Translate

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

Function KEYs

F1 Key
एखादा प्रोग्रॅम किंवा साॅफ्टवेअर वापरण जमत नसेल तर ‘help’मध्ये जावं लागतं. help चं बटण मिळत नसेल तर खुशाल F1 दाबावं. help मेनू ओपन होतो.
F2 Key
एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर F2 दाबून हे काम झटक्यात करता येतं
F3 Key
एखाद्या साॅफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशनमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर F3 दाबून हे करता येतं.
F4 Key
तुमच्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवरती अॅक्टिव्ह विंडो जर बंद करायची असेल तर Alt+F4 दाबून हे काम करता येतं.
F5 Key
ही फंक्शन की काय करते हे बऱ्याच जणांना माहीत असतं. रिफ्रेश किंवा रिलोड करण्यासाठी F5 की चा वापर होतो.
F6 Key
इंटरनेट ब्राऊझर सुरू असताना ही ‘की’ दाबल्यावर कर्सर थेट ‘अॅड्रेस बार’ मध्ये जातो. बहुतांशी सगळ्या इंटरनेट ब्राऊझर्समध्ये हे लागू होतं.
F7 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्ड सारख्या अॅप्लिकेशनमध्ये स्पेल चेक आणि ग्रामर चेक करायला या ‘की’चा वापर करता येतो.
F8 Key
विंडोज् मधला बूट मेनू अॅक्सेस करण्यासाठी F8 च्या वापर होतो.
F9 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये पेज रिफ्रेश करायला किंवा मायक्रोसाॅफ्ट आऊटलूकमध्ये मेल पाठवायला किंवा स्वीकारायला ही की वापरतात.
F10 Key
राईट क्लिक करण्याएेवजी shift आणि F10 की दाबीनही हे काम आपण करू शकतो.
F11 Key
इंटरनेट ब्राऊझरमध्ये फुलस्क्रीन करण्यासाठी किंवा फुलस्क्रीनमधून बाहेर पडायला ही ‘की’ वापरली जाते.
F12 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये ‘सेव्ह अॅज्..’ मेन्यू ओपन होतो.

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

स्फुर्तीगीते

खरा तो एकचि धर्म

खरा तो एकचि धर्म जगाला  प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे.

                                साने गुरुजी

सारे जहाँसे अच्छा

सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदिया

गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।
मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।

- मुहम्मद इक़बाल

वन्दे मातरम 

वन्दे मातरम........,..

मां.. मां
सुजलाम सुफलाम मलायाजा शीतलम
शास्यश्यमालम मातरम, वन्दे
सुजलाम सुफलाम मलायाजा शीतलम
शास्यश्यामालम मातरम, वन्दे मातरम !!
वन्दे मातरम........
मां

शुभ्र ज्योत्स्ना पुलाकितायामिनिम,
फुल्ला कुसुमिता दृमादालाशोभिनिम..

सुहासीनीम सुमधुराभाश्हिनिम
सुखदाम वरदाम मातरम
वन्दे मातरम........

सप्त कोटि कंठ कलाकालानिनादा कराले,
निसप्त कोटि भुजैध्रुता कराकर्वाले..
अबलाकेनो मां एतो बाले
बहुबलधारिनिम नमामि तरिनिम
रिपुदालावारिनिम मातरम, वन्दे मातरम !!
वन्दे मातरम........

तव ही दुर्गा दशाप्रहरानाधारिणी
कमला कमालादाला विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि तवम
नमामि कमल अमल अतुलम
सुजलाम सुफलाम मातरम
श्यामल सरल सुस्मिताम भूश्हितम
धरिनिम भारनिम मातरम, वन्दे मातरम
वन्दे मातरम........
मां.. , मां

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला




सत्यम शिवम सुंदरा

नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा 
सत्यम शिवम सुंदरा 
सत्यम शिवम सुंदरा ......   
शब्दरूप शक्ति दे , भावरूप भक्ती दे   
प्रगतीचे पंख दे चिमनपाखरा, चिमनपाखरा
ज्ञान मंदिरा 
सत्यम शिवम सुंदरा 
विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास,  
नाव नेयी पैलतीरी दयासागरा, दयासागरा ,
ज्ञान मंदिरा 
सत्यम शिवम सुंदरा 
होवु आम्ही नीतिमंत, कलागूनी बुद्धिमंत,  
कीर्तिचा कळस जायी उंच अंबरा, उंच अंबरा,
ज्ञान मंदिरा 
सत्यम शिवम सुंदरा 

हिंद देश के निवासी

हिन्द देश के निवासी सभी जन एक हैं।
रंग-रूप वेश भाषा चाहे अनेक हैं।
बेला, गुलाब, जूही, चम्पा, चमेली
प्यारे प्यारे फूल गूंथे माला में एक हैं।
कोयल की कूक प्यारी, पपीहा की टेर न्यारी,
गा रही तराना बुलबुल, राग मगर एक है।।
गंगा, जमुला, ब्रह्मपुत्र, कृष्णा, कावेरी
जाके मिल गई सागर में, हुई सब एक हैं।।