Translate

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांचे जनक कार्ल जेरासी काळाच्या पडद्याआड

सॅन फ्रान्सिस्को: कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांचे जनक कार्ल जेरासी यांचं काल सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी कॅन्सरमुळे जेरासी यांचं निधन झालं.

कार्ल जेरासी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. जेरासी यांनी 1951 मध्ये नोरेथिंड्रोम हा गर्भनिरोधक गोळ्यांतील मुख्य घटक विकसित केला. जेरासी यांच्या नेतृत्वात संशोधन समितीने दिलेलं हे योगदान विज्ञानाच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय आहे.

'दिस मॅन्स पिल' या पुस्तकात जेरासींनी या शोधामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेले आमूलाग्र बदल कथित केले आहेत. कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांच्या संशोधनाला आलेल्या यशामुळे त्यांना विज्ञान क्षेत्रात अधिक रस निर्माण झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा