सिंधुदुर्ग :-
महाराष्ट्राच्या सागरी किनार्यावर सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली. १६६४ मध्ये किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. ते सुमारे ३ वर्षे चालूच होते असा उल्लेख इतिहासात आढळतो. तसेच शिवाजी महाराजांनी पद्मगड, भगवंतगड, सर्जेकोट, भरतगड यांसारखे किल्ले बांधले. या सभोवतालच्या किल्ल्यांमुळे सिंधुदुर्गला अधिक सुरक्षा प्राप्त झाली व तो अधिक प्रबळ, अजिंक्य बनला. पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णा कालयवन या द्रविड राजाला शिताफीने चुकवून द्वारकेकडून सह्याद्रीकडे आले व त्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून कोल्हापूरकडे गेले. मायणातही ह्या प्रदेशाचा उल्लेख आहे. ह्या जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे काही शिलालेख सापडले आहेत. नेरुर येथे सापडलेल्या शिलालेखावरून प्राचीन काळी येथे चालुक्यांची सत्ता असावी असे अनुमान इतिहासकारांनी काढले आहे. स्वातंत्र चळवळीत ह्या जिल्हयाचा मोलाचा वाटा आहे. इ.स. १९३० मध्ये शिरोडे येथे झालेल्या मिठाचा सत्याग्रह. कोकण विभागातील दक्षिण भागाचा विकास जलद गतीने व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. १ मे, १९८१ रोजी, महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला. नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम असलेला जिल्हा म्हणजे ... सिंधुदुर्ग! अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यास जातो. आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे सागरीय उद्यान मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली विकसित होत आहे. राजा शिवछत्रपती हे पहिले व एकमेव सागरी उद्यान येथे आहे. सागरी किनार्यांसह पर्यटन, मत्स्योद्योग, काजू-आंबा या फळपिकांसह कृषी उद्योग, तसेच पवनउर्जा केंद्र आदी उद्योगांच्या व अन्य सुविधांच्या प्रगतीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा केवळ कोकणातीलच नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा ठरतो आहे.
ठाणे :-
ठाणे जिल्ह्याचा इतिहास हा साधारणपणे चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पुरातन काळ-प्रागैतिहासिक काळापासून ते इ.स. १३०० पर्यंत, मुस्लीम राजवटीचा काळ (इ.स. १३०० ते १६६०), मराठ्यांचा काळ (इ.स.१६६०-१८००) व ब्रिटिश काळ (इ.स. १८८०- १९४७). प्राचीन काळापासून येथील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही बंदरे महत्त्वाची आहेत. पश्र्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे इथली बंदरे होत. बौद्ध लिखाणांप्रमाणे सोपारा हे राजधानीचे शहर होते व गौतम बुध्दांच्या काळात व्यापाराचेही प्रमुख ठिकाण होते. शिलाहार युगात ठाणे शहराचे सुंदर व सुबक शहर असे अरबी खलाशांनी वर्णन केले आहे. शिलाहारांनी उत्तरी कोकणावर सुमारे ४०० वर्षे राज्य केले. त्या काळात वास्तुशिल्प व इतर कलांमध्ये या भागात खूप प्रगती झाली होती. तेराव्या शतकात देवगिरीच्या राजा रामदेव याच्या पुत्राची बिंब राजाची -सत्ता ठाणे परिसरावर होती. माहीम (त्यावेळचे बिंबस्थान) हे त्याच्या राज्याचे प्रमुख केंद्र होते. बिंब राजाचा सैनिकी तळ माहिमजवळच्या भागात होता. या सैनिकी तळाला ‘स्थानक’ असे म्हणत. या ‘स्थानक’ चा अपभ्रंश होत, या परिसराला ‘ठाणे’ असे नाव पडले. हे उल्लेख बॉंबे जिऑग्राफिकल सोसायटीच्या अहवालात (१९३६) सापडतात. इ.स. १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये झालेला तह ‘वसईचा तह’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या तहामुळे मराठी सत्ता जवळजवळ संपुष्टात आली, पेशवाईचा अंतकाल अधिक जवळ आला. या तहात पेशव्यांनी तैनाजी फौजेचा स्वीकार केला व एक प्रकारे इंग्रजांना सत्तेचे दरवाजे खुले केले. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त, अनेकविध, बहुढंगी वैशिष्ट्ये असलेला जिल्हा असे ठाणे जिल्ह्याचे वर्णन करावे लागेल. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्यामुळे जिल्ह्याला किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रीची रांग आहे, जिल्हा जंगलांनीही समृद्ध आहे. येथे वारली, ठाकर, कातकरी इत्यादी आदिवासी जमातींची संख्याही मोठी आहे. एका बाजूने खास वैशिष्ट्यांचा कोकण जिल्ह्याला जवळ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे शहर व जिल्ह्याला देशाच्या आर्थिक राजधानीचे, मुंबईचे सान्निध्य लाभले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक विकास साधला गेला आहे. त्याचबरोबर या भागाचे नागरीकरण झपाट्याने व मोठ्या संख्येने झाले आहे. एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची घनता याबाबत ठाणे राज्यात आघाडीवर (पहिल्या तीन जिल्ह्यात) असून हा सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे.
यवतमाळ :-
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे. अकबराच्या दरबारातील अबूल फजल याने लिहिलेल्या ‘ऐन-ई-अकबरी’ मध्ये यवतचा ‘योत-लोहार’ असा उल्लेख आढळतो. लोहार हे यवतमाळच्या पश्चिमेस पाच कि.मी. अंतरावर असलेले खेडेगाव असून ‘योत’ हा यवताचा उर्दू अपभ्रंश असावा. गोंड, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता विविध कालखंडांत यवतमाळवर होत्या. ब्रिटिश काळात वर्हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना झाली. त्या वेळी हा जिल्हा ‘वणी’ किंवा ‘ऊन’ या नावाने ओळखला जात असे. १९०५ मध्ये या जिल्ह्याचे यवतमाळ असे नामांतर झाले. १९५६ पर्यंत हा जिल्हा मध्यप्रदेश राज्यात होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत हा जिल्हा मुंबई राज्यात, तर दिनांक १ मे, १९६० पासून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा ही यवतमाळ जिल्ह्याची प्रमुख ओळख आहे. मुबलक प्रमाणात सापडणारा चुनखडक हेही जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य! वैशिष्ट्यपूर्ण अशा कोलाम जमातीचा निवास हे जिल्ह्याचे वेगळेपण होय. या जिल्ह्याने लोकनायक अणे यांच्यासारखे नररत्न भारताला दिले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दीर्घकाळ राहून राज्याच्या विकासासाठी प्रयत्न
करणारे वसंतराव नाईक हेदेखील याच जिल्ह्यातले होत.
पालघर :-
पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काहीतालुके वेगळे करून १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यातआला. सागरी, डोंगरी व ग्रामिण अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना पालघर जिल्ह्याला लाभली आहे.या जिल्ह्यात सागरी किणारा लाभलेला डहाणू, पालघर, वसई हे तालुके तसेच औद्योगिक दृष्ट्या विकसित असा वाडा व पालघर तालुका तसेच अति दुर्गम डोंगरी भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी हे तालुके असे एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्याला ७० कि.मी. चा अरबी समुद्र किणारा लाभला असून वैतरणा, उल्हास, देहराज, पिजाळ, सूर्या व तानसा या प्रमुख नद्या वाहतात. येथील हवामान उष्ण व दमट असून पर्जन्यमान सरासरी २००० ते ३५०० मि.मि. एवढे आहे. त्यामुळे येथे तानसा व सूर्या या धरणाचा लाभ घेता येतो. सन २०११ च्या जनगणनेनुसारजिल्ह्याची लोकसंख्या ३०,१४,४३४ लोकसंख्या असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या १,०१,५५१एवढी आहे.जिल्ह्यात ८ तालुके असून ८ पंचायत समित्या ४७७ ग्रामपंचायती आहेत.देशातील वीज निर्मिती करणारा पहिला अणुउर्जा प्रकल्प पालघर जिल्हयातील पालघर तालुक्यात तारापूर येथे आहे.अर्नाळा, केळवा, डहाणू (सागरी), वसईचा भुईकोट किल्ला,जव्हारचा राजवाडा इ. ऐतिहासिक किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत. पालघर तालुक्यातील शितलादेवी मंदिर, डहाणू तालुक्यातील श्री.महालक्ष्मी माता मंदिर, आशागड येथिल संतोषी माता मंदिर, नरपडचे साईबाबा मंदिर, सावटा येथिल शिवमंदिर; वसई तालुक्यातील जीवदानी माता मंदिर; वाडा येथिल केळस्वेश्वर मंदिर अशी देवस्थाने जिल्ह्याला लाभली आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दाभोसा धबधबा, छोटे महाबळेश्वर (सन सेट पोईंट); पालघर तालुक्यातील वाघोबा खिंडीतील धबधबा, सातीवली कुंड असे निसर्गरम्य ठिकाण लाभलेले आहे.
अकोला
हा जिल्हा वाशिम (दक्षिणेला), अमरावती (उत्तरेला व पूर्वेला), बुलढाणा (पश्र्चिमेला) या जिल्ह्यांशेजारी येतो. जिल्ह्याचे हवामान विषम व कोरडे आहे. म्हणजे उच्चतम व नीचतम तापमानातील फरक येथे जास्त असतो. जिल्ह्यात पूर्णा ही मुख्य नदी आहे. काटेपूर्णा, मोर्णा, मन व उमा ह्या तिच्या उपनद्या आहेत. काटेपूर्णा ही पूर्णेची सर्वांत मोठी उपनदी आहे. काटेपूर्णा नदीवर बार्शी - टाकळी तालुक्यात एक सिंचन प्रकल्प आहे. तेल्हारा तालुक्यात बारी-भैरवगड येथे असलेला ‘वान’ प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलसिंचन प्रकल्प असून ह्या प्रकल्पाचा प्रभाव फक्त अकोला जिल्ह्यापुरताच सीमीत नाही, तर त्याचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील शेतीलाही होतो. अर्थात ह्या प्रकल्पांखेरीज जिल्ह्यात विहीरींच्या माध्यमातूनही सिंचनाच्या गरजा भागवल्या जातात. अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना विदर्भातील ज्येष्ठ राजकीय नेते डॉ. पंजाबराव देशमुख हे त्यांच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री होते. त्यामुळे योग्य ते
औचित्य साधून त्यांचेच नाव विद्यापीठाला देण्यात आले. जिल्ह्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था लक्षात घेता, पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये ज्वारी, गहू, तूर, कापूस व संत्रे या पिकांसंबंधी संशोधन करण्यात येते. तसेच पशुपालन, फळबाग लागवड व पिकांवरील रोगराई हे देखील संशोधनाचे विषय आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी अभियांत्रिकी, कृषी तंत्रज्ञान, जमीन व जलसंधारण, जलसिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) चे मुख्यालय अकोला येथे आहे. एप्रिल, १९७६ रोजी या संस्थेची स्थापना अकोल्यात करण्यात आली. अन्नधान्य व इतर बी- बियाणांबाबत संशोधन, विकास व निर्मितीचे कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. अनुकूल हवामान व मृदा
(जमीन) यांमुळे हा जिल्हा कापूस उत्पादनात नेहमीच अग्रेसर असतो. कापूस हेच जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ४०% एवढे आहे. ज्वारी, मूग, तूर ही जिल्ह्यातील खरीपाची प्रमुख पिके असून, गहू, हरभरा ही प्रमुख रब्बी पिके आहेत. खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला महाराष्ट्रात आघाडीवर असणार्या जिल्ह्यांपैकी एक आहे. संत्री हेदेखील जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पीक असून मिरची व ऊसाचे पीकही ह्या जिल्ह्यात घेतले जाते.

औरंगाबादजिल्ह्याला जळगाव, जालना, बीड, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांनी वेढलेले आहे. जिल्ह्याचा मध्य व उत्तर भाग डोंगराळ असून, अजंठा-सातमाळ्याचा रांगांनी बनलेला आहे. जिल्ह्याचा उर्वरीत भाग सपाट आहे. गोदावरी ही जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. बाकीच्या वाहणार्या गोदावरीच्याच उपनद्या आहेत. पूर्णा, तापी,
शिवना, कौम, केळणा, बुधना या गोदावरीच्या सर्व उपनद्या जिल्ह्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. गोदावरीची औरंगाबाद जिल्ह्यातील लांबी सुमारे २०० कि. मी. आहे. जायकवाडी प्रकल्प - गोदावरी नदीवर पैठणजवळ उभारण्यात आलेला जायकवाडी हा राज्यातील सर्वांत मोठा बहुउद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जायकवाडी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत मानाचे स्थान असलेला आणि मराठवाड्याचे भूषण ठरलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम १९६५ ते १९७६ या दरम्यान पूर्ण झाले. येथील जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या सर्व जिल्ह्यांना जायकवाडी प्रकल्पामुळे सिंचनाचा लाभ मिळतो. या ठिकाणी जलविद्युत केंद्रही असून, येथे १२ मेगावॅट वीज निर्माण केली जाते. अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा व सौरशक्ती या क्षेत्रात महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधे औरंगाबादचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. याशिवाय जिल्ह्यात शिवना नदीवर कन्नड तालुक्यात गडदगड येथे व सिल्लोड तालुक्यात खेळणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे. बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ऊस हे ओलिताखालील महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय कापूस, मूग, तूर, उडीद,सूर्यफूल व सोयाबीन ही पीकेदेखील घेतली जातात. त्याचबरोबर गहू, हरभरा, ज्वारी व सूर्यफूल ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात.दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.

बीडमहाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील, राज्याच्या साधारण मध्यभागी असलेला हा जिल्हा; जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांनी वेढलेला आहे. बीडच्या उत्तरेकडे गंगथडी म्हणून ओळखला जाणारा गोदावरी खोर्याचा सखल भाग आहे. व दक्षिणेकडे मांजरा खोर्याचा भाग आहे. हा जिल्हा म्हणजे गोदावरी - मांजराचे खोरे होय. जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा. याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून
वाहतात. जिल्ह्यात दोन मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत. १. सिंदफणा नदीवरील माजलगाव प्रकल्प २. मांजरा नदीवर केज तालुक्यात मांजरा प्रकल्प. तसेच अंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर व पाटोदा तालुक्यात सिंदफणा नदीवर प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत. बीड हा कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पिक असून ते खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेतले जाते. गंगथडी (गोदावरीचे खोरे) परिसरात घेतली जाणारी रब्बी ज्वारी ‘टाकळी ज्वारी’ म्हणून ओळखली जाते. खरीपातील कापूस, बाजरी, मूग, तूर, व भूईमुग ही महत्त्वाची पिके होत व महत्त्वाची रब्बी पिके गहू, हरभरा व करडई होत. ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती पिक असून अलीकडील काळात साखर कारखान्यांमुळे उसाखालील क्षेत्र वाढत आहे. ऊस तोडणीच्या हंगामात बरेच शेतकरी बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात व अनेकदा इतर जवळपासच्या जिल्ह्यांत किंवा क्वचित कर्नाटकमध्येही ऊस तोडणी कामगार म्हणून स्थलांतर करतात. याशिवाय सूर्यफूल, द्राक्ष, आंबा व कलिंगडाचे पीक जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यातील नेकनूर परिसरातील ‘कालापहाड’ व अंबेजोगाईमधील ‘पेवंदी’ या जातीचे आंबे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.

बुलढाणाविदर्भातील अमरावती विभागातील हा जिल्हा अत्यंत कोरड्या व उष्ण हवेचा आहे. बुलढाण्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असून, सातपुड्याच्या रांगाही जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. दख्खनच्या पठारापैकीच हा बेसॉल्टच्या खडकांनी बनलेला भाग असून, कठीण, काळ्या बांधाचा दगड,काळी भोर माती असणारा हा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या एका सीमेलगत मध्यप्रदेश राज्याची सीमा येते, तर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना आणि जळगाव हे जिल्हे बुलढाण्याच्या सभोवती वसलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे १०% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे. अजिंठा डोंगररांगा व पूर्णा नदीखोर्यात जंगले आढळतात. या जंगलांत साग, अंजन, बाभूळ, सालई, आंबा, चिंच, बोर, तिवस इ. प्रमुख वृक्ष आढळतात. गेरुमाटरगाव (तालुका खामगाव) येथील वनांमध्ये चंदनाची झाडे आहेत. अंबाबरवा थंड हवेच्या ठिकाणी राखीव वनांत बांबूची लागवड करण्यात येत आहे. वनश्रीने नटलेल्या या निसर्गरम्य बुलढाणा शहराजवळूनच पैनगंगा संथपणे आपला प्रवास करते.जिल्ह्यात पूर्णा ही महत्त्वाची नदी असून विश्वगंगा, नळगंगा, बाणगंगा, निपाणी, ज्ञानगंगा, बोर्डी या पूर्णेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या उत्तरेकडील बराचसा भाग पूर्णा नदीच्या खोर्याने व्यापला असून त्यास पयनघाट असे म्हणतात. तर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भाग पैनगंगेच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. त्यास बालाघाट म्हणतात. शेलापूरचा नळगंगा नदीवरील नळगंगा प्रकल्प, गेरुमाटरगांवजवळचा ज्ञानगंगा प्रकल्प, कोराडीनाला व मन प्रकल्प हे बुलढाणा जिल्ह्यातील उल्लेखनीय प्रकल्प आहेत. जिल्ह्यात अनेक मध्यम व छोटे सिंचन प्रकल्प आहेत, तर आणखी काही प्रकल्प नांदूरा, संग्रामपूर व मेहकर तालुक्यात (खडकपूर्णा, मन, पैनगंगा, पूर्णा या नद्यांवर) होणार आहेत. मोताळा तालुक्यातील नळगंगा, व संग्रामपूर तालुक्यातील वाण प्रकल्प यांमुळे एक चतुर्थांश अकोला जिल्ह्याला पाणी मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ११.१० टक्के लोकसंख्या शहरात राहते, तर ७८.८० टक्के लोकसंख्या खेड्यात रहाते. यावरून लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेती आधारित उद्योग असल्याचे लक्षात येते. तसेच हा जिल्हा ग्रामीण बाजाचा, कमी शहरीकरण झालेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. कडक उन्हाळा आणि अतिशय थंडी असणारऱ्या बुलढाण्यात पाऊस मात्र मध्यम पडतो. दक्षिणेकडे ७५ ते १०० सें.मी. तर उत्तर भागात ६० ते ७५ सें.मी. पाऊस पडतो. जिल्ह्यात
ज्वारी, तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात. कापूस (नगदी पीक) मोठ्या प्रमाणात घेतला जातो. विड्याच्या पानांचे पीकही घेतले जाते. अन्नधान्यांपैकी ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे.

चंद्रपूरजिल्ह्याच्या उत्तरेस - भंडारा व नागपूर जिल्हा, दक्षिणेस - अदिलाबाद जिल्हा (आंध्रप्रदेश), पूर्वेस - गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस - यवतमाळ जिल्हा- हे जिल्हे वसलेले आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात चंद्रपूर जिल्हा आहे. २६ ऑगस्ट, १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा तर भारतातील दुसर्या क्रमांकाचा जिल्हा होता. याच दिवशी या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले व चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या नैऋत्य कोपर्यात डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा मंद उताराचा असून अधूनमधून डोंगररांगा व टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा-वैनगंगा खोर्याचा प्रदेश व चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी जमातींची आहे. त्यामुळे हा जिल्हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथील दाट जंगलांच्या व डोंगराळ भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक रहातात. परधान या जमातीचे लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या ‘माडिया गोंड’ या आदिवासी जमातीचे लोकही या जिल्ह्यात आढळतात वनक्षेत्र - चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसर्या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. विविध प्रकारच्या वन उत्पादनांनी समृद्ध असा हा जिल्हा आहे. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुले ही येथील प्रमुख वनउत्पादने आहेत. चिरोल आणि नवेगाव टेकड्यांवर असलेला परिसर ‘आलापल्ली अरण्य’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. समृद्ध खनिजसंपत्ती - महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस व बल्लारपूर; राजुरा तालुक्यात साष्टी; भद्रावती तालुक्यात माजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, व असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहार डोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बर्याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच ग्रॅनाइट, वालुकाश्म, जांभा यांसारखी खनिजे व खडकही जिल्ह्यातील काही भागांत आढळतात. प्रमुख नद्या, धरणे आणि तलाव - बारमाही पाणी असलेली वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पुढे ही नदी पैनगंगा व वैनगंगा या दोन नद्यांना जाऊन मिळते. इरई ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे. जिल्ह्यात मोठी धरणे फारशी नाहीत. सिंदेवाही तालुक्यात असोलमेंढा येथे, नागभीड तालुक्यात नळेश्वर व घोडेझरी येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे काही धरणे आहेत. महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या भागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो. या जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा ताडोबा तलाव आहे. तसेच घोडेझरी तलाव व असोलमेंढा तलावही आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे ‘भात’ हे प्रमुख पीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तीळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे १२१४ मि.मी. इतके आहे.
धुळेदिनांक १ जुलै, १९९८ ला मोठ्या धुळे जिल्ह्याचे विभाजन धुळे व नंदुरबार अशा दोन जिल्ह्यात करण्यात आले. नंदूरबार हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल जातो. धुळे जिल्ह्यातदेखील केवळ २६.११ टक्के शहरी लोकसंख्या आहे. राज्याच्या उत्तर - पश्र्चिम भागात असलेल्या या जिल्ह्याच्या उत्तरेला नंदुरबार व मेवाड जिल्हा (मध्य प्रदेश); पूर्वेला जळगाव जिल्हा, दक्षिणेला नाशिक; आणि पश्र्चिमेला नंदुरबार व गुजरातचा काही भाग - अशी जिल्ह्यांची रचना आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी तापी ही ह्या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. तसेच पांझरा, बुराई, अनेर, अरुणावती याही नद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्यात विहीर, तलाव, नद्या हीच पाणी पुरवठ्याची प्रमुख साधने आहेत. नद्यांवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. जिल्ह्यात पांझरा नदीवर सय्यदनगर, अक्कलपाडा, बुराई नदीवर फोफर आणि अनेर नदीवरील धरण - अशी धरणे आहेत. तापी नदीच्या काठावर अनेक ठिकाणी उपसा जलसिंचन योजना कार्यन्वित केलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जलसिंचनासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा नदीजोड प्रकल्प धुळे जिल्ह्यांतर्गत राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात साक्री व शिरपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर जंगले आहेत. साग, खैर, शिसव, अंजन, बाभूळ असे विविध प्रकारचे वृक्ष येथील जंगलांत आहेत. मध, मेण, डिंक, चारोळे ही येथील वनोत्पादने आहेत. येथील काही भागांत बांबूही आढळतात. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुड्याची पर्वत रांग आहे. तसेच जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात धानोर्याचे डोंगर आहेत. यालाच जोडून पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी गाळण्याची डोंगर रांग आहे. जिल्ह्यात सुमारे ३.९५लाख हेक्टर जमीन कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच ज्वारी, बाजरी, तीळ, कापूस व मूग ही पिके देखील जिल्ह्यात घेतली जातात. केळी, पपई, पेरू, खरबूज यांसारख्या फळांचेही उत्पादन येथे होते.
गोंदियाभौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा महाराष्ट्राला मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) व छत्तीसगड (राजनंदनगाव जिल्हा) या राज्यांना जोडतो. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याचा प्रदेश आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे आहेत. प्रमुख नदी ही वैनगंगा असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमाप्रदेशातून वाहते. बाघ ही तिची प्रमुख उपनदी असून, ईशान्य सीमाभागातून वाहते. याशिवाय बावनथडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या वैनगंगेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. डोंगराळ प्रदेश, विषम हवामान, विविध प्रकारची जमीन (माती), अनेक नद्यांनी व जैवविविधतेने समृद्ध असणारा हा गोंदिया जिल्हा आपणास निसर्गाची अनेक रूपे दाखवितो. जिल्ह्यात नवेगाव बांध हा जिल्ह्यातील तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव आहे. या तलावासह माजागड, रेंगोपार, चूलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच जलसिंचनाचेही कार्य साधतात. अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील, गाढवी नदीवरील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वाधिक
महत्त्वाचा प्रकल्प (धरण) आहे. याची क्षमता सुमारे ३१८ क्यु. मी. आहे. जिल्ह्यात शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगढ, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत. खनिज संपत्तिच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनेडियम ही खनिजे सापडतात. लोकसंख्येच्या तपशिलावरून हा जिल्हा कमी नागरीकरण झाल्याचे दिसते. ग्रामीण जिल्हा’ (म्हणजे मागासलेला नव्हे) हेच याचे वैशिष्ट्य आहे. तसेच दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जास्त असलेले प्रमाण हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला जातो. हा जिल्हा अर्थातच शेतीप्रधान आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० ते ७५% लोकसं‘या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे व जलसिंचनाच्या सोयीही आहेत. त्यामुळेच भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातासह तूर व उडीद ही पीके खरीप हंगामात घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, जवस व हरभरा ही पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली जातात. जिल्ह्यातील तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती उत्तम चालते. इटियाडोह (तालुका-अर्जुनी मोरगाव) व आंभोरा (तालुका - गोंदिया) येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्य करतात. तसेच जिल्ह्यात काही प्रमाणात ऊसही घेतला जातो. वैनगंगा सहकारी साखर कारखाना तिरोडा तालुक्यात माडगी येथे आहे.

