महाराष्ट्रातील ३५ ते ४० वयोगटातील लोक किंवा वयस्कर लोकाकरिता आजही दादा कोंडके एक महान व्यक्तिमत्व म्हणून आहे.
अभिनयाचा हुकमी एक्का, विनोदाचा बादशाह, गीतकार ,लेखक एक मध्यम वर्गीय भोळ्या माणसाला त्यांनी चित्रपटसुष्टीच्या पडद्यावर अनेक काळ रेखाटल. पोट मारून कमाई करणारे आणि त्यानंतर मनोरंजनाकरिता सिनेमा गृहात जाणार्या दर्शकाचे दादा हक्काचा माणूस होता. त्या लोकांना काहीही करून हसवणे हे दादाला चांगल जमत होत. त्यांचे ९ सिनेमे त्या काळात २५ आठवड्यापेक्षा जास्त सिनेमा गृहात चालले. याची गिनीज बुकात नोंद आहे. मराठी सिनेमा अच्युत उंचीवर दादांनी नेला तेच याचे विधाते होते. लक्ष्मीकांत बर्डे हे दादापासूनच प्रभावित होते. हिंदी चित्रपट सृष्टीने हीच चाबी पकडून समोर चालू ठेवली व गोविंदा सुद्धा हीच शैली वापरत होता.
तेव्हा सुद्धा दादांना या विषयी बराच विरोध झाला. स्त्रियांचा अपमान हा मुख्य विषय, पशात्य कपड्यात नाचणाऱ्या नटी समोर दादाचे भोळा मराठी माणूस उठून दिसत होता.द्विअर्थी शब्द हे दादानीच सिनेमात आणले.
त्यांनी महाराष्ट्रात सिनेमामध्ये अनेक कीर्तिमान केले. चला आता बघूया कृष्णा दादा कोंडके उर्फ दादा कोंडके याच्या बद्दल माहिती..
८ ऑगस्ट १९३२ साली दादा कोंडके यांचा जन्मदिवस त्यांचा पहिला सिनेमा तांबडी माती १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. चंदू जमादार,राम राम गंगाराम, राम राम अन्थाराम , एकटा जीव सदाशिव, तुमच आमच जमल, अंधेरी रात मी दिया तेरी हात मे या काही प्रसिध्द सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते.
१९९४ मध्ये आलेला सिनेमा सासरच धोतर हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. त्याची निर्मिती दादानेच केली होती.
याच्या व्यतिरिक्त १० गोष्टी ज्या दादा कोंडके विषयी सर्वाना माहिती असायला हवी
१.मराठी नाटक विच्छा माझी पुरी करा ची सुरवात १९६५ मध्ये झाली या मधूनच दादांना जास्त ओळख मिळाली. या नाटकाला वसंत सबनीस यांनी लिहले होते. Anti Establishment या विषयावर हे नाटक होते. नाटकात राजा,नर्तकी व मूर्ख कोतवाल याच्यात दाखवलेली आहे. या नाटकाचे जवळपास १५०० प्रयोग झाले होते. याचा आखरी प्रयोग मार्च १९७५ मध्ये हैद्राबाद ला झाले.
२.सन १९७५ मध्ये पांडू हवलदार हा सिनेमा आला. यामध्ये त्यांनी पांडू नावच पात्र केल. त्यानंतर महाराष्ट्रात पोलिसांना पांडू लोक संबोधू लागले.
३.दादा व जब्बार पटेल यांचा वाद लोकप्रिय होता कारण दादाची लोकप्रियतेवर हिंदी चित्रपट सृष्टी नेहमी बोटे मोडत.
४.दादाचे वडील गिरणी कामगार होतें, त्यांचे सुरवातीचे जीवन लालबाग मधील चाळीत गेले. दादांची संपूर्ण भागात भिती होती. दादांनी स्वतः सांगितले होते “ लालबाग मध्ये मी दादा होतो, कोणीही दादागिरी केल्यास सोडा बोतल ते गोटे इत्यादी साहित्य मी भांडणात वापरले आहे.”
५.दादा निर्मित पहिला सिनेमा सोंगाड्या १९७१ मध्ये आला. नाम्या नावक युवकाचे पात्र जो कलावतीच्या प्रेमात अखंड बुडाला. सोंगाड्या भयंकर हिट झाला तेव्हापासून भोळा नायक हि मुख्य शैली दादांनी सुरु ठेवली. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.
६.त्यानंतर दादा शिवसेनेच्या सभेत दादा स्टेजवर भाषणे देत. लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत व सभेना भयंकर गर्दी होत असे.
७.१९८६ मध्ये आलेला सिनेमा अंधेरी रात मी दिया तेरे हात मै , गुल्लू नावाचा हा मुख्य पात्र सिनेमातील उषा चव्हाण या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या. दादा सोबत जास्तीत जास्त सिनेमात उषा चव्हाण ह्या होत्या. मेहमूद हे खलनायकच्या भूमिकेत या चित्रपटात होते.
८.दादाचे वडील मुळचे मुंबईचे नाही ते कामानिमित्त आले होते. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.
९.दादांना एका भविष्यावाल्यांनि सांगितले होते तू आयुष्यात कधीही प्रगती करणार नाही परंतु दादा चाळी पासून शिवाजी पार्क मध्ये मोठ्या बंगल्या पर्यंत पोहचले.
१०.त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होते. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती. हे स्वंप्न दादाचे अपूर्णच राहिले. मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.
मला सासचे धोतर चित्रपट बघायला आवडेल पन तो नेट वर सापडला नाही तर मदत करा
उत्तर द्याहटवा