Translate

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

सर्वपल्ली राधाकृष्णन

सर्वपल्ली राधाकृष्णन
सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१]
मागीलराजेंद्र प्रसाद
पुढीलझाकीर हुसेन

कार्यकाळ
१९५२ – १९६२
जन्मसप्टेंबर ५, इ.स. १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत
मृत्यूएप्रिल १७, इ.स. १९७५
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नीसिवाकामुअम्मा
अपत्येपाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल
व्यवसायराजनितीज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
धर्मवेदान्त (हिंदू)
सर्वपल्ली राधाकृष्णन' हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते[संदर्भ हवा]. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.[२].
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.[३]

भारतरत्‍न

१९५४ :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.

ग्रंथ संपदा

राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन[४]
  1. An Anthology (Of Radhakrishnan Writings) (1952)
  2. The Bhagavadgita (1948)
  3. The Brahma Sutra: The Philosophy of Spiritual Life (1960)
  4. The Concept of Man (1960)
  5. The Creative Life (1975)
  6. The Dhammapada (1950)
  7. East and West in Religion (1933)
  8. East and West: Some Reflections (First series in Bently Memorial Lectures) (1955)
  9. Eastern Religions and Western Thought (1939)
  10. Education, Politics and War (A collection of addresses) (1944)
  11. Essentials of Psychology (1912)
  12. The Ethics of Vedanta and Its Metaphysical Presuppositions (1908)
  13. Fellowship of Faiths (Opening address to the Center for the Study of World Religions, Harvard) (1961)
  14. Freedom and Culture (1936)
  15. Gautama, the Buddha (British Academy Lectures) (1938)
  16. Great Indians (1949)
  17. The Heart of Hindustan (1936)
  18. The Hindu View of Life (1926)
  19. History of Philosophy in Eastern and Western (2 Vols.) (1952)
  20. An Idealist View of Life (Hibbert Lectures) (1932)
  21. India and China (1944)
  22. Indian Philosophy - Volume I (1923)
  23. Indian Philosophy - Volume II (1927)
  24. A Source Book in Indian Philosophy (1957)
  25. Contemporary Indian Philosophy (1936)
  26. Indian Religions (1979)
  27. Is this Peace ? (1945)
  28. Kalki or the Future of Civilization (1929)
  29. Living with a Purpose (1977)
  30. Mahatma Gandhi (Essays and Reflections on his Life and Work) (1939)
  31. On Nehru (1965)
  32. Occasional Speeches [July 1959 - May 1962] (1963)
  33. Occasional Speeches and Writings - Vol I (1956), Vol II (1957)
  34. The Philosophy of Rabindranath Tagore (1918)
  35. Radhakrishnan Reader: An Anthology (1969)
  36. Recovery of Faith (1956)
  37. The Reign of Religion in Contemporary Philosophy (1920)
  38. Religion and Society (Kamala Lectures) (1947)
  39. Religion in a Changing World (1967)
  40. Religion in Transition (1937)
  41. The Religion of the Spirit and World's Need: Fragments of a Confession (1952)
  42. The Religion We Need (1928)
  43. President Radhakrishnan's Speeches and Writings 1962-1964 (1965)
  44. President Radhakrishnan's Speeches and Writings 1964-1967 (1969)
  45. Towards a New World (1980)
  46. True Knowledge (1978)
  47. The Principal Upanishads (1953)

हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय

हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय या ग्रंथमालेत डॉ. राधाकृष्णन यांच्यावर १९५२ साली THE PHILOSOPHY OF SARVEPALLI RADHAKRISHNAN प्रकाशित झाला.

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda-1893-09-signed.jpg
स्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोमध्ये
पूर्ण नावविवेकानंद
नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त(संन्यासाश्रमापूर्वी)
जन्मजानेवारी १२, १८६३
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यूशुक्रवार जुलै ४, १९०२
बेलूर, कोलकाता, भारत
कार्यक्षेत्रधर्म
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषाबंगाली, इंग्रजी
प्रमुख विषयवेदान्त, योग
प्रभावरामकृष्ण परमहंस
वडीलविश्वनाथ दत्त
आईभुवनेश्वरी नंदलालजी बसु
स्वाक्षरीSwami-Vivekanda-Signature-transparent.png
गुरु रामकृष्ण परमहंस
स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

जन्म आणि बालपण

माता भुवनेश्वरी देवी
कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.

कॉलेज शिक्षण

नरेंद्ररनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्ट ची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इ. विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी त्यांच्याबद्दल लिहितात : “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.

विवेकानंद नामकरण

राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.

शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद

सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद
सप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातिल शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

समाधी

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे.

तत्त्वविचार आणि शिकवण

स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.
  • त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
  • प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
  • कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
  • उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ: मराठी:"मित्रास",इंग्लिश: "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:
मूळ बंगाली उतारा:
বহুরূপে সম্মুখে তোমার, ছাড়ি কোথা খুঁজিছ ঈশ্বর?
জীবে প্রেম করে যেই জন, সেই জন সেবিছে ঈশ্বর।
देवनागरी लिप्यंतरण:

बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि
कोथाय खूंजिछो ईश्वर
जीवे प्रेम करे जेई जन
सेई जन सेविछे ईश्वर

अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात,तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात.

चरित्र

स्वामी विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. याशिवायची चरित्रे :-
  • अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
  • स्वामी विवेकानंद (लेखक - संदीप जावळे) (२०१५)

नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार

  • पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)
  • पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)
  • शंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)
  • पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)
  • विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.
  • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिगदर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.