Translate

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

नव्या नोटेची वैशिष्ट्ये.........

पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची वैशिष्ट्ये
– नोटेचा रंग हा हिरवा असणार आहे.
– नोटेच्या दर्शनीय भागात महात्मा गांधीचे उजव्या बाजूला तोंड असणारे छायाचित्र असणार आहे. याआधीच्या नोटेवर गांधींजीचे छायाचित्र हे डाव्या बाजूला तोंड करून होते.
– आधीच्या नोटेपेक्षा या नोटेचा आकार कमी असणार आहे.
– नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो असणार आहे. तसेच लाल किल्ल्याची प्रतिमाही असणार आहे.
.

.
.
.


२ हजार रुपयांची वैशिष्ट्ये
सुरूवातीला सोशल मिडीयावर या नोटेमध्ये काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अरूण जेटली यांनी बुधवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. ही अफवा कोणी पसरवली हे माहिती नाही. मात्र, नोटांमध्ये ‘नॅनो जीपीएस चीप’ वैगेर काहीही नसल्याचे जेटली यांनी सांगितले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा