- दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य ट्रस्टच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती
- फँण्ड्री या चित्रापटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता - स्वप्नील जोशी (दुनियादारी) तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता तांबे (72 मैल एक प्रवास) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नागराज मंजुळे यांना फँड्री चित्रपटासाठी देण्यात आला.
- या सोहळयात यंदाचा दादासाहेब फाळके गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि रु. 25,000/- पंचवीस हजार रोख असे या सन्मानाचे स्वरुप आहे. उपस्थित प्रेक्षकांच्या आग्रहास्तव याप्रसंगी लीला गांधी यांनी बाई माझी करंगळी मोडली या सदाबहार गीतावर ताल धरला. यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड टाळयांनी त्यांना दाद दिली, याप्रसंगी भावूक होत लीला गांधी यांनी रसिक मायबाप प्रेक्षकांचे आणि आयोजकांचे मनापासून आभार मानले.
- पुरस्काराच्या सल्लागार समितीवर विजय पाटकर, मोहन जोशी, निर्मिती सावंत, वैशाली सामंत, कांचन अधिकारी, सयाजी शिंदे, निशिगंधा वाड या सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग होता.
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - विजय पाटकर (माझ्या नव-याची बायको), सर्वोत्कृष्ट कथा - नागराज मंजुळे (फँड्री), सर्वोत्कृष्ट पटकथा - राजीव पाटील (72 मैल एक प्रवास), सर्वोत्कृष्ट संवाद- राजेश बामगुडे (माझ्या नव-याची बायको), सर्वोत्कृष्ट छायांकन - संजय जाधव (दुनियादारी), सर्वोत्कृष्ट गीतकार - संजय पाटील (72 मैल एक प्रवास), सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज (दुनियादारी - देवा तुझ्या गाभा-याला),
Translate
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा