जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची. त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे. त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत. अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा. कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार. अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला. त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली. पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच. यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं. त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला. मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही. मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल....
Translate
मंगळवार, २१ एप्रिल, २०१५
सोमवार, २० एप्रिल, २०१५
स्मार्टफोन खरेदी करताना...........
बजेट स्मार्टफोनची सध्या खूप चलती आहे. चांगला फोन घेण्यासाठी आता खिशाला फार चाट पडत नाही. कमी किंमतीचे अनेक स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत, जे तुमच्या बजेटमध्येही आहेत आणि त्यांचे फीचर्सही जबरदस्त आहेत. परंतु कमी किंमतीत जास्त मिळवण्याच्या प्रयत्नात धोकाही होऊ शकतो. त्यामुळे बजेट स्मार्टफोन खरेदी करताना या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा.
1. हाय-एंड स्मार्टफोनशी तुलना करु नका
बरेचसे बजेट स्मार्टफोन युझर्स विचार करतात की, एक स्वस्त स्मार्टफोन दुप्पट किंमत असलेल्या हायएंड स्मार्टफोनपेक्षा कमी पॉवरफुल असतो. यामुळे अनेक वेळा तक्रारी येतात आणि त्याच्या परफॉर्मन्सना युझर्स नाराज असतात.
शाओमी रेडमी नोट आणि युरेका यांसारखे काही फोन हायएंड डिव्हायसेसच्या बऱ्याच जवळ पोहोचले आहेत. पण इतर स्मार्टफोन या हायएंड डिव्हायसेसच्या जवळही पोहोलेले नाहीत.
पण लक्षात ठेवा हे बजेट स्मार्टफोन आहेत. लक्षात ठेवा यामध्ये युझर्सना स्क्रीन रिझॉल्यूशन, प्रोसेसर टाईप आणि स्पीड, रॅम, कॅमेरा क्वॉलिटी, बिल्ड क्वॉलिटी आणि बॅटरी लाईफसारख्या अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागणार. त्यामुळे ही बाब फोन खरेदी करताना ध्यानात असू द्या.
2. फीचर्स व्यवस्थित तपासून घ्या
बजेट स्मार्टफोन विकण्यासाठी निर्माते फोनमधून अनेक फीचर्स हटवतात, जे खरेदी करताना आपल्या लक्षातही येत नाहीत. याचप्रकारे 4 GB इंटरनल स्टोअरेजमध्ये युझर्स फक्त 2 GB चा वापर करु शकतात. फोनच्या 4.7 इंचाच्या स्क्रीनचं रिझॉल्यूशन फक्त 800x480 पिक्सेल असू शकतं.
कनेक्टिव्हिटीच्याबाबती फोनमधून वायफाय डायरेक्ट, NFC आणि नवं ब्लूटूथ 4.0 हटवलेलं असू शकतं.
पैसे देण्याआधी सर्व फीचर्स आहे की नाही हे तपासावं. कॅमेऱ्यात ऑटोफोकसच्या कमतरतेमुळे फोटो क्लिक करताना युझर्सना अडचणी येऊ शकतात. यावरही युझर्सनी लक्ष द्यावं.
3. हार्डवेअरवर फोकस
स्मार्टफोन निवडताना हार्डवेअर स्पेसिफिकेशन योग्यारित्या तपासणं आवश्यक आहे. बजेट फोन असल्यामुळे तो फक्त एण्ट्री-लेव्हल हार्डवेअरच काम करतो, हे गरजेचंच नाही. प्रोसेसर (ऑक्टा कोअर प्रोसेसर), रॅम (जेवढा जास्त तेवढा बरा) आणि उपलब्ध स्टोअरेज चेक करा (एक्स्पांडेबल स्टोअरेजच नेहमी घ्या)
याशिवाय डिस्प्ले साईज आणि रिझॉल्यूशन, कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स, बॅटरी कपॅसिटी याही आणखी गोष्टी आहेत, ज्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. याशिवाय फोन खरेदी करण्याआधी सुरुवातीला एक डेमो फोनमध्ये त्याची बिल्ड क्वालिटी, बटण प्लेसमेंट आणि पोर्ट पाहून घ्या.
4. ऑपरेटिंग सिस्टमचं व्हर्जन तपासा
जुने अँड्रॉईड, विण्डोज आणि ब्लॅकबेरी व्हर्जनवर सुरु असलेले स्मार्टफोनही सध्या उपलब्ध आहेत. बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन घेण्याचा निर्णय पक्का केल्यास सर्वात आधी ऑपरेटिंग सिस्टमवर लक्ष द्या. ऑपरेटिंग सिस्टमचं जुनं व्हर्जनमुळे फोन अडकायला नको हेच युझर्सना अपेक्षित आहे.
वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगवेगळ्या हार्डवेअरची आवश्यकता असते. अँडॉईडच्या लेटेस्ट व्हर्जनच्या तुलनेत विण्डोज ऑपरेटिंग सिस्टमच्या लेटेस्ट व्हर्जनसाठी कमी प्रोसेसर स्पीड आणि रॅमची गरज असते. शिवाय थर्ड पार्टी अॅप प्री-इन्स्टॉल्ड आहेत आणि ते अनइन्स्टॉल केल्यावर फोनच्या परफॉर्मन्सवर काही फरक पडेल का? हे देखील तपासून पाहा
5. आफ्टर सेल्स सपोर्ट
अनेक स्मार्टफोन एका वर्षाच्या वॉरंटीसोबत येतात. पण जर सर्व्हिस सेंटर जवळ नसेल तर या वॉरंटीचा काहीच फायदा नाही.
कंपनीच्या वेबसाईटवर जवळचे सर्व्हिस सेंटर शोधा. विविध फोरममधून व्हेरिफाय करा की कंपनीची सपोर्ट रेप्युटेशन कशी आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये स्मार्टफोनचे स्पेअर पार्ट्स न मिळण्याची समस्या उद्भवू शकते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
