Translate

मंगळवार, ३ मार्च, २०१५

जीभेची कशी घ्याल काळजी?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

सुजलेल्या पायांवर पाच उपाय

काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्‍यांचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात.
साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत.महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात.
रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात. अशा पाय सुजण्यावर खालीलप्रकारचे पाच उपाय करावेत. ते सर्व घरगुती उपचार आहेत.
१) एका बकेटात पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल.
२) रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
३) अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते.
४) उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.
५) भरपूर पाणी प्यावे.