हिंगोली
हिंगोली हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागातील (दक्षिण- पूर्व कोपर्यातील) जिल्हा आहे. हिंगोलीच्या उत्तरेला वाशिम, पूर्वेला यवतमाळ व नांदेड; दक्षिणेला परभणी व नांदेड; पश्र्चिमेला जालना व परभणी आणि वायव्येला बुलढाणा - हे जिल्हे आहेत. राज्याच्या एकूण भू-भागापैकी जवळजवळ १.५७ % भू-भाग या जिल्ह्याच्या वाट्याला आला आहे.हिंगोली जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग वगळता बराचसा भाग डोंगराळ असून जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याची डोंगररांग पसरलेली आहे.या डोंगररांगांना हिंगोली टेकड्या असे म्हटले जाते. जिल्ह्याचा दक्षिण भाग हा मैदानी प्रदेशाचा असून या भागातून पैनगंगा, पूर्णा, आसना व कयाधू या महत्त्वाच्या नद्या वाहतात. पैनगंगा ही नदी सेनगाव व कळमनुरी तालुक्यातून वाहते. पूर्णा ह्या महत्त्वाच्या नदीच्या पाण्याचा लाभ शेतीस व्हावा यासाठी येथे १९५७ मध्ये येलदरी धरण प्रकल्प मंजूर करण्यात आला. या धरणाची ८०९.२६३ टी. एम. सी इतके पाणी साठविण्याची क्षमता आहे. शिवाय १५००० किलोवॅट क्षमतेचे जिल्ह्यातील एकमेव जलविद्युत केंद्र याच धरणावर आहे. जिल्ह्यातील दुसरे प्रमुख धरण म्हणजे औंढा-नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण होय. याचा वापर फक्त जलसिंचनासाठी केला जातो. अप्पर पैनगंगा धरणाचा कळमनुरी तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी फायदा होतो. जिल्ह्यातील विहिरींची मोठी संख्या व येलदरी आणि सिद्धेश्वर ह्या धरणांमुळे हिंगोली या शेतीप्रधान जिल्ह्याची सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी पीक जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. जिल्ह्यात ऊसाची लागवड वाढत आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यात सिंचनाची सोय असल्याने या तालुक्यांमध्ये हे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. केळी, द्राक्षे, मिरची व लसूण ही पिकेसुद्धा हिंगोलीत काही प्रमाणात घेतली
जातात. हिंगोलीतील मोठे क्षेत्र डोंगराळ आहे. या भागातील जमीन मध्यम व हलक्या प्रतीची आहे. नदीखोर्यातील जमीन मात्र कसदार आहे. जिल्ह्यातील काही भागातील जमीन ओलावा टिकवून ठेवणारी आहे. त्यामुळे रब्बी हंगामात ही जमीन (मृदा) उपयुक्त ठरते.

जळगावजळगाव जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला बुलढाणा, दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येला नाशिक, पश्र्चिमेला धुळे जिल्हा - असे जिल्हे वसलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतीची प्रगती ही तेथे उपलब्ध असणार्या जलसंपदेमुळेच होय. तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती मध्य प्रदेश राज्यात उगम पावते. ह्या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही नदी इतर नद्यांसारखी पश्चिम घाटातून बंगालच्या उपसागराला न मिळता, पश्चिमेकडे
वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. (ही नदी पश्र्चिमवाहिनी आहे.) शेती विकासासाठी व पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी, जळगाव जिल्ह्याने, अनोखा असा नदीजोड प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, पायलट (पथदर्शी) प्रकल्प म्हणून यशस्वीदेखील करून दाखविला आहे. २००५-०६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण भरल्यानंतर वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी बोरी, भोकरबारी, म्हस्वा व इतर धरणात वळविण्यात आले. हे पाणी बोरी, तितूर, अंजनी या नद्या नाल्यांना जोडून पुनर्भरण करण्याची कार्यवाही करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात या नदी जोड प्रकल्पामुळे ७०० मध्यम, लघु प्रकल्पबंधारे व गाव तलावांचे पुर्नभरण झाले व १६००० हून अधिक विहिरींना पाणी लागले.यावरून प्रकल्पाची यशस्वीता स्पष्ट दिसते. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. त्या-त्या काळात कहक थंडी व अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या भागात असते. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर (मध्य प्रदेशास लागून) सांतपुडा पर्वतरांगा असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे. याच भागात यावल तालुक्यात अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. या अभयारण्यात प्रामु‘याने हरणे व नीलगाई अधिक प्रमाणात आढळतात. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक सहकारी संघानुसार (महा बनाना) राज्यातील केळीच्या लागवडीखालील जमिनीपैकी ६६% जमीन (४९,००० हेक्टर ) ही फक्त जळगाव जिल्ह्यातच आहे. आंतरराष्ट्रीय केळी निर्यातीसाठी रावेर येथे विशेष केंद्राची उभारणी लवकरच करण्यात येणार आहे. रावेर व यावल हे तालुके केळ्यांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. केळी उत्पादनाखालोखाल जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत कापसाच्या उत्पादनास विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे २०% क्षेत्र कापसाखाली आहे. जामनेर, चोपडा, एरंडोल, पाचौरे, भुसावळ हे कापसाच्या दृष्टीने महत्त्वाचे तालुके आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भुईमूग व डाळवर्गीय पिके प्रामुख्याने घेतली जातात. तर गहू, हरभरा व ज्वारी ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात. जिल्ह्यात अन्नधान्य पिकांमध्ये ज्वारी हे सर्वांत महत्त्वाचे पीक होय. तेलबियांच्या उत्पादनातदेखील जिल्हा आघाडीवर आहे. चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल व पारोळे या तालुक्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला सांगली जिल्हा, पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा आणि पश्र्चिमेला रत्नागिरी व सिंधूदूर्ग हे जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग दख्ख्ननच्या पठाराने व्यापलेला आहे. डोंगराळ पश्र्चिम सीमेमुळे येथील हवामान सर्वसाधारणपणे थंड आहे. पण पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जाताना हवामान उष्ण व कोरडे होत गेल्याचे जाणवते. येथे पाऊस असमान प्रमाणात पडतो. डोंगराळ तालुक्यांमध्ये (पश्र्चिमेकडील) तो जास्त पडतो. मध्य व पूर्व भागाकडे जसजसे जावे ,तसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वारणा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. कासारी, कुंभी, भोगावती व तुळशी या नद्यांची मिळून पुढे पंचगंगा नदी बनते. या चार नद्यांसह पाचवी सरस्वती ही गुप्त नदीही अस्तित्वात असल्याचे मानले जाते. पाच नद्यांचा एकत्रित प्रवाह म्हणून त्यास पंचगंगा हे नाव पडले. कृष्णा- पंचगंगेचे खोरे व वारणा नदीचे खोरे यांमुळे कोल्हापूर जिल्हा समृद्ध बनला आहे. मलप्रभा, ताम्रपर्णी व तिल्लारी याही महत्त्वपूर्ण नद्या जिल्ह्यातून वाहतात. फेजीवडे गावाजवळ (राधानगरी तालुका) भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आले आहे. राजर्षी शाहूंच्या काळात याचे बांधकाम सुरू करण्यात आले व १९३५ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. या प्रकल्पावर १० मेगावॅटचा जलविद्यूत प्रकल्पही आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांमधील संयुक्त प्रकल्प-काळम्मावाडी धरण- दूधगंगा नदीवर आसनगाव येथे उभारण्यात आला आहे. तसेच चंदगड तालुक्यात तिल्लारी नदीवर जलविद्यूत प्रकल्प उभारण्यात आला आहे. सांगली व कोल्हापूरच्या सीमावर्ती भागात चांदोली (शिराळा तालुका, जिल्हा सांगली) व आंबोली (शाहुवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर) या गावांजवळ वारणा नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांना फायदेशीर ठरतो आहे. याशिवाय अनेक छोटे प्रकल्प जिल्ह्यात आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे ‘कोल्हापूर बंधारे’ संपूर्ण महाराष्ट्रात जलसिंचनाचे उत्कृष्ट साधन म्हणून प्रसिद्ध आहेत. राधानगरीच्या जवळच दाजीपूर येथे गव्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. हे कोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असून, राधानगरी धरणाच्या जलाशयामुळे तसेच पश्र्चिमेकडील डोंगररांगा व घनदाट जंगलांमुळे या अभयारण्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील भागात जांभा (लॅटराईट) प्रकारची माती किंवा खडक सापडतो. जिल्ह्याच्या मध्य भागात तपकीरी रंगाची सुपीक जमीन आढळते. तसेच पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात अधिक काळी कसदार जमीन आढळते. जिल्ह्यातील मातीमधे फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळेच त्याचा उपयोग तंबाखू व उसासाठी होतो. जिल्ह्यात प्रामुख्याने बॉक्साईट खनिजाच्या खाणी (शाहूवाडी, राधानगरी, चंदगड) आढळतात. याचबरोबर लोह व सिलिका ही खनिजेदेखील आढळतात. तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत ते मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. ऊस हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. त्याचप्रमाणे कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दर हेक्टरी खतांचा सर्वांत अधिक वापर करणारा हा जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे. कृषी मालाची विक्री, कृषिविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.