Translate

मंगळवार, १७ मार्च, २०१५

व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग

व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंगची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या वापरकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाली. पण व्हॉट्सअ‍ॅपने सुरू केलेल्या ४८ तासांच्या अवधीत ज्यांनी ही सुविधा सुरू केली त्यांनाच हा आनंद सध्या उपभोगता येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे व्हॉइस कॉलिंग येणार येणार अशी चर्चा गेला महिनाभर चांगलीच रंगते आहे. त्याचे अनेक स्पॅम्स आणि मालवेअर्सही आले. पण शुक्रवारी आणि शनिवारी अँड्रॉइड वापरकर्त्यांना सुखद धक्का बसला. व्हॉट्सअ‍ॅपचे २.१२.५१६ हे व्हर्जन अपडेट केल्यावर व्हॉइस कॉल सुरू होईल, असा संदेश फिरू लागला. या संदेशानुसार अनेकांनी हे व्हर्जन अद्ययावत केले. व्हर्जन अद्ययावत केल्यानंतर ज्यांच्याकडे यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगची सुविधा आहे त्यांनी वापरकर्त्यांला व्हॉट्सअ‍ॅप कॉल केल्यानंतर ही सुविधा सुरू होते अशी माहिती संकेतस्थळांवरून फिरत होती. व्हर्जन अद्ययावत झाले, मात्र पहिला कॉल कोण करणार, हा प्रश्न सर्वाना पडला होता. यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत वापरकर्ते कुणाकडे व्हॉट्सअ‍ॅप कॉलची सुविधा आहे याचा शोध घेत राहील. हा शोध घेत असतानाच त्यांना कुणीतरी सापडले आणि त्यातील अनेकांकडे कॉलिंगची सुविधा सुरू झाली. मात्र ज्यांना शनिवापर्यंत कॉल करणारी व्यक्ती सापडली नाही त्यांना मात्र सध्या केवळ इनकमिंग कॉल्सवरच समाधान मानावे लागत आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी व्हॉइस कॉलिंगची सुविधा सुरू केल्याचे वृत्त ऑनलाइन जगतात तेजीत पसरले. तेथे दिलेल्या सूचनांप्रमाणे अनेकांनी अद्ययावत आवृत्तीही घेतली. पण अजून ही सुविधा त्यांना मिळू शकलेली नाही. अद्ययावत आवृत्तीबाबत माहिती देत असताना कंपनीने कोणत्याही प्रकारे या आवृत्तीत तुम्हाला व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध होईल, असा उल्लेख केला नव्हता. यामुळे अनेक वापरकर्ते गोंधळलेही. कंपनीने अद्याप अधिकृतपणे व्हॉइस कॉलिंग सुरू झाले अशी घोषणा केलेली नाही. पण कंपनीतर्फे त्याच्या चाचण्या होत असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच चाचण्यांचा एक भाग म्हणून भारतातही काही काळ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच कंपनीने अ‍ॅपच्या २.१२.२ आवृत्तीपासून इनकमिंग कॉल्सची सुविधा सुरू केली आहे. यामुळे ज्या वापरकर्त्यांनी आवृत्ती अद्ययावत केली आहे त्यांना सध्या केवळ इनकमिंग कॉल्स येत आहेत. आवृत्तीचे क्रमांक हे वेगवेगळय़ा ऑपरेटिंग प्रणालीनुसार वेगवेगळे आहेत. सध्या इनकमिंग कॉल्सची सुविधा अँड्रॉइड या ऑपरेटिंग प्रणालीवरच उपलब्ध आहे.

कसा सुरू होईल व्हॉट्सअ‍ॅप कॉल?
कंपनीने कॉलिंग सेवेची अधिकृत घोषणा केल्यानंतर ही सुविधा सर्वत्र उपलब्ध होईल. यासाठी काय करावे लागेल?
* सर्वप्रथम तुमची व्हॉट्सअ‍ॅपची आवृत्ती अद्ययावत करून घेणे.
* यानंतर ज्यांच्याकडे व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे त्यांना तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करण्यास सांगावे.
* त्यांनी कॉल केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या होम स्क्रीनचा लुक बदलतो. त्यामध्ये कॉल्स, चॅट्स आणि कॉन्टॅक्ट्स हे तीन भाग दिसतात. कॉल्समध्ये तुम्हाला तुम्ही केलेले कॉल्स, आलेले कॉल्स याचबरोबर मिसकॉल्सचीही माहिती मिळते.
* डेटा कॉल असल्यामुळे आवाज पोहोचण्यास उशीर होतो.
* हा कॉल करण्यासाठी तुमच्याकडे किमान थ्रीजी जोडणी असावी.
* कॉलसाठी इंटरनेटचे पैसे खर्च होतील.
* एका मिनिटाच्या कॉलसाठी अंदाजे 240 केबी डेटा खर्च होऊ शकतो.
* तुमचा डेटा प्लान आणि कॉलिंग प्लान याची तुलना करून तुम्ही हा पर्याय वापरायचा की नाही हे ठरवू शकता.

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

पर्यावरण भूगोल

आपण वर पाहिलेल्या उपघटकांच्या व्यतिरिक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खालील काही अतिरिक्त घटकांचाही अभ्यास करावा लागतो-

ल्ल पर्यावरण भूगोल- खरेतर पर्यावरण शास्त्र हा स्वतंत्र उपघटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला अभ्यासावा लागतो. म्हणून येथेच त्याचा सविस्तर अभ्यास केल्यास पूर्वपरीक्षेसाठी त्याचा जास्त फायदा होतो. यात परिस्थितीकी आणि परिसंस्था, पर्यावरण, अवनती आणि संवर्धन, जैवविविधता, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणविषयक कायदे, क्योटो प्रोटोकॉल, नागरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन यातील जैवविविधता, जैवविविधतेचा अभ्यास. क्योरो प्रोटोकॉल या उपघटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. पर्यावरणविषयक सर्व कायदे व्यवस्थित अभ्यासावेत.
ल्ल कृषी परिस्थितीकी- या उपघटकात पिकांचे वितरण, त्याचे उत्पादन, पीक वाढीसाठी आवश्यक असणारे हवामानाचे घटक, जलदर्जा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, कोरडवाहू शेती आणि तिची समस्या, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करावा.
ल्ल दूरसंवेदन- परीक्षार्थीना सर्वात अवघड वाटणारा हा घटक आहे. यावर दर वर्षी साधारणत: दोन ते पाच प्रश्न विचारले जातात. हा घटक पूर्वपरीक्षा तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. यात दूरसंवेदनाची संकल्पना, भारतीय दूरसंवेदन उपग्रह, दूरसंवेदन याचे नसíगक साधनसंपत्तीमध्ये उपयोजन, भौगोलिक माहितीप्रणाली, जागतिक स्थाननिश्चितीप्रणाली यांचा अभ्यास करावा.
महत्त्वाचे प्रश्न :
१) खालील दिलेल्या भारताच्या नकाशात ‘अ’ या चिन्हाने दर्शवलेला विद्युत प्रकल्प खालीलपकी कोणत्या नदीवर आहे व त्याचे नाव काय आहे?
१) कृष्णा नदीवर, कोयना
२) शरावती नदीवर, शरावती
३) तुंगभद्रा नदीवर, तुंगभद्रा
४) कृष्णा नदीवर, नागार्जुन सागर
२) खालील विधानांचा विचार करा.
अ) आसामची सरहद्द भूतान आणि बांगलादेशाशी आहे.
ब) पश्चिम बंगालची सरहद्द भूतान आणि नेपाळशी आहे.
क) मिझोरामची सरहद्द बांगलादेश आणि म्यानमारशी आहे.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
१) अ, ब आणि क २) फक्त अ आणि ब
३) फक्त ब आणि क ४) फक्त अ आणि क
३) भौगोलिक प्रदेशाला खालील सुस्पष्ट गुणवैशिष्टय़े आहेत.
१) उबदार आणि शुष्क हवामान
२) सौम्य आणि ओला हिवाळा
३) सदाहरित ओक वृक्ष
वरील गुणवैशिष्टय़े खालीलपकी कोणत्या प्रदेशाची आहेत?
१) भूमध्य समुद्राभोवतीचा प्रदेश
२) पूर्व चीन
३) मध्य चीन
४) उत्तर अमेरिकेचा अटलांटिक किनारा
४) खालील विधानांचा विचार करा.
अ) भूमिजन्य निक्षेप प्रामुख्याने समुद्रबुड जमीन व खंडान्त उतार या प्रदेशात आढळतात.
इ) समुद्रबुड जमीन व सागरी मदान यांना जोडणारा दुवा म्हणजे खंडान्त उतार होय.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत.
१) फक्त अ बरोबर २) फक्त इ बरोबर
३) दोन्ही बरोबर ४) दोन्ही
५) खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा.
१) अस्तंभा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर
२) साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंभा, त्र्यंबकेश्वर
३) महाबळेश्वर, अस्तंभा, साल्हेर, त्र्यंबकेश्वर
४) त्र्यंबकेश्वर, साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंभा