Translate

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

अशी आहे शक्तीशाली ‘अग्नी 5′

agni 5_fetcher
भारताने आज (शनिवार) अणू ‘अग्नी-5′ या सर्वात ताकतवान क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाच हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राचे ओडिशा जवळील व्हीलर द्वीप इथं यशस्वी चाचणी करण्यात आली. डीआरडीओने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचा पहिला यशस्वी प्रयोग 19 एप्रिल 2012 ला झाला होता. ‘अग्नी -5′ मुळे ज्यांच्याकडे 5 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहेत, अशा निवडक सहा देशांमध्ये भारताची गणना केली जाणार आहे. आपल्या सैन्याला अधिक शक्तीशाली बनवण्यासाठी याच वर्षी सैन्याकडे हे मिसाईल सोपवण्यात येणार आहे.
अग्नी-5 चे वैशिष्ठ्यं
1. 5 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांब मारा करणारे क्षेपणास्त्र
2. इतक्या लांब मारा करणारे हे पहिलेच क्षेपणास्त्र
3. अग्नी-5 ची मांडणी ही तीन टप्प्यात केली असून 17 मीटर इतकी लांबी आहे.
4. 20 मिनिटांत 5 हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते 
5. हे क्षेपणास्त्र दीड मीटर म्हणजेच छोट्या कारसारख्या गोष्टींवरही निशाणा साधू शकतं 
6. याच्या लाँचिंग सिस्टीम मध्ये कँनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय. 
7. ज्यामुळे या क्षेपणास्राला कुठेही सहजरीत्या ट्रान्सपोर्ट करता येऊ शकतं 
8. क्षेपणास्त्राला रस्त्यावरूनही लाँच केलं जाऊ शकतं

कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांचे जनक कार्ल जेरासी काळाच्या पडद्याआड

सॅन फ्रान्सिस्को: कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांचे जनक कार्ल जेरासी यांचं काल सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी कॅन्सरमुळे जेरासी यांचं निधन झालं.

कार्ल जेरासी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. जेरासी यांनी 1951 मध्ये नोरेथिंड्रोम हा गर्भनिरोधक गोळ्यांतील मुख्य घटक विकसित केला. जेरासी यांच्या नेतृत्वात संशोधन समितीने दिलेलं हे योगदान विज्ञानाच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय आहे.

'दिस मॅन्स पिल' या पुस्तकात जेरासींनी या शोधामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेले आमूलाग्र बदल कथित केले आहेत. कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांच्या संशोधनाला आलेल्या यशामुळे त्यांना विज्ञान क्षेत्रात अधिक रस निर्माण झाला.