Translate

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

यात दलित समाजाची काय चूक आहे?

गेली ६० वर्षे निरंकुश एका समाजाकडे सत्ता असून सुद्धा मराठा समाजाचा विकास झाला नाही. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती.. त्याची पार वाट लागली. हे करणारे मराठा जातीचे नेते आहेत तरीसुद्धा संपूर्ण जातीने एकत्र येऊन त्यांना जाब कधीच विचारला नाही. आज सुद्धा जाब विचारला जात नाही.. फक्त मूक मोर्चे निघत आहेत... तुम्ही अस्तनीत साप पाळले आहेत.. त्यांना कधीतरी बाहेर काढून फेकून द्या.. या संपूर्ण मूक मोर्च्याच्या शेवटी फक्त एक घोषणा द्या... या पुढे आम्ही जात न पाहता गुणवत्ता पाहून मतदान करू... शरद पवार सकट सगळी मंडळी हातातील काम टाकून पाया पडायला येतील. संपूर्ण सहकार मराठयांच्या ताब्यात आहे.. शरद पवार तर कबड्डी, कुस्ती, क्रिकेट ( आत्ता सोडले ) कमीत कमी १००० संस्थांवर तरी अध्यक्ष आहेत.. अगदी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेवर सुद्धा... सगळ्या मराठा नेत्यांना एक व्यक्ती एक पद हा नियम कंपल्सरी राबवा म्हणून दबाव आणा... खोटे सांगत नाही.. जन्मभर सतरंजी उचलणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षातील कमीत कमी १०००० मराठा तरुणांना कायमचा रोजगार मिळेल.. इतक्या खुर्च्या एकेका नेत्याने बुडाखाली दाबून ठेवल्या आहेत.. शरद पवार तर ज्या संस्थेत असतात तिथे निवडणूक होते तिला सुद्धा हजर राहणे त्यांना कामामुळे शक्य होत नाही तरी ते निवडून येतात. सगळे मराठा पदाधिकारी इतके लाचार का आहेत..?
महर्षी कर्वे यांनी जन्मभर पायी फिरून लोकांच्या कडून एक एक आणा जमा करून संस्था उभ्या केल्या.. तेच कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुद्धा.. मग त्यांच्या संस्थात किंवा इतर सगळ्याच शिक्षण संस्थात मराठा जातीचे नेते.. मग जातीतील गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण का देत नाहीत हा प्रश्न कधीतरी जाऊन विचारा की ? प्रत्येक वेळेला कायदाच करावा असे कोणी सांगितले आहे.. डी वाय पाटील आणि पतंगराव कदम यांच्या संस्थात किती मराठा मुलांना गरीब आहे म्हणून विनामूल्य शिक्षण मिळते.. सरकारी कोटा सोडला तर ? मराठा जातीचे नेते आहेत.. ना ? मग जातीतील मुलांसाठी इतके पण करू शकत नाही का? मराठा नेत्यांना घेराव घाला.. म्हणजे सन्मानाने जगण्याचा मार्ग प्रत्येकाला सापडेल. आणि तो मार्ग सापडला कि आरक्षणाचेे डोहाळे पण लागणार नाहीत.. मौन सोडा.. आणि मराठा जातीच्या नेत्यांना शब्दांनी सोलवटून काढा... यात तुमचे आणि महाराष्ट्राचे पण भले आहे...--------खूप उशीर झाला साहेब !--------
खरंच खूप उशीर झाला, मोठे साहेब आणि कोकणचे साहेब...
वेळीच करुणेचा पाझर फुटला असता तर मराठा समाजाचं भलं झालं असतं, आज कळकळ व्यक्त करण्याची वेळ तुम्हा दोघांवरही आली नसती.
साहेब, लवासात मराठा शेतकय्रांच्या जमिनी जात असतांना बोलला असतात तर किती बरं झालं असतं!
कोकणचे साहेब, महामुंबई SEZ आठवतोय का? तुम्हीच जमिनी संपादित करून दिल्या ना रिलायन्सला, त्या मराठा शेतकय्रांच्या जमीनी होत्या. तुम्हाला तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक दुरावस्था लक्षात आली असती तर किती बरं झालं असतं! दहा वर्ष सरकार होतं तुमचं तेंव्हा किती मराठा शेतकय्रांना आत्महत्त्या करून जीवन संपवावं लागलं याचा हिशेब ठेवला असता तर फार बरं झालं असतं.
सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असते तर पंचवीस तीस हजार किंवा कदाचित लाखभर तरी मराठा शेतकरी आत्महत्त्या करण्या पासून वाचले असते. दुर्दैव मराठा शेतकय्रांचं की त्यावेळी तुम्हा कंत्राटदारांच्या बाजूनं होता. दहा वर्षात किती पाणी दिलंत बहुसंख्य मराठाच असलेल्या शेतकय्रांना? १ टक्का की दीड टक्का?
सोळासोळा तासांच्या भारनियमनात किती मराठाच असलेल्या शेतकय्रांची पीकं होरपळली असतील साहेब? काही अंदाज?
दोन्ही साहेब मंडळी, रात्रीच्या अंधारात, रात्री दीड वाजता विधानसभेत तुमच्या सरकारनं चोरपावलानं पाणी वाटपाचा अग्रक्रम बदलला नव्हता का? शेतीचं पाणी उद्योगांना देण्यासाठी ? कशात मराठा समाज जास्त आहे साहेब? शेतीत की उद्योगात?
पाणी मागितलं तेंव्हा मावळच्या शेतकय्रांना तुमच्या सरकारनं गोळ्या घातल्या साहेब, त्यात बहुसंख्य शेतकरी मराठा नव्हते ?
सगळ्यांचा अन्नदाता असलेल्या समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ कोणी आणली साहेब मंडळी ? एकदा तरी विचार कराच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा