेले असते. परंतु राजकारणी म्हणून नव्हे, तर रसिक म्हणून या असे म्हटल्याने साहित्यिकांचा दांभिकपणाच समोर येतो. यात पुन्हा अडचण अशी की रसिक राजकारण्याची व्याख्या कशी करायची? तो ओळखायचा कसा? संमेलनातील भाषणातून पाच-पंचवीस पुस्तकांची नावे आणि चार काव्यपंक्तींचा उल्लेख केल्यास त्या राजकीय नेत्याला रसिक म्हणून महामंडळाचे प्रमाणपत्र देता येईल का? एरवी तसा भंपकपणा संमेलनातून होतच असतो म्हटल्यावर अशी व्यवस्था करायला काय हरकत आहे? पण हा भंपकपणा हे आपल्या साहित्यव्यवहाराचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावयास हवे. याचे कारण आपल्या बहुसंख्य लेखकूंची राजकीय व्यवस्थेबद्दलची एकूणच अध्यापकी जाण. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये पाटील नामक एक राजकीय व्यंगचित्र दिसे. तीच जर राजकारणाकडे पाहण्याची सूक्ष्मदर्शी असेल तर राजकीय व्यवस्थेबद्दलच्या साहित्यिक समजाची पातळी काय राहणार? त्यामुळेच राजकारणी म्हटल्यावर तो जणू साहित्ययज्ञ-विध्वंसक असुरच अशा नजरेने त्याकडे पाहिले जाते. बाकीची सगळी कामे करण्याकरिता, शाळाप्रवेशापासून सदनिकांपर्यंतच्या समस्या सोडविण्याकरिता चालणारा राजकारणी संमेलनात मात्र नकोसा होतो. ही अस्पृश्यता काय कामाची असाच मोरे सरांचा सवाल आहे.
आता असे म्हटल्यावर काही राजकारणी साहित्यिकांना मात्र खरोखरच हायसे वाटले असेल. एकदा साहित्य संमेलन हा साधाच गोठा आहे असे मानून राजकारण्यांना स्पृश्य करून घेतले की, मग काय सगळेच वावर मोकळे. एकदा संमेलनाला गोठा म्हटले म्हणजे तेथे गोमूत्राची दरुगधी येते असे म्हणण्याचेही काहीच कारण उरणार नाही. कोणीही रसिक बनून यावे, वैरणकाडीची व्यवस्था करावी आणि संमेलनांचे चांगभले व साहित्याचा उदोउदो करावा. असे झाले तर मात्र रा.रा. मोरे यांच्यापुढे हा कुठला गोठा आहे एवढाच प्रश्न उरेल.
अर्थात गोठा कुठे आहे याला महत्त्व नसतेच. वैरणकाडी आहे, दरुगधीही असायचीच.. मग गोठा माझा मोठा म्हणायला काय हरकत आहे?

संतोषी माता की व्रत कथा


एक बुढिया थी जिसके सात बेटे थे. उनमे से छः कमाते थे और एक न कमाने वाला था. वह बुढिया उन छयों को अच्छी रसोई बनाकर बड़े प्रेम से खिलाती पर सातवें को बचा-खुचा झूठन खिलाती थी. परन्तु वह भोला था अतः मन में कुछ भी विचार नहीं करता था. एक दिन वह अपनी पत्नी से बोला – देखो मेरी माता को मुझसे कितना प्रेम है? उसने कहा वह तुम्हें सभी की झूठन खिलाती है, फिर भी तुम ऐसा कहते हो चाहे तो तुम समय आने पर देख सकते हो.

एक दिन बहुत बड़ा त्यौहार आया. बुढिया ने सात प्रकार के भोजन और चूरमे के लड्डू बनाए. सातवाँ लड़का यह बात जांचने के लिए सिर दुखने का बहाना करके पतला कपडा ओढ़कर सो गया और देखने लगा माँ ने उनको बहुत अच्छे आसनों पर बिठाया और सात प्रकार के भोजन और लड्डू परोसे. वह उन्हें बड़े प्रेम से खिला रही है. जब वे छयो उठ गए तो माँ ने उनकी थालियों से झूठन इकट्ठी की और उनसे एक लड्डू बनाया. फिर वह सातवें लड़के से बोली “अरे रोटी खाले.” वह बोला ‘ माँ मैं भोजन नहीं करूँगा मैं तो परदेश जा रहा हूँ.’ माँ ने कहा – ‘कल जाता है तो आज ही चला जा.’ वह घर से निकल गया. चलते समय उसे अपनी पत्नी की याद आयी जो गोशाला में कंडे थाप रही थी. वह बोला – “हम विदेश को जा रहे है, आएंगे कछु काल. तुम रहियो संतोष से, धरम अपनों पाल.”
इस पर उसकी पत्नी बोली
जाओ पिया आनन्द से, हमारी सोच हटाए.
राम भरोसे हम रहे, ईश्वर तुम्हें सहाय.
देहु निशानी आपणी, देख धरूँ मैं धीर.
सुधि हमारी ना बिसारियो, रखियो मन गंभीर.
इस पर वह लड़का बोला – ‘मेरे पास कुछ नहीं है. यह अंगूठी है सो ले और मुझे भी अपनी कोई निशानी दे दे. वह बोली मेरे पास क्या है? यह गोबर भरे हाथ है. यह कहकर उसने उसकी पीठ पर गोबर भरे हाथ की थाप मार दी. वह लड़का चल दिया. ऐसा कहते है, इसी कारण से विवाह में पत्नी पति की पीठ पर हाथ का छापा मारती है.
चलते समय वह दूर देश में पहुँचा. वह एक व्यापारी की दुकान पर जाकर बोला ‘ भाई मुझे नौकरी पर रख लो.’ व्यापारी को नौकर की जरुरत थी. अतः बोला तन्ख्वाह काम देखकर देंगे. तुम रह जाओ. वह सवेरे ७ बजे से रात की १२ बजे तक नौकरी करने लगा. थोड़े ही दिनों में सारा लेन देन और हिसाब – किताब करने लगा. सेठ के ७ – ८ नौकर चककर खाने लगे. सेठ से उसे दो तीन महीने ने आधे मुनाफे का हिस्सेदार बना दिया. बारह वर्ष में वह नामी सेठ बन गया और उसका मालिक उसके भरोसे काम छोड़कर कहीं बाहर चला गया.
उधर उसकी औरत को सास और जिठानियाँ बड़ा कष्ट देने लगी. वे उसे लकडी लेने जंगल में भेजती. भूसे की रोटी देती, फूटे नारियल में पानी देती. वह बड़े कष्ट से जीवन बिताती थी. एक दिन जब वह लकडी लेने जा रही थी तो रास्ते में उसने कई औरतों को व्रत करते देखा. वह पूछने लगी – ‘बहनों यह किसका व्रत है, कैसे करते है और इससे क्या फल मिलता है ? तो एक स्त्री बोली ‘ यह संतोषी माता का व्रत है इसके करने से मनोवांछित फल मिलता है, इससे गरीबी, मन की चिंताएँ, राज के मुकद्दमे. कलह, रोग नष्ट होते है और संतान, सुख, धन, प्रसन्नता, शांति, मन पसंद वर मिले व बाहर गये हुए पति के दर्शन होते है.’ उसने उसे व्रत करने की विधि बता दी.
सने रास्ते में सारी लकडियाँ बेच दी व गुड और चना ले लिया. उसने व्रत करने की तैयारी की. उसने सामने एक मंदिर देखा तो पूछने लगी ‘ यह मंदिर किसका है ?’ वह कहने लगे ‘ यह संतोषी माता का मंदिर है.’ वह मंदिर में गई और माता के चरणों में लोटने लगी. वह दुखी होकर विनती करने लगी ‘माँ ! मैं अज्ञानी हूँ. मैं बहुत दुखी हूँ. मैं तुम्हारी शरण में हूँ. मेरा दुःख दूर करो.’ माता को दया आ गयी. एक शुक्रवार को उसके पति का पत्र आया और अगले शुक्रवार को पति का भेजा हुआ धन मिला. अब तो जेठ जेठानी और सास नाक सिकोड़ के कहने लगे ‘ अब तो इसकी खातिर बढेगी, यह बुलाने पर भी नहीं बोलेगी.’
वह बोली ‘ पत्र और धन आवे तो सभी को अच्छा हैं.’ उसकी आँखों में आंसू आ गये. वह मंदिर में गई और माता के चरणों में गिरकर बोली हे माँ ! मैंने तुमसे पैसा कब माँगा था ? मुझे तो अपना सुहाग चाहिये. मैं तो अपने स्वामी के दर्शन और सेवा करना मांगती हूँ. तब माता ने प्रसन्न होकर कहा – ‘जा बेटी तेरा पति आवेगा.’ वह बड़ी प्रसन्नता से घर गई और घर का काम काज करने लगी. उधर संतोषी माता ने उसके पति को स्वप्न में घर जाने और पत्नी की याद दिलाई. उसने कहा माँ मैं कैसे जाऊँ, परदेश की बात है, लेन – देन का कोई हिसाब नहीं है.’ माँ ने कहा मेरी बात मान सवेरे नहा – धोकर मेरा नाम लेकर घी का दीपक जलाकर दंडवत करके दुकान पर बैठना. देखते देखते सारा लेन – देन साफ़ हो जायेगा. धन का ढेर लग जायेगा.
सवेरे उसने अपने स्वप्न की बात सभी से कही तो सब दिल्लगी उडाने लगे. वे कहने लगे कि कही सपने भी सत्य होते है. पर एक बूढे ने कहा ‘ भाई ! जैसे माता ने कहा है वैसे करने में का डर है ?’ उसने नहा धोकर, माता को दंडवत करने घी का दीपक जलाया और दुकान पर जाकर बैठ जाया. थोडी ही देर में सारा लेन देन साफ़ हो गया, सारा माल बिक गया और धन का ढेर लग गया. वह प्रसन्न हुआ और घर के लिए गहने और सामान वगेरह खरीदने लगा| वह जल्दी ही घर को रवाना हो गया.
धर बेचारी उसकी पत्नी रोज़ लकडियाँ लेने जाती और रोज़ संतोषी माता की सेवा करती. उसने माता से पूछा – हे माँ ! यह धूल कैसी उड़ रही है ? माता ने कहा तेरा पति आ रहा है. तूं लकडियों के तीन बोझ बना लें. एक नदी के किनारे रख, एक यहाँ रख और तीसरा अपने सिर पर रख ले. तेरे पति के दिल में उस लकडी के गट्ठे को देखकर मोह पैदा होगा. जब वह यहाँ रुक कर नाश्ता पानी करके घर जायेगा, तब तूँ लकडियाँ उठाकर घर जाना और चोक के बीच में गट्ठर डालकर जोर जोर से तीन आवाजें लगाना, ” सासूजी ! लकडियों का गट्ठा लो, भूसे की रोटी दो और नारियल के खोपडे में पानी दो. आज मेहमान कौन आया है ?” इसने माँ के चरण छूए और उसके कहे अनुसार सारा कार्य किया.
वह तीसरा गट्ठर लेकर घर गई और चोक में डालकर कहने लगी “सासूजी ! लकडियों का गट्ठर लो, भूसे की रोटी दो, नारियल के खोपडे में पानी दो, आज मेहमान कौन आया है ?” यह सुनकर सास बाहर आकर कपट भरे वचनों से उसके दिए हुए कष्टों को भुलाने ले लिए कहने लगी ‘ बेटी ! तेरा पति आया है. आ, मीठा भात और भोजन कर और गहने कपडे पहन.’ अपनी माँ के ऐसे वचन सुनकर उसका पति बाहर आया और अपनी पत्नी के हाथ में अंगूठी देख कर व्याकुल हो उठा. उसने पूछा ‘ यह कौन है ?’ माँ ने कहा ‘ यह तेरी बहू है आज बारह बरस हो गए, यह दिन भर घूमती फिरती है, काम – काज करती नहीं है, तुझे देखकर नखरे करती है. वह बोला ठीक है. मैंने तुझे और इसे देख लिया है, अब मुझे दुसरे घर की चाबी दे दो, मैं उसमे रहूँगा.
माँ ने कहा ‘ ठीक है, जैसी तेरी मरजी.’ और उसने चाबियों का गुच्छा पटक दिया. उसने अपना सामान तीसरी मंजिल के ऊपर के कमरे में रख दिया. एक ही दिन में वे राजा के समान ठाठ – बाठ वाले बन गये. इतने में अगला शुक्रवार आया. बहू ने अपनी पति से कहा – मुझे संतोषी माता के व्रत का उद्यापन करना है. वह बोला बहुत अच्छा ख़ुशी से कर ले. जल्दी ही उद्यापन की तैयारी करने लगी. उसने जेठ के लड़कों को जीमने के लिए कहा. उन्होंने मान लिया. पीछे से जिठानियों ने अपने बच्चों को सिखादिया ‘ तुम खटाई मांगना जिससे उसका उद्यापन पूरा न हो.’ लड़कों ने जीम कर खटाई मांगी. बहू कहने लगी ‘ भाई खटाई किसी को नहीं दी जायेगी. यह तो संतोषी माता का प्रसाद है.’ लडके खड़े हो गये और बोले पैसा लाओ| वह भोली कुछ न समझ सकी उनका क्या भेद है| उसने पैसे दे दिये और वे इमली की खटाई मंगाकर खाने लगे. इस पर संतोषी माता ने उस पर रोष किया. राजा के दूत उसके पति को पकड़ कर ले गये. वह बेचारी बड़ी दुखी हुई और रोती हुई माताजी के मंदिर में गई और उनके चरणों में गिरकर कहने लगी ‘ हे ! माता यह क्या किया ? हँसाकर अब तूँ मुझे क्यों रुलाने लगी ?’ माता बोली पुत्री मुझे दुःख है कि तुमने अभिमान करके मेरा व्रत तोडा है और इतनी जल्दी सब बातें भुला दी. वह कहने लगी – ‘ माता ! मेरा कोई अपराध नहीं है. मुझे तो लड़को ने भूल में दल दिया. मैंने भूल से ही उन्हें पैसे दे दिये. माँ मुझे क्षमा करो मैं दुबारा तुम्हारा उद्यापन करुँगी.’ माता बोली ‘ जा तेरा पति रास्ते में आता हुआ ही मिलेगा.’ उसे रास्ते में उसका पति मिला. उसके पूछने पर वह बोला ‘ राजा ने मुझे बुलाया था ‘ मैं उससे मिलने गया था. वे फिर घर चले गये.
कुछ ही दिन बाद फिर शुक्रवार आया. वह दुबारा पति की आज्ञा से उद्यापन करने लगी. उसने फिर जेठ के लड़को को बुलावा दिया. जेठानियों ने फिर वहीं बात सिखा दी. लड़के भोजन की बात पर फिर खटाई माँगने लगे. उसने कहा ‘ खटाई कुछ भी नहीं मिलेगी आना हो तो आओ.’ यह कहकर वह ब्राह्मणों के लड़को को लाकर भोजन कराने लगी. यथाशक्ति उसने उन्हें दक्षिणा दी. संतोषी माता उस पर बड़ी प्रसन्न हुई, माता की कृपा से नवमे मास में उसके एक चंद्रमा के समान सुन्दर पुत्र हुआ. अपने पुत्र को लेकर वह रोजाना मंदिर जाने लगी.
एक दिन संतोषी माता ने सोचा कि यह रोज़ यहाँ आती है. आजमैं इसके घर चलूँ. इसका सासरा देखूं. यह सोचकर उसने एक भयानक रूप बनाया. गुड व् चने से सना मुख, ऊपर को सूँड के समान होठ जिन पर मक्खियां भिनभिना रही थी. इसी सूरत में वह उसके घर गई. देहली में पाँव रखते ही उसकी सास बोली ‘ देखो कोई डाकिन आ रही है, इसे भगाओ नहीं तो किसी को खा जायेगी.’ लड़के भागकर खिड़की बन्द करने लगे. सातवे लड़के की बहु खिड़की से देख रही थी. वह वही से चिल्लाने लगी ” आज मेरी माता मेरे ही घर आई है.’ यह कहकर उसने बच्चे को दूध पीने से हटाया. इतने में सास बोली ‘ पगली किसे देख कर उतावली हुई है, बच्चे को पटक दिया है.’
इतने में संतोषी माता के प्रताप से वहाँ लड़के ही लड़के नज़र आने लगे. बहू बोली ” सासूजी मैं जिसका व्रत करती हूँ, यह वो ही संतोषी माता हैं. यह कह कर उसने सारी खिड़कियां खोल दी. सबने संतोषी माता के चरण पकड़ लिए और विनती कर कहने लगे – “हे माता ! हम मूर्ख हैं, अज्ञानी है, पापिनी है, तुम्हारे व्रत की विधि हम नहीं जानती, तुम्हारा व्रत भंग कर हमने बहुत बड़ा अपराध किया है. हे जगत माता ! आप हमारा अपराध क्षमा करो.” इस पर माता उन पर प्रसन्न हुई. बहू को जैसा फल दिया वैसा माता सबको दें —

लिपीक ते मंत्री सारेच लाचखोर, सिंचन कंत्राटदारानं पाठवलं राज्यपालांना पत्र

सिंचनक्षेत्रातलं कंत्राट मिळवण्यासाठी कंत्राटदाराला कंत्राटातील 22 टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागत असल्याचा धक्कादायक खुलासा एका कंत्राटदारानं केला आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला नुकतेच उघड चौकशीचे आदेश मिळाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका ठेकेदारानं हा लाचखोरीचा गौप्यस्फोट केला आहे. या पुण्यातील कंत्राटदाराने यासंदर्भातील एक लांबलचक पत्रच राज्य सरकार आणि राज्यपालांना लिहीलं आहे. संपूर्ण कंत्राटातील 22 टक्के रक्कम ही सामान्य लिपिकापासून ते मंत्र्यांपर्यंत द्यावी लागत असल्याचा खुलासा या कंत्राटदारानं केला आहे. सिंचन विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसार या पैशातला योग्य तो वाटा योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला जातो. पण इतके पैसे खाऊनही अनेकदा अधिकारी आणि संबंधितांकडून अधिक पैशांची मागणी होतच असते असा आरोप या कंत्राटदारानं केला आहे. त्यामुळं सिंचनाच्या कामांमध्ये किती जणांचे हात बरबटले जातात, हेच सांगण्याचा प्रयत्न या ठेकेदारानं केला आहे. त्यामुळं लिपिकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत लाचखोरी प्रथा असेल तर, आता सिंचन घोटाळ्याच्या तपासाता यानुसार काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

सिंचनाचा पैसा असा पाण्यात जातो :
१. कंत्राटाच्या एकूण रकमेपैकी 22 टक्के रक्कम कंत्राटदारांना लाच म्हणून द्यावी लागते.
२. यात लिपिकापासून अधिकारी, अभियंते ते स्थानिक आमदाराच्या लायकीनुसार पैशांचं वाटप होतं.
३. मंजूर झालेल्या कंत्राटातील 10 टक्के वाटा हा रोख रकमेत कार्यकारी अधिकाऱ्याला देणं बंधनकारक आहे. आणि तोडपाण्याच्या वाट्याचं कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमध्ये समसमान वाटप होतं.
४. कंत्राट निविदांची जाहिरात कमी वाचकांसंख्या असलेल्या वृत्तपत्रात जाणून-बुजून दिल्या जातात.
५. अशा जाहिरातीत कंत्राटासंबंधीचा खर्च, फोन नंबर, पत्ते हे हेतूपुरस्करपणे छापले जात नाहीत.