Translate

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

आयुर्वेद - 01

आयुर्वेदाने मध्यतरीच्या काळात ओळख गमावली होती. आधुनिक विज्ञानाच्या शोधानंतर परत लोक आयुर्वेदिक इलाजा कडे वळू लागलेली आहे. अनेक कारणांनी आयुर्वेदाने लोकप्रिय केले आहे. त्यापैकी महत्वाचे आधुनिक औषधांप्रमाणे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. दुसरी बाब, आयुर्वेद पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि, आयुर्वेद फक्त एका रोगाचा इलाज करण्याकडे लक्ष देत नाही तर तो संपूर्णपणे निर्मूलनासाठी केंद्रित करतो.
१.आपल्या चेहर्याला ताज्या टोमॅटोने रसाने मसाज करा आणि 1 , 2 तासांनंतर चेहरा धुवून घ्यावा. हा साधा आयुर्वेदिक उपाय पीपल्स सारख्या समस्या साफ करण्यात मदत करते आणि चेहऱ्यावर तेज आणण्यास मदत होते.
२. रोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या, आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.
३. दररोज गरम पाणी आणि निंबू व मध हे पिण्याची सवय करा, नैसर्गिकरित्या वजन कमी होते.
४. कोरफडचा गर चेहर्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघतील.
५. नारळाचे तेल व लिंबाचा रस ह्याने १० ते १५ दिवस केसाची मालिश करा आपोआप केसातील कोंढा हि समस्या सुटण्यास मदत होईल..
६. पावसाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात.
७. तसेच कडूनिंबाचे २० ते ३० पाने टाकून पाणी उकळून घ्यावे आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसातील कोंढा काही दिवसात नाहीसा होता
८. जेवणानंतर भरपोट पाणी पिल्यास त्वचेवरील पिंपल्स (तारुण्यपिटिका) चालले जातात.
९. कडूनिंबाच्या रोज १ ते २ छोट्या गोळ्या बनवून खालल्या तर चेहरा,तब्येत आणि इतर अनेक गोष्टी सुधारतात.
१०. पुदिन्याने चेहऱ्याची मसाज करून तो लेप रात्र भर चेहऱ्यास लावून ठेवावा. ह्याने चेहरा ताजातवाना व चेहऱ्यावरील सौंदर्य खुलेल.
११. त्वचेला एरंडेल तेलाने मालिश केल्यास त्वचा लवचिक राहते.
१२. सकाळी उठल्याबरोबर १ ते २ ग्लास पाणी पिल्यास प्रातविधी साफ होते व त्वचा ताजीतवानी राहते.
१३.चेहरा गोरा करण्याकरितात झोपताना रोज गायीच्या शुद्ध तुपाने मालिश करा व सकाळी चेहरा धुतल्यानंतर फरक जाणवेलच.
१४.कपालभारती प्राणायाम रोज ५ मिनिट केल्यास त्वचेवरील तेज अबाधित राहते.
१५. सूर्यनमस्कार रोज करणे हे शरीरास त्वचेस लाभदायक आहे.

१६. शुद्ध बदाम तेल किंवा शुद्ध नारळ तेल आठवड्यातून दोनदा मसाज करा, आयुर्वेदिक नियमानुसार शरीरात रक्त प्रवाह वाढते आणि आधी नसलेली त्वचेवरील चमक परत आणते.
१७. आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस उपास ठेवा आणि त्या दिवशी फक्त फळे व दुध घ्या शरीरातील अनोपयोगी तयार होणारे विषारी द्रव्य निघून जातात.
१८. चेहऱ्यावर शुद्ध मध बरोबर लिंबाचा रस लावावा, हे घरगुती उपाय मुरुमांपासून फार लवकर उपचाराकरिता उपयुक्त आहे.
१९. रोज तीन ते चार खजूर खालल्यास त्वचा चांगली राहते.

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

मंगळवेढा

सोलापूर पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण आहे. चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत. सोलापूरचा किल्ला, मंगळवेढा किल्ला आणि माचणूर किल्ला, सिध्देश्वर मंदिर दोन दिवसात सहज पाहून होतात.


इतिहास :
प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्‍या मुलाचा याठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते.
आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात घेतला.

मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे महत्व कमी झाले.

पहाण्याची ठिकाणे :
आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे. त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात.
किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात १५७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्‍या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.
गावातील कॉलेज जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा :
मंगळवेढा हे सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून ५० किमी आणि पंढरपूर पासून २३ किमी अंतरवर असल्याने दोन्ही ठिकाणावरुन बसची उपलब्धता आहे