Translate

मंगळवार, ३० जून, २०१५

फोर-जी ????????

टूजीवरून फोरजीपर्यंत पोहोचलेल्या भारतीय मोबाइल तंत्रज्ञानाला पूरक उपकरणांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. मोबाइल कंपन्या फोरजीचे फोन बाजारात आणू लागली आहेत. सन २०१५च्या पहिल्या तिमाहीचा विचार करता या मागणीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आणि लवकरच बाजारात येणाऱ्या फोरजी उपयुक्त फोन्सविषयी जाणून घेऊ या.
शिओमी मी ४
शिओमी या कंपनीने भारतीय बाजारपेठेत चांगलाच जम बसविला आहे. फ्लिपकार्ट या ई-शॉपिंग संकेतस्थळावर हा फोन उपलब्ध असून या कंपनीचे एकूण मागणीत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकतेच एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कंपनीने गेल्या वर्षांपासून फोरजी तंत्रज्ञानास पूरक फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मी ४ हा फोन व खास भारतीयांसाठी २ जुलै रोजी बाजारात येणारा ४ आय या फोनला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. मी ४ या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८०१ क्वलाकॉम क्वाड कोर २.५ गिगाहार्टझ प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये ३ जीबी रॅम देण्यात आली आहे. यामुळे फोन एकदम वेगवान होतो. यात उच्च रंगांसाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे फोन १७ टक्के अधिक उजळ होतो. फोनमध्ये सोनीचा वेगवान १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. मी ४ आय हा खास भारतीयांसाठी बनविण्यात आला असून यामध्ये डय़ुएल सिम असून दोन्ही फोर जी तंत्रज्ञानास पूरक आहेत. यात मी ४ सारख्याच सुविधा असल्या तरी रॅम २ जीबी आहे.
किंमत - मी ४-१४९९९ आणि मी ४ आय-१२९९९ रुपये

एचटीसी डिझायर ८२०
या फोनला ५.५ इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर आहे. याचबरोबर एड्रेन ४०५ जीपीयू आहे. यामध्ये अँड्रॉइडची किटकॅट ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम असून फोन अँड्रॉइडच्या नव्या लॉलीपॉप या ऑपरेटिंग सिस्टमवरही काम करू शकतो. या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये तब्बल १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर फोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. यामुळे सेल्फीजसाठी हा फोन अधिक चांगला ठरतो. हा फोन एक सिम कार्ड आणि दोन सिम कार्ड सुविधेमध्ये उपलब्ध आहे.
किंमत : याची किंमत विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर वेगवेगळी आहे. ती २१ हजारापासून ते २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
लिनोवा वाइब एक्स २
लिनोवा या कंपनीने वाइब एक्स २ हा 'फोर जी' फोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये पाच इंचाची स्क्रीन असून त्याला तीन पातळय़ांची आकर्षक डिझाइन आहे. या फोनमध्ये दोन गिगाहार्टझचा ऑक्टा कोर मीडिया टेक एमटी ६५९५ प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉइड किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनला १३ मेगापिक्सेलचा ऑटो फोकस रेअर कॅमेरा असून त्याला एलईडी फ्लॅशही आहे. याला फ्रंट कॅमेरा पाच इंचाचा आहे. हा फोन डय़ुएल सिमचा आहे. यात दोन जीबी रॅम आणि ३२ जीबीची अंतर्गत मेमरी स्टोअरेज स्पेस आहे. यामध्ये बॅटरी २३०० एमएएचची देण्यात आली आहे.
किंमत : हा फोन फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर उपलब्ध असून याची किंमत १९९९९ रुपये इतकी आहे.

नोकिया ल्युमिया ६३८
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून नोकिया ल्युमिया ६३८ हा मोबाइल नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. हा मोबाइल 'फोर जी'साठी उपयुक्त हार्डवेअर असलेला असून तो खूप स्वस्तही आहे. या मोबाइलच्या विक्रीसाठी कंपनीने अ‍ॅमेझॉन या ई-व्यापार संकेतस्थळाशी सहकार्य केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना हा मोबाइल अधिक चांगल्या किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा हा मोबाइल असून याचा डिस्प्ले ४.५ इंचाचा आहे. यात क्वाड कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असल्यामुळे तो अधिक जलद काम करू शकतो. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामसारखे अ‍ॅप्स जलद गतीने काम करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये बॅटरी क्षमता १८३० एमएएचची देण्यात आली आहे. यामुळे दिवसभर मोबाइल वापरूनही बॅटरी कमी संपते. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये ल्युमिया कॅमेरा आणि सिनेमाग्राफ हे दोन खास फोटो अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून यात आठ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साहय़ाने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
किंमत : ५५०० रुपये. (अ‍ॅमेझॉनवर)

फोर-जी म्हणजे काय व ते कसे काम करते
ेफोरजीच्या फोनचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. थ्रीजीच्या ऐवजी फोरजीच्या फोन्सची विक्री चांगलीच वाढत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मोबाइलमधील इंटरनेटवरूनच कार्यालयाची असोत किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाविद्यालयातील किंवा शालेय कामे असोत, सर्व कामे करण्याची पद्धत भारतात चांगलीच रूढ झाली आहे. यामुळेच टूजी, थ्रीजीपाठोपाठ आता आणखी वेगवान फोरजी नेटवर्कची सुविधा देशातील विविध शहरांमध्ये सुरू झाली आहे. या सेवेत एअरटेलने आघाडी घेतली असली तरी रिलायन्स जीओ आणि इतर प्रस्थापित मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या या सेवेत उडी घेऊ इच्छित आहेत.
फोर्थ जनरेशनचे संक्षिप्त नाव म्हणजे फोरजी. मोबाइल टेलिकम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीची चौथी जनरेशन असा त्याचा अर्थ होतो. थ्रीजीनंतरचा आणि फाइव्हजी पूर्वीचा हा टप्पा आहे. थ्रीजीपेक्षा पाचपटीने जास्त वेग असणारे फोरजी इंटरनेट ब्राऊजिंगचा सर्वोत्तम अनुभव देते. याचा एवढा वेग असतो की, ३० मिनिटांपेक्षाही कमी काळात १० चित्रपट डाऊनलोड करता येणे शक्य होते. २०१२च्या एप्रिल महिन्यामध्ये कोलकात्यामध्ये फोरजी सेवा लाँच करणारी एअरटेल ही देशातली पहिली कंपनी होती. या लाँचमुळे, फोरजीच्या जागतिक लाँचला समांतर लाँच करून ती सेवा व्यावसायिकदृष्टय़ा राबवणाऱ्या देशांमधला एक देश अशी भारताची ओळख बनली. फेब्रुवारी २०१४ मध्ये बंगळुरूमध्ये एअरटेलने मोबाइलसाठी फोरजी सेवा सादर केली. एअरटेल वायफाय, सीपीईज, डाँगल्स आणि मोबाइल फोन्स अशा सर्व माध्यमांमध्ये फोरजीसाठी परवडण्याजोगे आणि पशाचे पुरेपूर मूल्य देणारे अनेक मनी पॅक्स आणि प्लान्स देतो. एअरटेल फोजी सेवा सध्या भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यात मुंबई व ठाणे परिसरातील शहरांचाही समावेश आहे. सध्या एअरटेलला फोरजीमध्ये फारशी स्पर्धा नसली तरी कंपनीतर्फे थ्रीजीच्या दरात फोरजीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. फोरजी सेवा घेतली आणि ती सेवा ज्या भागात नसेल त्या भागात इंटरनेट सुविधा मिळणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना एअरटेल फोरजीचे विपणन प्रमुख नितीन बुरमान म्हणाले की, ज्या ठिकाणी फोरजी नसेल त्या ठिकाणी ग्राहकांना प्लॅटिनम थ्रीजीची सुविधा मिळेल. तेही नसेल तर थ्रीजी आणि तेही नसेल तर टूजी नेटवर्क मिळत राहणार म्हणजे ग्राहक कोणत्याही परिस्थितीत इंटरनेटपासून वेगळा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. याचबरोबर ज्या ग्राहकांकडे फोरजी मोबाइल नाही अशा ग्राहकांसाठी एअरटेलने मायफाय उपकरण बाजारात आणले आहे. अवघ्या २२९९ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या उपकरणात आपण एअरटेलचे सिमकार्ड घातले आणि फोरजी सुरू केली, की एकाच वेळी आपण १० उपकरणांवर फोरजीचा अनुभव घेऊ शकतो, अशी माहितीही बुरमान यांनी दिली.

शुक्रवार, २६ जून, २०१५

आईचा मुलीला खाण्याचा प्रयत्न

आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नुकतीच पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. या आईने चक्क आपल्या चार वर्षांच्या मुलीच्या डोक्याचा भाग कापून ते मांस खाताना नातेवाईकांनी तिला पकडल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे. नातेवाईकांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे या लहान मुलीचा जीव वाचला. येथील गोपाळपूर या गावात हा प्रकार घडला आहे. गावात राहणाऱ्या 42वर्षीय प्रमिला मोंडल या महिलेने आपल्याच मुलीचे मांस खाण्याचे घृणास्पद कृत्य करताना तिच्या नातेवाईकांनी बघितले आणि या सगळ्याची माहिती गावकऱ्यांना दिली. प्रमिला आमच्या बाजुच्याच घरात राहते. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा आम्हाला लहानग्या भारतीच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही समोरचे दृश्य बघून हादरल्याची माहिती प्रमिलाच्या नातेवाईकांनी दिली. प्रमिला लहानग्या भारतीला मांडीवर बसवून तिच्या डोक्याचे मांस खात होती. या सगळ्याने हादरलेल्या नातेवाईकांनी प्रथम भारतीला प्रमिलाच्या तावडीतून सोडवून जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर या सगळ्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर सर्वजण प्रमिलाच्या घरी आले आणि तिला असे करण्याचे कारण विचारले. मात्र तिने काही सांगण्यास नकार दिला. मात्र, गावकऱ्यांच्या मते प्रमिला मोंडल हिला अनेक व्यसने असून तिने बुधवारी दुपारी दारूचे सेवन केले होते. प्रमिलाला पार्वती आणि भारती या दोन मुली आणि एक मुलगा असून यापूर्वीही तिने अशाप्रकारची कृत्ये केल्याची माहिती पोलीसांना गावकऱ्यांकडून मिळाली आहे. पोलीसांनी प्रमिलाला सध्या ताब्यात घेतले असून सरकारी डॉक्टरांकडून चौकशी सुरू आहे. प्रमिलाच्या घरची परिस्थिती हालाखीची असली तरी तिने भुकेसाठी हे कृत्य केलेले नाही. कदाचित मानसिक व्याधीमुळे तिने असे केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.











