अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे... रोज एक सफरचंद खाल्ल्यास सर्व व्याधींपासून दूर राहता येत असल्याने फळांमध्ये सफरचंदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारा महिने सहज उपलब्ध होणाऱ्या सफरचंदासाठी भारतात काश्मीर प्रांत प्रसिद्ध आहे. पण काश्मिर हे सफरचंदाचं उगमस्थान आहे, हा समज चुकीचा असून कॅस्पियन तसेच काळ्या समुदाच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये सफरचंदाची ओळख झाली, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
एका सफरचंदापासून शरीराला एक वाटी कडधान्याच्या तुलनेत जास्त फायबर मिळते. यामुळे दैनंदिन कामासाठी खचीर् पडणारी ऊर्जा भरून निघते. सफरचंदामधील 'पेक्टिन' (क्कद्गष्ह्लद्बठ्ठ) या सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया जलदरित्या होत असल्याने जेवण झाल्यानंतर एक सफरचंद खाण्यात आलंचं पाहिजे. तसेच 'पेक्टिन'मुळे रक्तपेशींमध्ये कोलेस्ट्रॉल वाढीस प्रतिबंध बसत असल्याने हृदयविकाराच्या रुग्णांना हे फळ फायदेशीर आहे. सफरचंदामधील 'बॉरोन' (क्चश्ाह्मश्ाठ्ठ) या घटकामुळे हाडांना मजबूती येण्यास मदत होते, म्हणून भविष्यात संधिवाताचा त्रास उद्भवू नये यासाठी रोज सफरचंद खाल्लच पाहिजे.
या दोन महत्त्वाच्या फायद्यांव्यतिरिक्त सफरचंदामध्ये असणाऱ्या आयर्न, पोटॅशियम, काबोर्हायड्रेट्स. फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, कॅल्शियम तसेच व्हिटॅमीन ए आणि सीचेही असंख्य फायदे आहेत.
सफरचंदाच्या सालीमध्येच (थीन स्कीन) व्हिटॅमीन सीचं प्रमाण जास्त असल्याने ती न काढताच सफरचंद खाल्लं पाहिजे. व्हिटॅमीन सी आणि कॉपरच्या एकत्रितरित्या कामामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत तर होतेच तसेच 'कोलॅजिन' फॉमेर्शनही सहजरित्या होते. विटॅमीन सीमुळे उच्च रक्तदाब, हृदय, डोळे, त्वचा आणि हाडांच्या विकारांवर नियंत्रण ठेवता येतं. मुख्य म्हणजे त्वचा आणि हाडांमध्ये 'कोलॅजिन' या घटकाची निमिर्ती करण्यासाठी या व्हिटॅमीनची भूमिका महत्त्वाची आहे. दात किडणं आणि वारंवार रक्त येत असल्याच्या तक्रारीवर प्रभावी उपचार म्हणून व्हिटॅमीन सी खाण्यात आलं पाहिजे. तसेच वातावरणातील बदलांचा शरीराच्या क्रियाशीलतेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून हे विटॅमीन 'उत्तेजक' म्हणून काम करतं.
डायबिटिक आणि किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या रुग्णांना व्हिटॅमीन ए आवश्यक असतं. तसेच त्वचेला चमक येण्यासाठी, दृष्टीमध्ये स्पष्टता आणण्यासाठी आणि दातांच्या बळकटीसाठी या व्हिटॅमीनची गरज असते.
शरीरात पाण्याची पातळी समतोलित ठेवणं, मंेदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि हृद्याच्या ठोक्यांवर उचित नियंत्रण ठेवण्यासाठी पोटॅशियमची नितांत गरज भासत असते. तसेच चामखिळीवर उपचार म्हणून फळांच्या माध्यमातून पोटॅशियम खाणं फायदेशीर ठरतं. हाडांना आणि दातांना मजबूती आणण्याचं काम फक्त कॅल्शियममुळे होत नाही तर फॉस्फरसच्या संगतीमुळे कॅल्शियमचं काम जलद आणि अधिक प्रभावशाली होतं. फॉस्फरसमुळे शरीराला 'फॉस्फेट' हे मिनरल मिळतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडांच्या फॉमेर्शनसाठीही याचा उपयोग होतो. 'नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स'नुसार रोज शरीराला ७०० मिलीग्रॅम फॉस्फरस मिळालं पाहिजे.
आयर्नही सर्वात महत्त्वाचं मिनरल आहे. आयर्नमुळे फुफ्फुसातून ऑक्सिजन इतर अवयवांपर्यंत वाहून नेण्यास मदत होते. ३० टक्के आयर्न शरीरात साठ्याच्या स्वरूपात असते. वेळप्रसंगी गरज पडल्यास या आयर्नचा शरीराला फायदा होतो. आयर्नच्या कमतरतेमुळे अॅनिमिया सारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागण्याची शक्यता असते तसेच ऑक्सिजनचं वितरणंही मंदावतं. फॉलिक अॅसिड आणि आयर्न शरीरात एकत्रितरित्या काम करत असतात. गरोदर महिलांना स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी वाढीसाठी फॉलिक अॅसिड नियमितपणे घेण्याचा सल्ला दिला जातो.
सफरचंदपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तयार होतात. ते पित्तनाशक, वातनाशक, शीतल, जड, हृदयासाठी हितावह, वीर्यवर्धक आणि पोट व मूत्रपिंड साफ राखणारे आहे. त्यामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा व बी गटातील व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत. कार्बोहायड्रेटचे एक रूप पेक्टीनही यात भरपूर आढळते. मूतखड्याच्या रोग्यांनी रोज पूर्णपणे पिकलेली चार-पाच सफरचंद खावीत. लिव्हरच्या रोग्यांनी जेवणापूर्वी प्रत्येकवेळी दोन ताजी सफरचंद खावीत वा सफरचंदाचा चहा प्यावा. तापात रोग्याला तहान, जळजळ, थकवा, व बैचेनी होत असेल तर सफरचंदाचा चहा वा त्या सफरचंदाचा रस पाजावा. घशात जखम, व्रण असेल वा गिळायला त्रास होत असेल तर उत्तम ताज्या सफरचंदाचा रस घशापर्यंत नेऊन काही वेळ तेथे अडवून ठेवावा. यामुळे आश्चर्यजनक फायदा होतो.
मेंदूचा अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज एक सफरचंद खावे तसेच दुपारच्या वा रात्रीच्या जेवणात कच्च्या सफरचंदाची भाजी खावी. सायंकाळी ग्लासभर सफरचंदाचा रस प्यावा व रात्री झोपण्यापूर्वी एक पिकलेले गोड सफरचंद खावे. यामुळे महिन्याभरातच फरक दिसू लागतो. जुनाट खोकला असेल तर पिकलेल्या सफरचंदाच्या ग्लासभर रसात खडीसाखर मिसळून रोज सकाळी नियमित प्यायल्यास जुनाट खोकलाही बंद होतो. बध्दकोष्ठता नष्ट करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन सफरचंद चावून खावीत यामुळे अग्निमांश नष्ट होऊन भूक वाढते. पोटात गॅस असेल तर गोड सफरचंदात १० ग्रॅम लवंगा टोचून ठेवाव्यात व दहा दिवसांनी लवंगा काढून तीन लवंगा व एक गोड सफरचंद खाण्यास द्यावे. या दरम्यान तांदूळ व तांदळाचे पदार्थ रोग्यास खाण्यास देऊ नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा