राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना दिल्या गेलेल्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केले. भारतात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या अध्यक्षांना एका महिला अधिकाऱ्याने मानवंदना दिली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ‘गार्ड ऑफ ऑनर’चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 21 तोफांची सलामी देऊन ओबामा यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ची मानवंदना देण्यात आली. ओबामा यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ची मानवंदना देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करायला मिळालं, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी भावना विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी व्यक्त केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा