सरकारदरबारी कोतवाल हे काही पद नाही. कारण या पदाला वेतन नाही. मानधनावरची नियुक्ती, पण वाढत्या बेरोजगारीत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना हे पद महत्त्वाचे वाटू लागले आहे. दोन-दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कला शाखेतील अनेकांनी 'मला कोतवाल करा' अशी आर्त हाक प्रशासनाला मारली आहे. पाच हजार रुपयांच्या मानधनासाठी केवळ पदव्युत्तर नाही तर स्थापत्यशास्त्रात पदविका घेणाऱ्या उमेदवारांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत. तसे कोतवालाचे काम तलाठय़ाच्या हाताखालचे. गावात त्याला तलाठय़ाचे 'हरकाम्या' म्हणून ओळखले जाते. माहिती पोचविण्यासाठी त्याने दवंडी द्यावी, असे अपेक्षित असते. हे काम करायला मराठवाडय़ातून हजारो पदवीधर तयार आहेत. मराठवाडय़ातील सहा जिल्ह्य़ांत प्रत्येकी सरासरी तीन ते चार हजार उमेदवारांनी कोतवाल पदासाठी अर्ज केले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील धनाजी बनसोडे बी.ए. बी.एड. झालेला. नोकरी कोणी देईना. शिक्षक झालो तर बरा पगार मिळेल म्हणून आई-वडिलांनी चांगले शिकविले. तोही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. पण त्याचे शिक्षक होण्याचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. धनाजीने आता कोतवाल पदासाठी अर्ज केला आहे. सिल्लोडचे तहसीलदार गायकवाड सांगत होते, कोतवाल पदाच्या अर्जाची छाननी करताना आश्चर्य वाटले. कारण बहुतांश तरुण हे पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिसून आले. खरेतर या पदासाठी चौथी उत्तीर्ण एवढीच अर्हता आवश्यकता आहे. फारसे काही बौद्धिक काम नसल्याने मानधनही तसे बेताचेच.

*कोतवालाचे काम : गावातील कराची वसुली करणे आणि टपालाचे वाटप करणे
पदे आणि अर्जसंख्या
*लातूर : ११९,
अर्ज प्राप्त : ४ हजार ९३०
*उस्मानाबाद : १०९,
अर्ज प्राप्त : ४ हजार २००
*औरंगाबाद : ९९, अर्ज प्राप्त : ४ हजार ४८७
*जालना, हिंगोली व बीड या तीनही जिल्ह्य़ांत अनुक्रमे ५४, ११५ आणि २४५ पदांसाठी प्रत्येकी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा