दिलेल्या तारीख व वारा वरून विचारलेल्या तारखेचा वार ठरवणे.
नियम:-
1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असतो.
लीप वर्षी मात्र 31डिसेंबरला मंगळवार असेल.
कोणत्याही महिन्याच्या 1 तारीखेला समजा सोमवार असेल 28 तारखेला रविवार,29 तारखेला सोमवार ,30 तारखेला मंगळवार व 31 तारखेला बुधवार असतो.
31 दिवस असलेल्या महिन्यात 1,2 व 3 तारीख असलेले वार पाच वेळा येतात.
30 दिवस असलेल्या महिन्यात 1व 2 तारखेचे वार पाच वेळा येतात.
29 दिवस असलेल्या महिन्यात 1 तारखेचा वार पाच दिवस येतो.
28 दिवस असलेल्या महिन्यात एकही वार पाच वेळा येत नाही.
1 वर्ष =365 दिवस
म्हणजे 52 आठवडे व 1 दिवस
लीप वर्ष =366 दिवस , लीप वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो.
महिने दिवस
जानेवारी 31
फेब्रुवारी 28/29
मार्च 31
एप्रिल 30
मे 31
जून। 30
जुलै 31
ऑगस्ट 31
सप्टेंबर 30
ऑक्टोबर 31
नोव्हेंबर। 30
डिसेंबर। 31
उदा. 1जानेवारीला 2015 ला गुरूवार असल्यास 25 मार्च 2015 ला कोणता वार असेल?
:- दिलेल्या तारखेपासुन विचारलेल्या तारखेपर्यंतची बेरीज करू.
महिना दिवस
1 जानेवारी 2015 31 दिवस
फेब्रुवारी 2015 28 दिवस
25 मार्च 2015 25 दिवस
एकूण। = 84 दिवस
आता 84 दिवसाला 7ने भागु
84÷7=12 ,बाकी =0
म्हणजे तो वार बूधवार आहे.
आता बाकी 0 म्हणजे दिलेल्या वाराच्या अगोदर चा वार.
भागाकारा वरून वार कसा ठरवावा?
समजा दिलेल्या तारखेचा वार सोमवार आहे.
तर विचारलेल्या तारखेचा वार काढण्यासाठी दिलेल्या तारखेपासून विचारलेल्या तारखेपर्यंची बेरीज करावी, बेरजेला 7 ने भागावे.भागाकारातील उरलेल्या बाकीवरून वार ठरवावा.
समजा दिलेल्या तारखेचा वार सोमवार
आहे,तर विचारलेल्या तारखेचा वार खालील असेल.
बाकी 0 आल्यावर ---रविवार
बाकी 1 आल्यावर ---सोमवार
बाकी 2 आल्यावर --मंगळवार
बाकी 3 आल्यावर ---बुधवार
बाकी 4 आल्यावर ---गरुवार
बाकी 5 आल्यावर----शुक्रवार
बाकी 6 आल्यावर----शनिवार
कुठल्याही तारखेवरून त्या दिवशी वार कोणता होता हे कसे ओळखायचे?
तर त्याची रीत हि पुढील प्रमाणे.
प्रत्येक महिन्याकरीता काही स्थिरांक ह्यात पकडलेले आहेत.
एचाचा शुदोपा शुतीस एचास.
जानेवारी -ए (१)
फ़ेब्रुवारी- चा (४)
मार्च- चा(४)
एप्रिल -शु (०)
मे- दो (२)
जुन -पा(५)
जुलै- शु (०)
ऒगस्ट- ती(३)
सप्टेंबर- स (६)
ऒक्टोबर- ए (१)
नोव्हेंबर- चा (४)
डिसेंबर- स (६)
आता तारखे कडे वळु यात.
समजा
आपल्याला १५ ऒगस्ट १९८५ साली कोणता वार होता हे कॆलेंडरशिवाय पहायचे असेल तर
त्याची रीत हि पुढील प्रंमाणे.
१.सर्व प्रथम हि तारीख ज्या वर्षात आहे त्याचे शेवटचे दोन अंक घ्या.
इथे ८५ हे शेवटचे दोन अंक आहेत.
२.ह्या आकड्याला १.२५ ने गुणा.
उत्तर येईल = १०६.२५
ह्यातील दशांश चिन्हा पलीकडील भाग सोडून द्या.
राह्तील =१०६
३. ह्या मध्ये जी तारीख आहे तो अंक मिळवा.
उत्तर आहे= १०६+१५=१२१
४. ह्या उत्तरात ही तारीख ज्या महिन्यात आहे त्याचा स्थिरांक मिळवा.
उत्तर= १२१ + ३
=१२४
५. ह्या उत्तराला ७ ने भागा व बाकि किती राहते ते पहा
=१२४/७ (रिमेंडर)=५
जेवढी बाकी राहील त्याप्रमाणे वार हे पुढील क्रमाने येतील
०- शनिवार
१-रविवार
२-सोमवार
३-मंगळवार
४-बुधवार
५-गुरुवार
६-शुक्रवार
इथे बाकी ५ राहते म्हणुन
१५ ऒगस्ट १९८५ साली वार हा गुरुवार होता.
समजा हि तारीख लीप वर्षात असेल तर?
हि तारीख २९ फ़ेब्रुवारी नंतर असेल तर वरच्या रिती मधे काहिहि फ़रक पडत नाही.
परंतु हि तारीख जर १ जानेवारी ते २९ फ़ेब्रुवारी च्या मधे असेल तर शेवटचा भाग देण्यापुर्वी उत्तरातुन
१ वजा करावा.
व उत्तराला ७ ने भाग देउन आलेल्या बाकी वरून वरिल प्रमाणे वार पहा.
मराठी सण उत्सव पुजा उपवास तिथी
मराठी महिने1. चैत्र 2. वैशाख 3.जेष्ठ 4.आषाढ
5. श्रावण 6.भाद्रपद 7. आश्विन 8.कार्तिक
9. मार्गशीर्ष 10.पौष 11.माघ 12.फाल्गुन
चार मोठ्या एकादशी
1) माघ शु.11 जया एकादशी(फेब्रुवारी)
2) चैत्र शु.11 कामदा एकादशी(शिंगणापूर यात्रा) (मार्च)
3) आषाढ शु.11 देवशयनी एकादशी पंढरपूर यात्रा (जुलै)
4) कार्तिक शु.11 प्रबोधनी एकादशी (नोव्हेंबर)
** माघ क्र . 13 महाशिवरात्री उपवास (मार्च)
सण व उत्सव
1) (नव्याची पुनव) -कुलधर्म पोर्णिमा
माघ शु.15 श्राद्ध पुजन, दारासमोर धाट,करडी ठेवून पुजन करावे.महाळ महिना सुरू.
2) पालवी पुजन (झाड पुजन)
---आषाढ शु.15 गुरूपोर्णिमा (व्यासपुजा)
पालवी पुजन (गुरुपोर्णिमा ते अमावस्या)या आलेल्या पंधरवाड्यात येणार या मंगळवार व शुक्रवार यापैकी कोणत्याही दिवशी बाभळीच्या लहान रोपाची (पालवीची) पुजा करतात. पालवी पुजनासाठी पाच पाच फळ व मुठके ,तांदुळकुंद्रा ची भाजी ,दही, ज्वारीच्या घुगर्याया, सपक वरण ,जीरे,फुटाणे इ.चा नैवद्य दाखवतात.तसेच म्हसोबा,मरीआई ,मारोती (सेंदुर लावुन) नारळ फोडुन पुजा करतात.
3) अंगारकी संकष्ट चतुर्थी उपवास श्रावण क्र. 3
*भावाचा उपवास श्रावण शुद्ध क्र.4(एकवत)
*नागपंचमी -श्रावण शुद्ध पंचमी क्र 5
4) गोकुळ अष्टमी
श्रावण क्र.8
5) गोपाळ काला
श्रावण क्र. 9
6) हरतालिका
भाद्रपद शु.3
7) धनत्रयोदशी-आश्विन क्र.13
स्त्रीयांचे स्नान
8) नरकचतुर्दशी - आश्विन क्र.14
पुरुष अभ्यंग स्नान
* नागदिवे
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
या दिवशी तिन्हीसांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत मुलगा अथवा मुलीच्या नावे पेढा ,जिलेबी अथवा कोणताही पदार्थ ठेवून पुजा करतात.हरभरा भाजी व भात नैवेद्य ठेवतात.त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करतात.दिव्यांचे वातधुप लोखंडी वस्तुवर धरून त्याचे काजळ म्हणुन डोळ्यात घालतात.
9. खंडोबा यात्रा (सट) -मार्गशीर्ष शु.6 (डिसेंबर)
10. दत्तजंयती -मार्गशीर्ष शु.14. (डिसेंबर)
Khandoba devaca vaar konata Krupa Karun kalavave
उत्तर द्याहटवा?? Apan aple naav krupa karun kalavave
हटवा