स्वत:च्याच मुलीला खाण्याचा प्रयत्न करणारी प्रमिला मोंडल.

घर बैठकर इंटरनेट के जरिए 1000 रुपए तक कमाई का मौका

अगर आपके पास कम्प्यूटर और इंटरनेट है, तो समझ लीजिए आप भी घर बैठे कमाई कर सकते हैं। घर बैठकर इंटरनेट के जरिए कुछ ऐसे काम हैं जो आपको एक घंटे में 1000 रुपए तक कमाई का मौका देते हैं। इसके लिए थोड़ा समय देने की जरूरत है। मनी भास्कर आपको बता रहा है ऐसे ही वेबसाइट्स के बारे में जो उनके लिए काम करने का पैसा देती हैं। इनमें प्रोडक्ट बेचने से लेकर वर्क फ्रॉम होम तक की सुविधा है।

1. वर्चुअल कॉल सेंटर एजेंट
आप घर बैठे कॉल सेंटर एजेंट के रूप में काम कर सकते हैं। http://www.liveops.com/ आपको यह सुविधा मुहैया कराता है। इस साइट पर जाकर आप कंपनी के एजेंट बन सकते हैं। कंपनी के एजेंट बनने के बाद आपको ऑनलाइन उत्पादों को बेचना है। उनका रिव्यू करना है और फीडबैक कंपनी को देना है।
क्या करना होगा
> इसके लिए घर पर एक फोन, कम्प्यूटर और इंटरनेट की जरूरत है।
> अंग्रेजी अच्छी होना जरूरी है। ताकि आप उपभोक्ताओं को सीधे कॉल कर उत्पाद बेच सकें।
> अगर आपकी अंग्रेजी अच्छी नहीं है, तो भी आप इससे जुड़ सकते हैं। क्योंकि कॉल लगते ही कंपनी आपको बताएगी कि आपको क्या बोलना है। यानी कॉल शुरू होते ही स्क्रीन पर लिख कर आने लगेगा, जो आपको बोलना है।
> इस वेबसाइट के जरिए आप एक घंटे में 7 से 15 डॉलर यानी तकरीबन 1000 रुपए तक की कमाई कर सकते हैं।


2. स्वागबक्स डॉटकॉम (http://www.swagbucks.com)
स्वागबक्स डॉटकॉम एक प्रसिद्ध वेबसाइट है, जिस पर फ्री में रजिस्टर करके आप कमाई शुरू कर सकते हैं। अपने फेसबुक के जरिए भी इससे जुड़ा जा सकता है। इस साइट पर बस आपको कुछ समय बिताना है और शॉपिंग से लेकर सर्चिंग, प्ले, सवाल-जवाब और प्रोडक्ट की जानकारी हासिल करनी है। इसकी एवज में वेबसाइट आपको कुछ प्वाइंट्स देगी। इन प्वाइंट्स को आप शॉपिंग में इस्तेमाल कर सकते हैं या फिर कैश में भी बदल सकते हैं। हालांकि, इसमें आपको पैसा थोड़ा कम ही मिलेगा। लेकिन, आपके इस्तेमाल की चीजें उन प्वाइंट्स से खरीद सकते हैं।

3. वर्क फ्रॉम होम
वर्क फ्रॉम होम भी कमाई करने के लिए बेहतर ऑप्शन है। इसके लिए तमाम बड़ी कंपनियां वर्क फ्रॉम होम की सुविधा देती हैं। इसमें ट्रांसलेशन वर्क से लेकर रिव्यू का काम लिया जा सकता है।
www.odesk.com और www.elance.com जैसी साइट ऑनलाइन कमाई के मामले में दुनिया भर में फेमस साइटों में भी शामिल है। इन दोनों साइटों में सबसे पहले आपको टेस्ट देकर खुद को कंपनी के लिए यूजफुल साबित करना होता है। एक बार रजिस्टर होने के बाद साइट अलग-अलग काम के लिए मेंबर्स को कॉन्ट्रैक्ट और फ्रीलांसर के रूप में हायर करती है। काम पूरा होने पर प्रति घंटा या अन्य तरीकों से पैसा देती है। दुनिया भर में कई वेबसाइट ऐसा करती हैं।


4. सेल्फ पब्लिश बुक
अगर आपको लेखन से प्यार है, तो कई साइट पैसे देकर ऑनलाइन बुक लिखवाने से लेकर उसकी रॉयल्टी से कमाई करने का मौका देती हैं। इन्हीं साइटों में से एक है अमेजन। अमेजन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग के नाम से यह फीचर चलाती है। इसमें कोई भी ऑनलाइन बुक लिखकर उसे किंडल बुकस्टोर पर डाल सकता है। इसकी बिक्री पर लेखक को 70 फीसदी तक रॉयल्टी मिलती है। साइट और सेल्फ पब्लिश बुक की अधिक जानकारी के लिए https://kdp.amazon.com/ पर क्लिक करें। इस पर आप अपना अकाउंट भी बनाकर रेगुलर मेम्बर बन सकते हैं।

5. पेड रिव्यू
सॉफ्टवेयर या अन्य उत्पादों के लिए रिव्यू लिखना। अगर लेखन में आपकी क्षमता जबरदस्त है तो इसके जरिए आप कमाई कर सकते हैं। इसके अलावा इंफोलिंक भी एक माध्यम है। इसके लिए कई वेबसाइट पेड रिव्यू जैसे काम आपको देती हैं। इनमें विंडेल रिसर्च(Vindale Research) और एक्सपोटीवी डॉट कॉम(ExpoTv.com) प्रमुख वेबसाइट्स हैं जो इसके लिए अच्छा पैसा देती हैं।

दिल्ली. कम आमदनी और छोटी सेविंग्स के जरिए घर खर्च चलाना बेहद मुश्किल होता है। खासकर मध्यमवर्गीय परिवारों के लिए पैसा कमाने के कम ही ऑप्शन हैं। ऐसे में इंटरनेट एक ऐसा जरिया है, जिससे घर बैठे भी कमाई की जा सकती है। अगर ईमेल मार्केटिंग के बारे में बात की जाए तो वर्चुअल वर्ल्ड में इसका खास महत्व है। रोजाना कई तरह की मेल सेवाओं का प्रयोग आप करते हैं, लेकिन क्या कभी सोचा है कि आप मेल पढ़कर भी पैसा कमा सकते हैं। मनी भास्कर आपको ऐसी ही कुछ वेबसाइट के बारे में बताने जा रहा है, जहां से आप मेल और सर्वे के माध्यम से पैसा कमाया जा सकता है। ये पैसा महिला या पुरुष कोई भी कमा सकता है।
1. मनी मेल डॉट कॉम(www.Moneymail.in)
इस वेबसाइट पर आप दिन में 15 मिनट का समय निकालकर ई-मेल पढ़कर कमाई कर सकते हैं। इसके जरिए 10,000 रुपए तक एक महीने में कमा सकते हैं। एक ईमेल पढ़ने पर आपको 20 पैसे से लेकर 200 रुपए तक दिए जाते हैं। इसके लिए आपको हर रोज अपने अकाउंट पर लॉग इन करना होगा और इनबॉक्स में मेल पढ़ने होंगे। अपने किसी दोस्त का अकाउंट बनवाने पर आपको 100 रुपए तक दिए जाते हैं।

2. सेंडर अर्निंग डॉट कॉम (www.Sendearnings.com)
इस वेबसाइट पर भी आप ईमेल, सर्वे, ऑनलाइन शॉपिंग के माध्यम से पैसा कमा सकते हैं। पहले आपको अकाउंट बनाना होगा और अपना रजिस्ट्रेशन कन्फर्म कराना होगा। यहां आपको एक ईमेल पढ़ने पर 1 डॉलर यानी करीब 60 से 65 रुपए(डॉलर के मुकाबले रुपए की कीमत के अनुसार) दिया जाता है। अगर आपने 6 महीने में एक बार इस साइट पर विजिट नहीं किया, तो आपका अकाउंट डिएक्टिवेट कर दिया जाएगा। पेमेंट के लिए आवेदन करते समय आपके अकाउंट में कम से कम 30 डॉलर यानी तकरीबन 1800 से 2000 रुपए होने चाहिए।

3. मैट्रिक्स मेल डॉट कॉम (www.matrixmails.com)
ई-मेल के जरिए पैसा कमाने के लिए ये वेबसाइट एक बेहतर विकल्प है। साल 2002 से यह वेबसाइट काम कर रही है। इस वेबसाइट के माध्यम से आप ईमेल पढ़ते हुए, ऑफर्स के माध्यम से, साइट विजिट करें और अन्य लोगों को इसकी जानकारी देकर पैसे कमा सकते हैं। आप 25 से 50 डॉलर तक यानी तकरीबन 3000 रुपए एक घंटे में कमाए जा सकते हैं।

4. कैश फॉर ऑफर डॉट कॉम (www.Cash4offers.com)
इस वेबसाइट के माध्यम से भी आप पैसा कमा सकते हैं। जब आप वेबसाइट के गोल्ड मेंबर बन जाते हैं, तो 72 घंटे से भी कम समय में आपको पेमेंट कर दी जाती है। आप ईमेल पढ़कर, सर्वे के द्वारा, कैश ऑफर्स के माध्यम से, ऑनलाइन गेम्स खेलकर और दोस्तों का अकाउंट बनवाकर पैसा कमा सकते हैं। वेबसाइट पर साइन इन करते ही आपको करीब 5 डॉलर यानी 300 से 350 रुपए तक मिलते हैं।


5. पैसा लाइव डॉट कॉम (www.Paisalive.com)
अगर आप एक भी पैसा निवेश किए बिना तेजी से पैसा कमाना चाहते हैं तो यह वेबसाइट आपको ये मौका देती है। पैसा लाइव में अकाउंट बनाते ही आपको 99 रुपए मिलेंगे। अपने 10 दोस्तों को इसके बारे में बताकर उनका अकाउंट बनवाने पर भी आपको तुरंत 10 रुपए मिलेंगे। पहले 10 दोस्तों के बाद हर दोस्त पर आपको 2 रुपए मिलेंगे। इनबॉक्स में मेल पढ़ने पर आपको 25 पैसे से 5 रुपए तक मिलेंगे। वेबसाइट 15 दिन में एक बार चेक से पेमेंट करती है।

मंगळवार, २३ जून, २०१५

'ब्ल्यू मॉरमॉन' हे 'राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित

'ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुल जारूल घोषित केले आहे, परंतु 'राज्याचे फुलपाखरू' म्हणून कुठल्याही प्रजातीला नामनिर्देशित करण्यात आलेले नव्हते.
देशात आतापर्यंत कोणत्याही राज्याने 'राज्य फुलपाखरू' घोषित केले नसून एकंदरीत या सुंदर उडत्या जिवांकडे दुर्लक्ष झाले आहे.

महाराष्ट्र राज्याची मानचिन्ह
निसर्गप्रेमींसाठी पक्ष्यांप्रमाणेच फुलपाखरेही आवडीचा व आकर्षणाचा विषय आहे. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक व वनस्पतीसमवेत परस्परसंबंध असलेले महत्त्वपूर्ण कीटक आहे. राज्यात सुमारे २२५ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झालेली असून देशाच्या एकूण संख्येच्या १५ टक्के फुलपाखरे राज्यात आढळतात.
ब्ल्यू मॉरमॉन हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे व पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. विशेष म्हणजे, हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील केवळ महाराष्ट्र (पश्चिम घाट), दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या या फुलपाखराचे आढळ विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत नोंदवले गेले आहे.
फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या विकास प्रकल्पांची प्राथमिक चाचणी घेऊन, मगच ते केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाची बैठक तब्बल १४ महिन्यांपासून झालेली नव्हती. जानेवारी २०१४ मध्ये राज्य वन्यजीव मंडळाची शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये ही बैठक होणार होती, पण निवडणुका जाहीर झाल्याने त्या कालावधीत बैठक होऊ शकली नाही. राज्याचे नवे सरकार स्थानापन्न होऊनही बराच कालावधी लोटल्याने नव्या मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेतली नव्हती. लोकसत्तात काही दिवसांपूर्वी हे वृत्त प्रकाशित होताच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली. मात्र, केंद्रीय वन्यजीव मंडळाप्रमाणेच राज्य वन्यजीव मंडळातही जुन्या सदस्यांना डच्चू देऊन नव्यांची वर्णी लावल्याने त्यावर बरीच चर्चा झाली.

'पॅन' वरील तपशील आणि करदात्याची 'ओळख'

भारतात प्राचीन काळापासून कर आकारले जात होते याचा उल्लेख मनुस्मृती आणि अर्थशास्त्रामध्ये आढळून येतो. राजा महाराजांच्या काळापासून उत्पन्नावर आणि खर्चावर विविध कर आकारले जात. त्याकाळीसुद्धा विक्री कर, अबकारी कर, रस्ते कर असे कर आकारले जात होते त्याची नावे निराळी होती. हे कर धान्य, पशुसंपत्ती, सोने वगरेच्या रूपाने घेतले जात.
आधुनिक भारतात प्राप्तिकराची सुरुवात १९२२ पासून झाली. तेव्हापासून प्राप्तिकर कायदा, १९२२ अस्तित्वात आला. या कायद्यात वेळोवेळी कालानुरूप अनेक बदल करण्यात आले. १ एप्रिल १९६२ पासून नवीन प्राप्तिकर कायदा प्राप्तिकर कायदा, १९६१ अंमलात आला. हा कायदा आजतागायत लागू आहे. या कायद्यात दरवर्षी अनेक बदल सुचविले जातात. या कायद्याच्या प्रशासनामध्ये सुद्धा अनेक बदल केले गेले. प्रत्येक करदाता हा फाईल क्रमांक आणि जीआयआर नंबर वरून ओळखला जायचा. करदात्याची माहिती, त्याचा फोटो वगरे माहिती प्राप्तिकर खात्याकडे नव्हती.
करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पर्मनन्ट अकाऊंट नंबर ('पॅन') ची कल्पना १९९४ मध्ये पुढे आली. या मध्ये करदात्याची संपूर्ण माहिती, फोटो, जन्म तारीख वगरेची नोंद केली जाते. या मुळे काही गरप्रकारांना आळा बसला. हा एक महत्वाचा टप्पा समजला जातो. प्रत्येक करदाता हा त्याच्या 'पॅन' वरून ओळखला जाऊ लागला. 'पॅन' हा प्राप्तिकर खाते आणि करदाता यामधील महत्वाचा दुवा आहे. आता बरयाच व्यवहारांसाठी 'पॅन' ची माहिती देणे अनिवार्य केल्यामुळे प्राप्तिकर खात्याकडे या व्यवहाराची माहिती विविध सरकारी, खाजगी संस्था, बँक, वगरेंकडून मिळते. त्यामूळे प्राप्तिकर खात्याकडे आपल्या व्यवहाराची माहिती वेळोवेळी वार्षकि माहिती अहवाल (अकफ), उद्गम कर विवरण पत्र याद्वारे जात असते. 'पॅन' हे अनेक सरकारी आणि गर-सरकारी कामकाजामध्ये ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते.
एकापेक्षा जास्त 'पॅन' :
काही वेळेला करदात्याकडून चुकून एकापेक्षा जास्त वेळा 'पॅन' चा अर्ज केला गेला असेल किंवा प्राप्तिकर खाते, एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चरकडून चुकून एकापेक्षा जास्त 'पॅन' दिले गेले असतील तर त्वरित आपल्या अखत्यारीत प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे अर्ज करून तो रद्द करून घ्यावा किंवा प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन रद्द करावा. एका व्यक्तीच्या नावाने एकापेक्षा जास्त 'पॅन' असणे हा प्राप्तिकर कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. यासाठी १०,००० रुपये दंडाची तरतूद केली आहे.
तपशिलात बदल:
'पॅन' कार्ड वरील माहिती जर चुकीची असेल किंवा काही कारणाने बदलली असेल तर 'पॅन' बदलासाठी फोर्म भरून वर सांगितल्या प्रमाणे एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांच्या सेन्टर्स मध्ये आवश्यक कागदपत्रांसोबत दाखल करावा. या साठी सुद्धा शुल्क आकारले जाते. जो बदल करावयाचा असेल त्याप्रमाणे त्याचा पुरावा सोबत जोडावा लागतो. उदा. पत्ता बदलला असेल तर नवीन पत्त्याचा पुरावा, नाव बदलले असेल तर गझेट नोटिफीकेशन, जन्मतारीख चुकली असेल तर त्याचा पुरावा, इत्यादी. जर पत्ता बदलला असेल तर संबंधीत प्राप्तिकर अधिकारयाला कळवणे गरजेचे असते.
पूर्वी प्राप्तिकर खात्याने दिलेले 'पॅन' कार्ड हे श्व्ोत-धवल होते, जर काहीही बदल नसले आणि नवीन रंगीत कार्ड हवे असेल किंवा जुने कार्ड हरवले असेल तर जुन्या 'पॅन' कार्डाची प्रतसोबत, इतर कागदपत्रे जोडून नवीन 'पॅन' कार्ड साठी अर्ज करता येतो. या मध्ये पर्मनन्ट अकाऊंट नंबर बदलत नाही.

'पॅन' कोणी आणि कधी घ्यावा?
खालील व्यक्तींसाठी 'पॅन' घेणे बंधनकारक आहे :
० ज्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर 31 मे पूर्वी 'पॅन' साठी अर्ज करणे गरजेचे असते.
० जी व्यक्ती धंदा किंवा व्यवसाय करीत आहे त्याच्या धंद्याची किंवा व्यवसायाची उलाढाल या वर्षी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त होणार असेल तर ते वर्ष संपण्यापूर्वी (म्हणजे 31 मार्च पूर्वी) 'पॅन' साठी अर्ज करावा.
० ज्या करदात्यांचा उद्गम कर कापला जाणार असेल तर ते वर्ष संपण्यापूर्वी (म्हणजे ३१ मार्चपूर्वी) 'पॅन'साठी अर्ज करावा.
० आयातदार आणि निर्यातदार ज्यांना आयात-निर्यातीचा क्रमांक घ्यावा लागतो त्यांना या क्रमांकाचा अर्ज करण्यापूर्वी 'पॅन'चा अर्ज करावा लागतो.

० केंद्रीय उत्पाद कायद्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यापूर्वी 'पॅन' चा अर्ज करावा लागतो.
० सेवा कराच्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यापूर्वी 'पॅन' चा अर्ज करावा लागतो.
० केंद्रीय विक्रीकर किंवा मूल्यवíधत कर कायद्याच्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यापूर्वी 'पॅन' चा अर्ज करावा लागतो.
ज्या व्यक्तींचे फक्त शेतीचे उत्पन्न असेल आणि दुसरे कोणतेच
करपात्र उत्पन्न नसेल तर त्यांना 'पॅन' घेणे बंधनकारक नाही.
'पॅन'चा वापर अनिवार्य :
खालील व्यवहारासाठी 'पॅन' देणे बंधनकारक आहे :
* पाच लाख रुपयांवरील स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार
* चार चाकी वाहनांचा खरेदी-विक्री व्यवहार
* बँक किंवा टपाल कार्यालयात ५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त मुदत ठेवी
* एक लाख रुपयांपेक्षा जास्त रोखे खरेदी-विक्री,
* बँक खाते उघडण्यासाठी. जर खाते अजाण मुलांच्या नावे असेल तर आईचा, वडिलांचा किंवा पालकांचा 'पॅन' द्यावा लागतो.
* डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा अर्ज करताना
* दूरध्वनी (भ्रमणध्वनीसुद्धा) साठी अर्ज करताना
* एका दिवसात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर रोखीने घेतल्यास,
* एका दिवसात ५०,००० रुपयांच्या वर बँक खात्यात रोखीने जमा करणे
* एका वेळेला २५,००० रुपयांवर हॉटेल आणि उपहारगृहात खर्च करणे
* पाच लाख रुपयांवर दागिने आणि जवाहिरीकरिता देणे
* एका वेळेला परदेश प्रवासासाठी २५,००० रुपयांच्या वर रोखीने पसे देणे, (यामध्ये परकीय चलन विकत घेणे आणि सहल आयोजकाला पसे देणे याचा सुद्धा समावेश होतो). या मध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका, कैलाश मानसरोवर यात्रेसाठी चीन, आणि हज यात्रेसाठी सौदी अरब यांचा समावेश होत नाही.
* एका वर्षांला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त विमा हफ्ता भरला असेल तर
* ५०,००० रुपयांच्या वर रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोख्यांची खरेदी
* ५०,००० रुपयांच्या वर शेअर्स, डिबेंचर्स, आणि रोखे खरेदीसाठी कंपनीला देणे,
* ५०,००० रुपयांचा वर म्युच्युअल फंडाला युनिट खरेदीसाठी देणे
ज्या व्यक्तींकडे 'पॅन' नसेल आणि त्यांना वरील व्यवहार करावयाचे असतील तर त्यांना फॉर्म ६० भरून द्यावा लागतो आणि ज्यांचे फक्त शेतीचे उत्पन्न आहे आणि 'पॅन' नसेल तर फॉर्म ६१ द्यावा लागतो.
याशिवाय
* प्राप्तिकर विवरणपत्र, खात्याकडे केले जाणारे अर्ज आणि पत्रव्यवहार या साठी 'पॅन' दर्शविणे बंधनकारक आहे
* कर भरताना 'पॅन' दर्शवणे बंधनकारक आहे
* आपल्या उत्पन्नावर जर उद्गम कर (टीडीएस) कापला जाणार असेल तर उद्गम कर कापणाऱ्याला 'पॅन' कळविणे बंधनकारक आहे. जर 'पॅन' कळविला नाही तर त्यावर २०% उद्गम कर कापला जातो.

'पॅन' कसा मिळवावा:
'पॅन' मिळविण्यासाठी फॉर्म भरून अर्ज करावा लागतो. हा अर्ज स्वीकृतीसाठी प्राप्तिकर खात्याने एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकरवी अनेक केंद्रे जागोजागी उघडलेली आहेत. भारतीय नागरिकांसाठी फॉर्म ४९ अ (जरी अनिवासी भारतीय असतील तरी) आणि परदेशी नागरिकांसाठी फॉर्म ४९ अअ हा भरावा लागतो. या फॉर्म बरोबर ओळखपत्र, राहत्या जागेचा पुरावा आणि दोन छायाचित्र जोडावी लागतात. ओळखपत्रासाठी निवडणूक कार्ड, वाहन चालन परवाना, पारपत्र, बँकेचे फोटो असलेले पासबुक, इत्यादी आणि राहत्या जागेच्या पुराव्या संबंधी रेशन कार्ड, वीज, टेलिफोन देयक, इत्यादी जोडावे लागतात. ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा तरतूद आहे. हा अर्ज ऑनलाईन दाखल करून वरील कागदपत्रे 'एनएसडीएल'ला पाठवावी लागतात. या अर्जाबरोबर १०६ रुपये शुल्क भरावे लागते. भारताबाहेरील 'पॅन' साठी ९८५ रुपये शुल्क भरावे लागते.

'पॅन' वरील तपशील आणि करदात्याची 'ओळख':
ल्ल 'पॅन' कार्ड वर नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, पर्मनन्ट अकाऊंट नंबर, सही आणि फोटो असतो.
ल्ल पर्मनन्ट अकाऊंट नंबर मध्ये पहिली पाच अक्षरे नंतर चार आकडे आणि एक अक्षर असते.
ल्ल 'पॅन' वरून करदाता हा कोण आहे ते ओळखता येते. वैयक्तिक असेल तर चौथे अक्षर 'P'असते, िहदू अविभक्त कुटुंब असेल तर 'H', धर्मादाय संस्था असेल तर 'T', भागीदारी संस्था असेल तर 'F', किंवा कंपनी असेल तर 'C' हे असते. 'पॅन' चे पाचवे अक्षर हे नावाचे पहिले अक्षर असते आणि वैयक्तिक करदात्यांसाठी आडनावाचे पहिले अक्षर असते.

सावधान
हल्ली बऱ्याच ठिकाणी 'पॅन' मिळवून देण्याच्या जाहिराती दिसतात. दोन दिवसात 'पॅन' कार्ड घरी आणून देतो, वगरे. परंतु 'पॅन' कार्ड हे एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थाच देऊ शकतात. त्यामुळे जर 'पॅन' दुसऱ्यातर्फे घेत असाल तर त्याची सत्यता पडताळून खातरजमा करून घ्यावी.

गुरुवार, १८ जून, २०१५

जगातील सर्वात लहान दिवा

जगातील सर्वात लहान दिवा तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून, तो ग्राफिनच्या एका अणूइतक्या जाडीचा आहे. त्यामुळे ग्राफिन आता स्मार्टफोन, संगणक , मोटारी व इमारती तसेच उपग्रह यांचे रूप बदलून टाकणार आहे.

अतिशय पातळ अशा ग्राफिनच्या थरापासून अतितप्त होऊ शकणारे आपल्या नेहमीच्या बल्बमध्ये असते तसे तारेचे वेटोळे तयार करण्यात आले आहे. ते २५०० अंश सेल्सियस तापमानाला प्रकाशमान होते. आण्विक पातळीवर असला तर या बल्बचा प्रकाश नुसत्या डोळ्यांनी दिसतो इतका प्रखर आहे. ज्या सिलिकॉन चिपवर तो बसवलेला असतो तिचे कुठलेही नुकसान या जास्त तापमानामुळे होत नाही. नवीन प्रकारची स्वीच, प्रकाशीय संगणक, डिजिटिल माहितीचे वहन यात त्याचा उपयोग होणार आहे. माहितीचे वहन सिलिकॉन चिपपेक्षा वेगाने होईल असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक जेम्स होन यांनी सांगितले की, संगणकाच्या चिपवर प्रथमच प्रकाशस्त्रोत तयार करण्यात आला आहे. हे संशोधन 'नेचर नॅनोटेक्नॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. होन यांच्या दाव्यानुसार जगातील सर्वात लहान विद्युत बल्ब तयार करण्यात त्यांना यश आले असून, यात नवीन प्रकारचा ब्रॉडबँड प्रकाश उत्सर्जक वापरण्यात आला आहे. त्यामुळे अणुएवढय़ा जाडीच्या लवचिक पदार्थातून प्रकाश मिळवता आला आहे. त्याचा संदेश वहनात मोठा उपयोग होईल. ग्राफिन हा पदार्थ रशियन वैज्ञानिकांनी मँचेस्टर विद्यापीठात शोधून काढला होता व तो कार्बनच्या जाळ्यासारख्या रचनेचा बनलेला असतो. त्याची जाडी एका अणूएवढी असते तो खूपच हलका आणि विजेचा तो पूर्णवाहक असतो.

ग्राफिनचे उपयोग
* पिण्याचे पाणी- खारे पाणी गोडे करण्याच्या तंत्रात ग्राफिनच्या स्फटिकांची जाळी वापली जाते त्यामुळे मीठ गाळून पेय जल बाहेर पडते.
* स्मार्टफोन- ग्राफिन हे पारदर्शक व संवाहक असल्याने त्याचा उपयोग स्मार्टफोनचे टचस्क्रीन तयार करण्यासाठी होतो.
* न गंजणाऱ्या मोटारी- मोटारीत धातू वापरला जातो पण त्या ऐवजी ग्राफिनचा वापर केला तर तो जलरोधक असतो ऑक्सिडेशनची क्रिया रोखली जाते, त्यामुळे गंज चढत नाही.

बुधवार, १७ जून, २०१५

कम्प्युटरच्या अतिवापरामुळे जडणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधीची माहिती

मेडिकेशन नव्हे; मेडिटेशनची गरज
कम्प्युटरच्या अतिवापरामुळे जडणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधीची आपण माहिती घेत आहोत. बैठ्या जीवनशैलीमुळे जडणा-या मानेच्या व इत व्याधींची माहिती आपण या लेखातून घेऊया...
सतत खुर्चीत बसल्यामुळे मानेचे विकार होतात. आपल्या पाठीचे ३३ मणके असतात. पाठीच्या या मणक्यांना ताणणे, पीळ देणे, दाब देणे म्हणजेच नैसर्गिक हालचाली केल्यामुळे पाठीच्या मणक्यांची लवचिकता चांगली राहाते. पण आपली जीवनशैली बदलली, खुर्चीचा वापर वाढला. डाय‌निंग टेबल आले, वॉशिंग मशिन, कमोडची सुविधा आली, वाहाने आली आणि आपल्याला हे सर्व मिळालेच पाहिजे या महत्वाकांक्षेपोटी अपेक्षांचे ओझेही वाढले.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकजण एसीमध्ये काम करतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा संबंधच नसतो. परिणामी डी-३ जीवनसत्वाची कमतरता भासते. त्याचप्रमाणे कॅल्श‌िअमचे प्रमाणही घटते. कॅल्श‌िअमचे प्रमाण घटल्यामुळे हाडे कमकूवत होतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होते. सतत एसीमध्ये बसल्यामुळे फारशी तहान लागत नाही. पाण्याच्या अभावामुळे मलावरोध होते. त्यामुळे मुळव्याध होण्याचा धोका संभवतो. अपूर्ण शौचामुळे पित्त वाढते. याचा झोपेवर परिणाम होऊन निद्रानाशाचा विकार जडू शकतो. पोट जर साफ नसेल तर मन साफ नसते ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे व्यायामाचा अभाव दुसरीकडे बहुतेकजण कँटीन कल्चरला बळी पडतात,. फास्ट फूड, जंक फूड, चहा-कॉफीचे वाढलेले प्रमाण यामुळे पित्त वाढते त्याचबरोबर स्थूलपणाही वाढण्याची शक्यता असते.
ही सर्व जीवनशैली ज्या कम्प्युटरमुळे लागलेली असते त्याच्या मुळाशी पुन्हा गेल्यावर असे लक्षात येते की, कम्प्युटर हा आज्ञाधारक नोकराप्रमाणे वागत असतो. आपल्या प्रत्येक आज्ञेवर तडक कारवाई होते. कम्प्युटरच्या अतिसहवासामुळे माणसांपासून काहीजण दुरावतात. ते ओबिडिअन्ट पीसी सिंड्रोमचे लक्ष्य होतात. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती हुकुमशहासारख्या वागू लागतात. काहीसे हेकेखोर, रागीट व चिडचिडे होतात.
या सगळ्यावर नियंत्रण मिळवणे निश्च‌ति शक्य आहे. त्यासाठी दिवसातील चाळीस मिनिटे स्वतःसाठी काढा. व्यायाम किंवा योगासने करा. प्रत्येक वेळेस वाहान वापरण्याची सवय सोडून द्या. चालण्यावर भर द्या. दर तासाला एक ग्लास पाणी पिणे ही सवय जरी स्वतःला लावून घेतली तर त्याचा खूप फायदा होईल. मुख्य म्हणजे कम्प्युटरपासून दूर जाऊन माणसांमध्ये मिसळा. संयमाची आवश्यक्ता असलेले खेळा खेळा, शांत जागी बसून ध्यानधारणा करा. भावनांचे संतुलन करण्यासाठी मेडिकेशन (औषधे) नव्हे तर मेडिटेशनची (ध्यानधारणा) आवश्यक्ता आहे. अखेरीस कम्प्युटरचे फायदे मिळवताना त्याच्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यास शिकणे गरजेचे आहे.