Translate

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

कधी पाहिल्यात नाही एवढ्या उंच झाडावर चढलेल्या बक-या .....

पिकलेली रसरशीत फळे खाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बक-या उंचच उंच झाडावर चढतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला बक-यांचा हा फोटो तुम्ही कधीना कधी पाहिला असेलच. आतापर्यंत झाडांवर पक्ष्यांचा थवा बसलेला पाहिला असेल, पण प्रत्येक फांद्यावर उभ्या असलेल्या या बक-या पाहून तुम्ही म्हणाल नक्कीच हा फोटो म्हणजे फोटोशॉपचा नमुना असेल, आपल्या इथल्या बक-या नाही बुवा एवढ्या उंच झाडावर चढलेल्या कधी पाहिल्यात. ते खरंही आहे म्हणा.. हा फोटो आपल्या इथला नाही, तर तो मोरोक्को मधला आहे,  इथे आढळणा-या आर्गनची पिकलेली रसरशीत फळे खाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बक-या उंचच उंच झाडावर चढतात.
मोरोक्कोच्या नैऋत्येला आर्गनची झाडे आढतात, फक्त बक-यांसाठीच नाही तर माणसांसाठीही  फळ फायद्याची आहेत. या फळापासून जगातले सगळ्यात महागडे तेल बनते, आता हे तेल कसे बनते ते ऐकून तुम्ही कदाचित नाक मुरडाल, पण हे वाचणेही मजेशीर आहे. बक-या ही फळे खातात तेव्हा त्यांच्या बियाही गिळतात, या बिया विष्ठेवाटे बाहेर पडतात. त्यानंतर बक-यांची विष्ठा गोळा करून त्यातून बिया बाहेर काढल्या जातात, या बिया हाताने कुटून त्यापासून तेल काढलं जाते, म्हणूनच जगातील महागड्या तेलापैकी ते एक तेल आहे.
आर्गन फळे आर्गनची फळे
तेलाचं जाऊ द्या, पण जागातली सगळ्यात महागडी कॉफी देखील अशीच बनवली जाते, आपल्या इथल्या कुर्गच्या मळ्यात मांजरीच्या प्रजातीचा एक प्राणी आढळतो, हा फक्त कॉफीची तिच फळ खातो जी पूर्णपणे पिकलेली असतात. या मांजरीच्या विष्ठेतली कॉफीच्या बिया गोळ्या करून त्यापासून कॉफी बनवली जाते.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

Function KEYs

F1 Key
एखादा प्रोग्रॅम किंवा साॅफ्टवेअर वापरण जमत नसेल तर ‘help’मध्ये जावं लागतं. help चं बटण मिळत नसेल तर खुशाल F1 दाबावं. help मेनू ओपन होतो.
F2 Key
एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर F2 दाबून हे काम झटक्यात करता येतं
F3 Key
एखाद्या साॅफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशनमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर F3 दाबून हे करता येतं.
F4 Key
तुमच्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवरती अॅक्टिव्ह विंडो जर बंद करायची असेल तर Alt+F4 दाबून हे काम करता येतं.
F5 Key
ही फंक्शन की काय करते हे बऱ्याच जणांना माहीत असतं. रिफ्रेश किंवा रिलोड करण्यासाठी F5 की चा वापर होतो.
F6 Key
इंटरनेट ब्राऊझर सुरू असताना ही ‘की’ दाबल्यावर कर्सर थेट ‘अॅड्रेस बार’ मध्ये जातो. बहुतांशी सगळ्या इंटरनेट ब्राऊझर्समध्ये हे लागू होतं.
F7 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्ड सारख्या अॅप्लिकेशनमध्ये स्पेल चेक आणि ग्रामर चेक करायला या ‘की’चा वापर करता येतो.
F8 Key
विंडोज् मधला बूट मेनू अॅक्सेस करण्यासाठी F8 च्या वापर होतो.
F9 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये पेज रिफ्रेश करायला किंवा मायक्रोसाॅफ्ट आऊटलूकमध्ये मेल पाठवायला किंवा स्वीकारायला ही की वापरतात.
F10 Key
राईट क्लिक करण्याएेवजी shift आणि F10 की दाबीनही हे काम आपण करू शकतो.
F11 Key
इंटरनेट ब्राऊझरमध्ये फुलस्क्रीन करण्यासाठी किंवा फुलस्क्रीनमधून बाहेर पडायला ही ‘की’ वापरली जाते.
F12 Key
मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये ‘सेव्ह अॅज्..’ मेन्यू ओपन होतो.