Translate

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'चार नगरातील माझे विश्व' या आत्मचरित्रासाठी जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जयंत नारळीकर यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात केलेलं काम मोठं तर आहेच, पण या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या साहित्य मुशाफिरीचाही गौरव करण्यात आला आहे. पन्नासहून अधिक देशांत जयंत नारळीकरांचा नैमित्तिक संचार झाला असला तरी वाराणसी, केंब्रिज, मुंबई आणि पुणे असे नारळीकरांच्या जीवनमार्गाचे चार प्रमुख टप्पे आहेत. हा चार नगरातच प्रामुख्याने त्यांच्या जीवनाला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला, त्या आठवणींचा या पुस्तकात समावेश आहे. तसंच कोंकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारसाठी माधवी सरदेसाय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 'मंथन' या लेखसंग्रहासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा