Translate

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मेजर ध्यानचंद : एक होता जादूगार

मेजर ध्यानचंद : एक होता जादूगार
हजारों साल नर्गिस अपनी बेनुँरी पे रोती है.
बडी मुश्किल से होता है, चमन मे दिदावर पैदा..
– अल्लामा इकबाल

काही लोकं असतातच अशी. जन्मजात कौंतेय कर्णासारखी अपराजीत.. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या तेजापुढे बड्याबड्या रथी-महारथींची किर्तीही धुसर होते. असाच एक तारा ब्रिटिशकालीन भारतात जन्माला आला. जो पुढे हॉकीचा जादूगार म्हणून ओळखला जाऊ लागला.. नाव होतं ध्यान सिंग….. उर्फ ध्यानचंद

Dhyanchand_1

29 ऑगस्ट 1905ला ध्यानसिंग यांचा अलाहाबादमध्ये जन्म झाला… वडील सामेश्वरसिंग  सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं.. त्यामुळे ध्यानसिंग  यांना जास्त शिकता नाही आलं. सहा वर्षे शाळा नावाचं जग अनुभवल्यानंतर, वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी सैन्यात नोकरी पत्करली. 16 व्या वर्षी दिल्लीतल्या ब्राम्हण रेजिमेन्टमध्ये ध्यानचंद रुजू झाले.. त्यानंतर त्यांचं कुटुंब झाशीमध्य़ेच स्थायिक झालं. पैलवान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरूवातीच्या काळात हॉकीबद्दल फारसं आकर्षण नव्हतं.. पण सैन्यदलात रंगणाऱ्या हॉकीच्या सामन्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली. तत्कालिन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंगच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि याच हॉकी स्टिकनं पुढे ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवलं. काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या प्रकाशात हॉकीची प्रॅक्टिस करत. याच साधनेमुळं लोकं त्यांना ध्यानसिंगऐवजी ध्यानचंद नाव पडलं.

1926 साली भारतीय सैन्यदलाच्या हॉकी टीमचा पहिला विदेश दौरा ठरला. यासाठी खेळाडूंची शोधाशोध सुरू झाली. भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, अशी ध्यानचंद यांची मनोमन इच्छा होती. कमांडिंग ऑफिसरनं भारतीय संघात सामील होण्यासाठी ध्यानचंद यांना बोलावून घेतलं. कमांडिंग ऑफिसरनं दिलेल्या आदेशानं ध्यानचंद यांची स्वप्नपूर्ती झाली होती. वयाच्या 21 व्या वर्षी ध्यानचंद परदेश दौऱ्यावर निघाले होते.

Dhyanchand_2

1926 मध्ये मध्ये ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाचा हॉकी संघ न्यूझीलंडमध्ये जाणार होता. पहिलाच परदेश दौरा आणि संपूर्ण हॉकी विश्वाला चक्रावून सोडणारा अभूतपूर्व पराक्रम. 21 सामन्यांपैकी 18 सामन्यांत सैन्यदलाच्या संघानं विजय मिळवला.

संपूर्ण दौऱ्यात त्यांनी 192 गोल केले. त्यातले शंभरएक गोल फक्त ध्यानचंद यांच्या नावावर होते. या भीमपराक्रमानं अवघ्या क्रीडाविश्वाची नजर यांच्यावर पडली.

न्यूझीलंडवरून परत आलेल्या भारतीय हॉकी संघाच्या स्वागताला ढोल ताशांचा कडकडाट झाला. ध्यानचंद यांना शिपाईपदावरून थेट लान्स नायक पदावर बढती मिळाली आणि इथूनच ध्यानचंद यांच्या जादूई खेळाची सुरूवात झाली.

त्यानंतर 1928 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये आपल्याच घरात गुलाम राष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागेल असं ब्रिटनला कधी स्वप्नातही वाटलं नसेल.

ऑलिम्पिकच्या आधी फॉल्कस्टोन फेस्टिव्हलमध्ये भारतीय संघ आणि ब्रिटनचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतानं ब्रिटनला 11 सामन्यांमध्ये हरवलं. आपल्या गुलाम राष्ट्राकडून झालेला हा पराभव ब्रिटनच्या जिव्हारी लागला.

त्यानंतर ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भारतानं ऑस्ट्रियाला 6-0, बेल्जियमला 9-0, स्वित्झर्लँडला 6-0, डेनमार्कला 5-0 आणि नेदरलॅन्डला 3-0 हरवत हॉकीच्या पहिल्या सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं गेलं.
—-
Dhyanchand_3
——
1928 मध्ये सुवर्णपदक घेऊन आलेल्या भारतीय संघाला, विशेषतः हॉकीच्या जादुगाराला पाहण्यासाठी मुंबई डॉकयार्डवर हजारो लोकांनी गर्दी केली होती.. पेशावरपासून केरळपर्यंतच्या हजारो लोकांना फक्त ध्यानचंद यांना पाहायचं होतं. त्यादिवशी तब्बल 24 तास जहाजांची ये जा बंद होती. भारतात हे सगळं पहिल्यांदा घडत होतं.

आतापर्यंत ध्यानचंद हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. 1928 मध्येच ध्यानचंद यांची बदली आजच्या पाकिस्तानमधील, वजिरीस्तानमध्ये करण्यात आली. पहाडीप्रदेश असल्यानं तिथे हॉकी खेळणं जवळपास असंभव होतं. पण तरीही 1932 सालच्या ऑलिम्पिकसाठीच्या हॉकी संघात ध्यानचंद यांचं नाव अग्रभागी होतं. संघाचा सराव व्हावा यासाठी दोन सराव सामने खेळण्यासाठी भारतीय हॉकी संघ सिलोनमध्ये म्हणजे आताच्या श्रीलंकेत पाठवण्यात आला.

सिलोनमध्ये गेलेल्या भारतीय संघानं पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 20-0 आणि दुसऱ्या सामन्यात 10-0 अशी मात दिली. या तीस गोलमध्ये निम्म्यापैकी जास्त गोल एकट्या ध्यानचंद यांच्या नावावर होते. आता भारतीय हॉकी संघासमोर 1932च्या लॉस एन्जिलिस ऑलिम्पिकचं आव्हान होतं. तब्बल 17 दिवसांचा समुद्रातून प्रवास करत भारतीय संघ लॉस एन्जिलिसला पोहोचला.

ऑलिम्पिकमध्ये जपानला ११-१ अशी मात देऊन भारतानं अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम सामना ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेशी होणार होता. भारतानं २४ गोल करत अमेरिकेचा अक्षरशः धुव्वा उडवला. यात 8 गोल ध्यानचंद यांचे होते. त्या सामन्यात ध्यानचंद यांच्यापेक्षा जास्त गोल करणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा धाकटा बंधू रूपसिंग होता. रूप सिंगनं तब्बल १० गोल केले. रुपसिंग यांनी ध्यानचंद यांचा खेळापासून प्रभावित होऊन हॉकी खेळायला सुरूवात केली होती.

1932 साली भारतीय हॉकी संघानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं. आता ध्यानचंद प्रमाणेच, त्यांचे बंधू रुप सिंग यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोन सामन्यात भारतानं एकूण 35 गोल केले. त्यात रुप सिंग आणि ध्यानचंद या दोघांचे 25 गोल होते.

Dhyanchand_4
—-
1932 ते 1936 या चार वर्षात भारतीय हॉकी संघानं 37 सामने खेळले. त्यात 34 सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय हॉकी संघाचा आणि ध्यानचंद यांचा दबदबा तयार झाला होता.

ध्यानचंद असा खेळ करायचे की चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून राहायचा. हॉलंडमध्ये तर त्यात चुंबक असल्याची शंका उपस्थित करून हॉकी स्टिक तोडूनही बघितली.

ध्यानचंद यांचे क्रिकेटमहर्षी सर डॉन ब्रॅडमन हे सुद्धा फॅन बनले होते.

1935 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी क्रिकेटमहर्षी सर डॉन ब्रॅडमन हे स्वतः अॅमस्टरडॅममधला सामना बघण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी ब्रॅडमन ध्यानचंद यांचा खेळ पाहून प्रभावित झाले. या दौऱ्यात ध्यानचंद यांनी 48 सामन्यात 201 गोल केले. हे हॉकी प्लेयर चे गोल आहेत की क्रिकेटप्लेयरचे रन आहेत, अशा शब्दात आश्चर्य व्यक्त करत ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांचं कौतुक केलं.
—-
Dhyanchand_5

आणि आता अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं… 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिककडे. भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व स्वत: ध्यानचंद यांच्याकडे होतं. याच बर्लिनमध्ये ध्यानचंद यांनी असा इतिहास घडवला ज्यामुळे आपली मान अभिमानानं उंचावते.

जर्मनीतलं बर्लिन शहर एखाद्या नववधूसारखं सजलेलं. जगातला सर्वात मोठा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर स्वतः या ऑलिम्पिक सामन्यांवर नजर ठेऊन होता. अवघ्या जगाचं लक्ष बर्लिनकडे आणि बर्लिनचं लक्ष ध्यानचंद यांच्याकडे. कारण जर्मन प्रसारमाध्यमात फक्त ध्यानचंद यांच्याच नावाची चर्चा होती. हे पहिलं ऑलिम्पिक होती ज्यांचं चित्रिकरण करण्यात आलं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं जबरदस्त खेळ केला. हंगेरीला 4-0, अमेरिकेला 7-0, जपानला 9-0 आणि सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 10-0 ने मात दिली… आणि एकही गोल न खाता फायनलमध्ये धडक मारली.

Dhyanchand_6


`The Olympic complex now has a magic show too.’

`Visit the hockey stadium to watch the Indian magician Dhyan Chand in action.’

अशा हेडलाईन्स जर्मनीच्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या जात होत्या. अपेक्षेप्रमाणं जर्मनी फायनलमध्ये भारतीय संघाची वाटच पाहात होता. अंतिम सामना बघण्यासाठी खुद्द हिटलर उपस्थित होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दडपण जाणवत होतं. सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मॅनेजर पंकज गुप्ता यांनी सर्व खेळाडूंना ड्रेसिंगरुममध्ये बोलावलं.

आपल्या बॅगेतून त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाचा तिरंगा काढला. सर्वांना तिरंग्याची शपथ देत हिटलरचं दडपण घेऊ नका, निर्भेळ खेळ करा, असा सल्ला दिला. ज्या दिवशी हा अंतिम सामना होता, ती तारीख होती 15 ऑगस्ट 1936. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या बरोबर 11 वर्ष आधी, ध्यानचंद आणि त्यांच्या नेतृत्वातल्या टीमनं आपल्या मनात तिरंगा फडकवला.

अखेर भारतीय संघ ध्यान चंद यांच्या नेतृत्वात मैदानावर उतरला. काही मिनिटातच ध्यानचंद यांनी गोल करायला सुरूवात केली. जर्मनीची दाणादाण उडालेली पाहून हिटलरनं मैदानातून काढता पाय घेतला. भारतानं हा सामना 8-1 नं जिंकला. ध्यानचंद यांच्या जादुई खेळीमुळं भारतानं सुवर्णपदकाची हॅटट्रिक मारली.

पण खरी गंमत पुढे होती सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 16 ऑगस्टला बक्षीस वितरण होणार होतं आणि तेही खुद्द हिटलरच्या हस्ते. विजयानंतरच्या रात्री ध्यानचंद यांना झोप लागली नाही. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट छापलं जात होतं. हिटलर ध्यानचंद यांना भेटल्यावर काय बोलणार याची चर्चा सगळीकडे सुरू होती.
—-
Dhyanchand_7

अखेर तो दिवस आलाच…  गंभीर स्वभावाच्या हिटलरनं ध्यान चंद यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. वरून खालपर्यंत न्याहाळत असताना हिटलरची नजर ध्यान चंद यांच्या फाटलेल्या बुटातून बाहेर आलेल्या अंगठ्याकडे स्थिरावली.
“काय करतोस भारतात?” हिटलर नजर रोखून बोलला…
“सैन्यदलाच्या सेवेत आहे…” ध्यानचंद धडधडत्या छातीतून शब्द बाहेर काढत बोलले.
सैन्य म्हणताच हिटलरनं पुन्हा ध्यानचंद यांच्या पाठीवर थाप दिली.
“काय करतोस सैन्य दलात?” हिटलरनं पुन्हा प्रश्न केला.
“पंजाब रेजिमेन्टमध्ये लान्स नायक आहे…” ध्यानचंद उत्तरले.
“जर्मनीत ये.. जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यात कर्नलपद देतो तुला..” हिटलरनं ध्यानचंद यांना ऑफर दिली.
“नाही.. पंजाब रेजिमेन्टवर मला गर्व आहे.. आणि भारत भूमीचा मला अभिमान आहे..” असं बोलत ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर क्षणात धुडकावली.
“जशी तुझी इच्छा…..” असं म्हणत सुवर्णपदक ध्यानचंद यांना देत हिटलरनं पाठ वळवली आणि मैदानातून निघून गेला. ध्यानचंद यांच्या जिवात जीव आला.
हिटलरची ऑफर नाकारल्यानं ध्यानचंद यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ज्या हिटलरसमोर उभं राहण्याची हिम्मत कोणी करत नव्हतं. अशा वेळी त्याला नकार दिल्यानं ध्यानचंद यांचं कर्तृत्व उंचावलं होतं.


Dhyanchand_8

1937 साली ध्यानचंद यांना लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. त्यानंतर त्यांची बदली होत राहिली. 1937 – 1945 पर्यंत दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे याकाळात फारसे सामने होऊ शकले नाही. मात्र 1945 साली ध्यानचंद यांनी चाळीशी पूर्ण केल्याचं कारण देत, हॉकीतून सं न्यास घेण्याचं ठरवलं. मात्र देशप्रेमाखातर ते पुढही काही वर्ष खेळतंच राहिले.

लेफ्टनंटपदानंतर ध्यानचंद यांना कॅप्टन आणि शेवटी मेजरपद देण्यात आलं.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

यावर्षी भारतीय हॉकी फेडरेशननं एशियन स्पोर्ट्स असोसिएशनकडे { ईस्ट आफ्रिकेला} सामने खेळू द्यावेत अशी विनंती केली.  तेव्हा एशियन स्पोर्ट्स असोसिएशननं स्पष्ट शब्दात कळवलं की, ध्यानचंद खेळणार असतील तरच या. तेव्हा वयाच्या 42 व्या वर्षी ध्यानचंद यांनी संघाच्या खेळाडूंना एकत्र जोडलं. नोव्हेंबर 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या विभाजनाच्या आगीचा धूर निघत असताना ध्यानचंद यांनी आफ्रिकेत नेलेल्या संघात लाहोर, कराची, पेशावरचे खेळाडू होते. ध्यानचंद यांच्या प्रेमापोटी आणि कर्तृत्वासमोर द्वेषाच्या सीमारेषा गळून पडल्या.

आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आणि प्रथम दर्जा हॉकी सामन्यात 1000 पेक्षाही अधिक गोल करणाऱ्या ध्यानचंद यांना वयाच्या 51 व्या वर्षी 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ध्यानचंद यांचं चित्र असलेलं डाक तिकीटही सरकारनं छापलं. ऑस्ट्रियाच्या विएन्नामध्ये ध्यानचंद यांचा चारभुजाधारी पुतळा उभारण्यात आलाय ज्यात त्यांच्या चार हातात चार हॉकीस्टिक आहेत.

पण काळ बदलत गेला,. स्वातंत्र्यानंतर भारतानं हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला. मात्र भारतीयांच्या मनावर राज्य गाजवलं ते गोऱ्यांच्या क्रिकेटनंच. एक दोन नाही तर तब्बल तीन सुवर्ण पदकं मिळवून देणारे ध्यानचंद खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच भारतीयांच्या विस्मरणात गेले. हॉकीच्या मैदानावर भारताचा दबदबा कायम ठेवणाऱ्या या अवलियाला, आयुष्याच्या उत्तरार्धात खूप वेदना सहन कराव्या लागल्या.

3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ध्यानचंद यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार स्मशाणभूमीत न करता झांशीतल्या हॉकी मैदानावर करण्यात आले. ज्याठिकाणी ते तासंतास हॉकीचा सराव करायचे.

त्यांच्या पार्थिवावर दोन हॉकी स्टिक क्रॉस करून ठेवण्यात आल्या होत्या. मृत्यूपश्चातही या अवलियानं हॉकीस्टिक सोडलीच नाही.


Dhyanchand_9

काल परवापर्यंत ध्यान चंद यांना भारतरत्न द्यावं यासाठी चर्चा, वादविवाद झाले. पण सगळं हवेतंच विरलं. खरतंर हिमालयही खजील व्हावा एवढं उत्तुंग कर्तृत्व असलेल्या या महात्माला तुम्ही आपण काय भारतरत्न देणार. ध्यानचंद एका अढळ ताऱ्यासारखे आहेत. जोपर्यंत सूर्य आपलं कर्तव्य नियमानं बजावत राहिल, तोपर्यंत या ध्यानचंद्राची कीर्ती अशीच अबाधित राहिल. मग भलेही त्यांना कोणी भारतरत्न मानो वा ना मानो.

एक विचार करा.. आज एखादं कांस्यपदक किंवा रौप्यपदक मिळाल्यावर आपला उर अभिमानानं फुलतो. दिवसभर चर्चा रंगतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, टीव्ही, वृत्तपत्रांमधून देशप्रेम वाहू लागतं. ध्यानचंद यांच्या काळात हे सगळं असतं तर… तर काय त्यांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवा यासाठी चर्चा रंगल्या असत्या. मग या व्हर्चुअल जगात ध्यानचंद यांनी जन्म घेतला नाही यात त्यांची चूक झाली का? की आपण अजूनही कृतघ्न झालो आहोत.. विचार करण्याची गरजंय.

या खऱ्याखुऱ्या भारतरत्नाला सलाम

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

SONGS

चिठ्ठी ना कोइ संदेस जाने वो कौन सा देस
जहां तुम चले गए
इस दिल पे लगा के ठेंस जाने वो कौन सा देस
जहां तुम चले गए
एक आह भरी होगी, हम ने ना सूनी होगी
जाते जाते तुम ने आवाज तो दी होगी
हर वक्त यही हैं गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए
हर चीज पे अश्कों से लिखा हैं तुम्हारा नाम
ये रस्ते घर गालीयाँ, तुम्हें कर ना सके सलाम
हाय दिल में रह गयी बात जल्दी से छुडाकर हाथ कहा तुम चले गए
अब यादों के कांटे, इस दिल में चुभते हैं
ना दर्द ठाहरता हैं, ना आंसू रुकते हैं
तुम्हें ढूंढ रहा हैं प्यार, हम कैसे करे इकरार के हां तुम चले ग
गीतकार : आनंद बक्शी
संगीतकार : उत्तमसिंग
गायक : जगजितसिंग
चित्रपट : दुश्मन ( 1998 )



मेरे ख्वाबों में जो आये, आ के मुझे छेड जाये
उस से कहो कभी सामने तो आये
कैसा हैं, कौन हैं वो, जाने कहा हैं, जिस के लिये मेरे होठों पे हा हैं
अपना हैं या बेगाना हैं वो, सच हैं या कोई अफसाना हैं वो
देखे घूर घूर के, यू ही दूर दूर से, उस से कहो मेरी नींद ना चुराये
जादू सा जैसे कोई चलने लगा हैं, मैं क्या करू दिल मचलने लगा हैं
तेरा दीवाना हूँ कहता हैं वो, छूप छूप के फिर क्यो रहता हैं वो
कर बैठा भूल वो, ले आया फूल वो, उस से कहो जाये चांद ले के आये
गीतकार : आनंद बक्षी
गायक : लता मंगेशकर
संगीतकार : जतिन - ललित
चित्रपट : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995 )



ओ..मेरा दिल था अकेला, तूने खेल ऐसा खेला
तेरी याद मे जागूं रात भर
बाज़ीगर ओ बाज़ीगर, तू है बड़ा जादूगर
बाज़ीगर मैं बाज़ीगर, दिलवालों का मैं दिलबर
ओ दिल लेके दिल दिया है, सौदा प्यार का किया है
दिल की बाज़ी जीता दिल हार कर
बाज़ीगर ओ बाज़ीगर, तू है बड़ा जादूगर
चुपके से आँखों के रस्ते, तू मेरे दिल में समाया
चाहत का जादू जगा के मुझको दीवाना बनाया
पहली नज़र में बनी है, तू मेरे सपनों की रानी
याद रखेगी ये दुनिया, अपनी वफ़ा की कहानी
ओ मेरा चैन चुरा के, मेरी नींदें उड़ा के
खो न जाना किसी मोड़ पर
बाज़ीगर मैं बाज़ीगर...
धक धक धड़कता है ये दिल, बोलो ना क्या कह रहा है
पास आओ बता दूं, ना बाबा डर लग रहा है
मुझको गलत ना समझना, मैं नहीं बादल आवारा
दिल की दीवारों पे मैंने, नाम लिखा है तुम्हारा
ओ तेरे प्यार पे क़ुरबान, मेरा दिल मेरी जान
तुझे लग जाये मेरी उमर
बाज़ीगर ओ बाज़ीगर..
Movie : बाज़ीगर (1993)
Music By : अन्नू मलिक
Lyrics By : आरजू लखनवी
Performed By : अलका याग्निक, कुमार सानू



सूरज हुआ मद्धम चाँद जलने लगा
आसमां ये हाय क्यूँ पिघलने लगा
मैं ठहरा रहा ज़मीं चलने लगी
धड़का ये दिल साँस थमने लगी
ओ क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है
हो आ
सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा
आसमां ये हाय क्यूँ पिघलने लगा
मैं ठहरी रही ज़मीं चलने लगी
धड़का ये दिल साँस थमने लगी
हाँ क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है
है खूबसूरत ये पल सब कुछ रहा है बदल
सपने हकीकत में जो ढल रहे हैं
क्या सदियों से पुराना है रिश्ता ये हमारा
के जिस तरह तुम से हम मिल रहे हैं
यूँ ही रहे हरदम प्यार का मौसम
यूँ ही मिलो हम से तुम जनम जनम
हूँ हूँ मैं ठहरा रहा ज़मीं चलने लगी
धड़का ये दिल साँस थमने लगी
हा क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है
तेरे ही रंग से यूँ मैं तो रंगी हूँ सनम
पा के तुझे खुद से ही खो रही हूँ सनम
ओ माहिया वे
तेरे इश्क़ में हाँ डूब के पार मैं हो रही हूँ सनम
सागर हुआ प्यासा रात जगने लगी
शोलों के दिल में भी आग जलने लगी
मैं ठहरी रही ज़मीं चलने लगी
धड़का ये दिल साँस थमने लगी
हाँ क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है
सूरज हुआ मद्धम चाँद जलने लगा
आसमां ये हाय क्यूँ पिघलने लगा
सजना क्या ये मेरा पहला पहला प्यार है
गीतकार : समीर , अनिल पंड्या
संगीतकार : जतिन - ललित
संदेश संद्याल
आदेश श्रीवास्तव
गायक : सोनू निगम , अलका याग्निक
चित्रपट : कभी ख़ुशी कभी गम (२००१)



तुझे देखा तो ये जाना सनम
प्यार होता है दीवाना सनम
अब यहाँ से कहाँ जाएं हम
तेरी बाँहों में मर जाएं हम
ल ल ल ला ...
आँखें मेरी, सपने तेरे
दिल मेरा, यादें तेरी
हो मेरा है क्या, सब कुछ तेरा
जाँ तेरी, साँसें तेरी
मेरी आँखों में आँसू तेरे आ गए
मुस्कुराने लगे सारे ग़म
ये दिल कहीं, लगता नहीं
क्या कहूँ, मैं क्या करूँ
हाँ, तू सामने, बैठी रहे
मैं तुझे देखा करूँ
तू ने आवाज़ दी देख मैं आ गई
प्यार से है बड़ी क्या क़सम
आँखें मेरी, सपने तेरे
दिल मेरा, यादें तेरी
हो मेरा है क्या, सब कुछ तेरा
जाँ तेरी, साँसें तेरी
मेरी आँखों में आँसू तेरे आ गए
मुस्कुराने लगे सारे ग़म
ये दिल कहीं, लगता नहीं
क्या कहूँ, मैं क्या करूँ
हाँ, तू सामने, बैठी रहे
मैं तुझे देखा करूँ
तू ने आवाज़ दी देख मैं आ गई
प्यार से है बड़ी क्या क़सम
गीतकार : आनंद बक्षी
संगीतकार : जतिन - ललित
गायक : कुमार सानु , लता मंगेशकर
चित्रपट : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( १९९५ )



देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
गीतकार : जगदीश खेबुडकर
गायक : सुधीर फडके
संगीतकार : सुधीर फडके
चित्रपट : आम्ही जातो आमुच्या गावा



चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवुन रे
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गडया, नाचु उडु घालु फुगडया
खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघेजण
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
गीतकार : कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते )
गायक : लता मंगेशकर
संगीतकार : वसंत प्रभू



किसी नजर को तेरा इंतज़ार आज भी है
कहा हो तुम के ये दिल बेकरार आज भी है
वो वादियाँ, वो फज़ायें के हम मिले थे जहां
मेरी वफ़ा का वही पर मज़ार आज भी है
न जाने देख के क्यों उनको ये हुआ एहसास
के मेरे दिल पे उन्हें इख्तियार आज भी है
वो प्यार जिस के लिए हमने छोड़ दी दुनियाँ
वफ़ा की राह में घायल वो प्यार आज भी है
यकीन नहीं है मगर आज भी ये लगता है
मेरी तलाश में शायद बहार आज भी है
न पूछ कितने मोहब्बत के ज़ख़्म खाये हैं
के जिनको सोच के दिल सोगवार आज भी है
गीतकार : हसन कमाल
गायक : आशा - भूपेन्द्र
संगीतकार : बप्पी लाहिरी
चित्रपट : ऐतबार (१९८५)



होठों से छू लो तुम
मेरा गीत अमर कर दो
बन जाओ मीत मेरे
मेरी प्रीत अमर कर दो
ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन
जब प्यार करे कोई तो देखे केवल मन
नई रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो
आकाश का सूनापन मेरे तनहा मन में
पायल छनकाती तुम आ जाओ जीवन में
साँसे देकर अपनी संगीत अमर कर दो
जग ने छिना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा
सब जीता किये मुझसे, मैं हर दम ही हारा
तुम हार के दिल अपना, मेरी जीत अमर कर दो
गीतकार : इंदिवर
गायक : जगजीत सिंग,
संगीतकार : जगजीत सिंग
चित्रपट : प्रेम गीत (१९८१)



जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज
ना कोई है, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज
हो चांदनी जब तक रात, देता है हर कोई साथ
तुम मगर अंधेरो में ना छोड़ना मेरा हाथ
जब कोई बात बिगड़ जाये
वफादारी की वो रस्मे, निभायेंगे हम तुम कस्मे
एक भी सांस जिन्दगी की, जब तक हो अपने बस में
जब कोई बात बिगड़ जाये
दिल को मेरे हुआ यकीन, हम पहले भी मिले कही
सिलसिला ये सदियों का, कोई आज की बात नहीं
जब कोई बात बिगड़ जाये.
गीतकार : इंदिवर
गायक : साधना सरगम - कुमार सानू संगीतकार : राजेश रोशन, चित्रपट : जुर्म (१९९०)



ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे
मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार
तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार
जान पे भी खेलेंगे, तेरे लिये ले लेंगे, सब से दुश्मनी
लोगों को आते हैं, दो नज़र हम मगर, देखो दो नही
हो जुदा, या खफा, ऐ खुदा, हैं दुवां, ऐसा हो नही
खाना पीना साथ हैं, मरना जीना साथ हैं, सारी जिंदगी
गीतकार : आनंद बक्षी
गायक : किशोर कुमार - मन्ना डे संगीतकार : राहुलदेव बर्मन
चित्रपट : शोले (१९७५ )



बने चाहे दुश्मन जमाना हमारा
सलामत रहे दोस्ताना हमारा
वोह ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन
सवालों की रातें, जवाबों के दिन
कई साल हमने गुजारें यहाँ
यही साथ खेले, हुए हम जवाँ
था बचपन बड़ा आशिकाना हमारा
ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों
हमें दोस्ती की कसम दोस्तों
पता कोई पूछे तो कहते हैं हम
के एक दूजे के दिल में रहते हैं हम
नहीं और कोई ठिकाना हमारा
गीतकार : आनंद बक्षी
गायक : किशोर कुमार - मोहम्मद रफी
संगीतकार : लक्ष्मीकांत प्यारेलाल चित्रपट : दोस्ताना (१९८०)


चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
गीतकार : ना. धो. महानोर
गायक : लता - सुरेश वाडकर संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : सर्जा (१९८७)



मेरी किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता हूँ
मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ
आज समझी हूँ प्यार को शायद, आज मैं तुझ को प्यार करती हूँ
कल मेरा इंतजार था तुझ को, आज मैं इंतजार करती हूँ
सोचता हूँ के मेरी आँखों ने क्यो सजाये थे प्यार के सपने
तुझ से माँगी थी एक खुशी मैने, तू ने गम भी नहीं दिये अपने
जिंदगी बोझ बन गयी अब तो, अब तो जीता हूँ और ना मरता हूँ
मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ
अब ना टूटे ये प्यार के रिश्ते, अब ये रिश्ते संभालने होंगे
मेरी राहों से तुझ को कल की तरह, दुःख के काँटे निकालने होंगे
मिल ना जाये खुशी के रस्ते में, गम की परछाईयों से डरती हूँ
कल मेरा इंतजार था तुझ को, आज मैं इंतजार करती हूँ
दिल नहीं इख्तियार में मेरे, जान जायेगी प्यार में तेरे
तुझ से मिलने की आस है आ जा, मेरी दुनिया उदास है आ जा
प्यार शायद इसी को कहते है, हर घड़ी बेकरार रहता हूँ
रात दिन तेरी याद आती है, रात दिन इंतजार करती हूँ
गीतकार : आनंद बक्षी
गायक : लता - सुरेश वाडकर संगीतकार : लक्ष्मीकांत प्यारेलाल चित्रपट : प्रेम रोग (१९८२)



मेघा रे मेघा रे, मत परदेस जा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
कहाँ से तू आया, कहाँ जायेगा तू
के दिल की अगन से पिघल जायेगा तू
धुआं बन गयी है खयालों की महफ़िल
मेरे प्यार की जाने कहाँ होगी मंज़िल
मेघा रे मेघा रे, मेरे गम की तू दवा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
बरसने लगीं हैं बूँदें, तरसने लगा है मन
ज़रा कोई बिजली चमकी, लरजने लगा है मन
और ना डरा तू मुझको ओ काले काले घन
मेरे तन को छू रही है, प्रीत की पहली की पवन
मेघा रे मेघा रे, मेरी सुन ले तू सदा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
मन का मयूरा आज मगन हो रहा है
मुझे आज ये क्या सजन हो रहा है
उमंगों का सागर उमड़ने लगा है
बाबुल का आँगन बिछड़ने लगा है
न जाने कहाँ से हवा आ रही है
उड़ा के ये हमको लिये जा रही है
ये रुत भीगी भीगी भिगोने लगी है
के मीठे से नश्तर चुभोने लगी है
चलो और दुनिया बसायेंगे हम तुम
ये जन्मों का नाता निभायेंगे हम तुम
मेघा रे मेघा रे, दे तू हमको दुआ रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
गीतकार : संतोष आनंद
गायक : लता मंगेशकर - सुरेश वाडकर, संगीतकार : लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट : प्यासा सावन (१९८१)



और इस दिल में क्या रखा हैं
तेरा ही प्यार छुपा रखा हैं
चीर के देखे दिल मेरा तो
तेरा ही नाम लिखा रखा हैं
प्यार के अफ़साने सुने थे लोगों से
प्यार क्या होता हैं, ये तूने समझाया
मिला दिल तुझ से तो, ख्वाब देखे ऐसे
जुनून जाने कैसा, जवां दिल पे छाया
दिल में ऐसा दर्द उठा, दिल हो गया दीवाना
दीवानों ने इस दुनियाँ में, दर्द का नाम दवाँ रखा हैं
निगाहों में मेरी ये सूरत हैं तेरी
जिंदगी ये मेरी अमानत हैं तेरी
धड़कते सीने में मोहब्बत हैं तेरी
मोहब्बत ये तेरी, इबादत हैं मेरी
तेरे सिवा कुछ याद नहीं हैं, तू ही तू दिल में
दिल ने यार की पूजा की हैं , प्यार का नाम खुदा रखा हैं
गीतकार : प्रकाश मेहरा
गायक : आशा भोसले, सुरेश वाडकर
संगीतकार : कल्याणजी आनंदजी, चित्रपट : इमानदार (१९८७



ओ प्रिया, प्रिया, क्यों भूला दिया
बेवफ़ा या बेरहम, क्या कहू तुझे सनम
तूने दिल तोड़ा हैं, भूल क्या हुई ये बता जा
ओ पिया, पिया, मैं तेरी प्रिया
आसूओं को पी गयी, जाने कैसे जी गयी
क्या हैं मेरी मजबूरी, कैसे मैं बताऊँ हुआ क्या
तू बेवफ़ा हैं जो मैं जान जाता
तुझ से कभी भी दिल ना लगाता
मुझ पे यकीन कर यूँ ना इल्ज़ाम दे
दे कोई सज़ा मगर बेवफ़ा ना नाम दे
मेरी दिलरुबा, तूने की जफ़ा
पर तुझे भूलेगी ना मेरी वफ़ा
जी चाहता हैं, खुद को जला दूँ
मौत को अपने दिल से लगा लूँ
आ के ज़रा देख ले दिल मेरा चीर के
रंग मिलेंगे तुझे तेरी तस्वीर के
मेरे साथिया, तेरा हो भला
यही मेरे टूटे हुये, दिल की सदा
गीतकार : समीर
गायक : अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर
संगीतकार : आनंद - मिलींद
चित्रपट : दिल (१९९०)

               

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

दुरितांचे तिमिर जावो.....

जातिव्यवस्थेची आग जी हजारो वर्षं जळतेच आहे, ती अजूनही आपला सर्वांचा बळी घेतेय. कधी मुलगी दलित, बलात्कारी मराठा. किंवा कधी मुलगी मराठा, मुलं दलित. किंवा कधी सर्व जातीपातींची कोणतीही उलटसुलट रचना. पण सोसते आहे, ती स्त्री. ज्या दिवशी मनातून जातपात संपेल आणि स्त्री-पुरुष समता स्थापित होईल, त्या दिवशी संस्कृतीच जाळून टाकणारी ही आग विझून त्या जागी दुरितांचे तिमिर जाळून टाकणारी होळी पेटेल.
सतरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बातमी पसरली अन् भडका उडाला. गावभर. मग तालुकाभर. आणि मग राज्यभर.
चार मुलांनी ट्रकमध्ये घालून पळवून नेलं. मुलगी शाळेतून घरी परतताना. चल तुला घरी सोडतो म्हणून. मुलगी ओळखीची. मुलंही ओळखीची. शाळेत जा-ये करण्याची रोजची वाटही ओळखीची. म्हणून मुलगी ट्रकमध्ये बसली. पण ट्रकमध्ये त्या दिवशीची नेहमीची गाववाली 4 पोरं नव्हती, 4 सैतान, 4 राक्षस होते. जे पुरुषी अहंकारी मनांमध्ये कुठेतरी सतत खदखदत असतातच. जरा संधी सापडली की ते राक्षस थैमान करतात.
तसं घडलं. या पोरांनी ट्रक आडवाटेला नेला. पोरीवर आलटून पालटून दिवसभर पुन्हा पुन्हा बलात्कार केला. संध्याकाळी आणून घरी सोडलं. तोंड उघडशील तर मुडदा पाडू असं सांगून.
पोरगी सर्वस्वी विझलीच. विस्कटली, चोळामोळा झाली. नजर शून्यातून वर उठेना. घराबाहेर जायला घाबरायला लागली. आई-वडील विचारून विचारून दमले. 3 दिवसांनी मुलीचा लोंढा फुटला. धाय मोकलून रडत तिनं आईवडिलांना सगळा प्रकार सांगितला.
प्रकरणाला वाचा फुटली. उद्ध्वस्त झालेले आई-वडील तरी काय करणार. त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. बलात्कार करणारी पोरं परागंदा झाली. चौकशी चालू आहे, तपास चालू आहे... करत करत पुढे काही घडतच नव्हतं. त्यातनं सगळं पेटत गेलं. आधी गाव. मग तालुका. बघता बघता वणवा राज्यभर पसरला.
मुलगी दलित. बलात्कार करणारी पोरं मराठा.
इथे मुळात जातिव्यवस्थेचा वणवा हजारो वर्षं पेटलेला आहेच. त्यात बलात्काराचं भीषण तेल. सर्व राज्यात भडका उडालाच.
त्यातून तालुक्याच्या राजकारणात पक्ष एकच. पण एक पाटील गट, एक देशमुख गट. दोघांमधून विस्तव जायचा नाही. तूर्तास आमदार पाटील गटाचा. तर गाव देशमुखाचं होतं. प्रकार करणारी पोरं सुद्धा देशमुखाचीच होती. पाटीलदेशमुख वैर सर्व पातळ्यांवर व्यक्त होत होतं. गावागावातलं प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक... आता बलात्कार. पाटील गटाच्या हातात आयतंच कोलीत सापडलं. आमदारानं विधानसभा दणाणून सोडली.
सरकारी पातळीवरनं हुकूम सुटले. दलित पँथरची पोरं पार मुंबईहून तालुक्यात, गावात आली. पाठोपाठ गुप्त वार्ता विभागाकडून माहिती येत राहिली की गावात, तालुक्यात ट्रक भरभरून माणसं, तलवारी, चॉपर्स येतायत. सरकारी यंत्रणेनं राज्य राखीव पोलीस दल बोलावलं. गावात, तालुक्यात तैनात केलं. गावाचं लष्करी छावणीत रूपांतर झालं.
होळीचे दिवस होते. गावात, तालुक्यात पँथरचे पेटलेले सैनिकही जमा झालेले होते आणि प्रतिकारासाठी सशस्त्र विरुद्ध गटसुद्धा. जातीय तणावांनी उभ्या चिरफाळ्या उडालेल्या. गाव गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर.
तेव्हा उच्च पातळीला सरकारी बैठक झाली. सारा प्रकार माझ्या अधिकार क्षेत्रात घडत होता. बैठकीत चर्चा झाली, आता लष्कर बोलावण्याची. मी सौम्यपणे, नम्रपणे सांगितलं की हा प्रकार कायदा-सुव्यवस्थेचा नाही, आपणही तो कायदासुव्यवस्थेचा विषय म्हणून हाताळू नये. हा प्रकार जातींचाही नाही. राजकारणाचा तर त्याहूनही नाही. एका स्त्रीवर बलात्कार झाला, तो आपण कणखरपणे आणि संवेदनशीलतेनं हाताळूया. असं सगळं काही भाषण दिलं नाही. पण चर्चेतल्या माझ्या मुद्द्यांचा हा सारांश होता. काही वरिष्ठांना हा अ‍ॅप्रोच पसंत पडताना दिसत नव्हता. मुद्दा छान आहे पण त्याची ही वेळ नाही, आता प्रथम कायदा-सुव्यवस्था सांभाळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ते बरोबरच होतं. मला आपलं वाटत होतं की हा ‘सामाजिक न्याया’चा विषय आहे, या अंगानं हाताळला तर कायदा-सुव्यवस्था सुद्धा सुरळितपणे ताळ्यावर येईल, केवळ पोलिसी खाक्यानं हे होणार नाही.
शेवटी चर्चेअंती ठरलं की तुझं कार्यक्षेत्र - अधिकार क्षेत्र आहे, तुझ्या जबाबदारीवर काय ते कर. जिल्हा पोलीस अधीक्षक होते दत्ता पडसलगीकर - स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्याचा वारसा लाभलेले, शांत, संयमी, संवेदनशील. त्यांच्याशी बोलून एक दिशा ठरवली.
बैठकीतून सरकारनं - म्हणजे समाजानं - दिलेल्या गाडीतून थेट त्या मुलीच्या घरात. अठरा विश्व दारिद्र्य हे शब्दसुद्धा फिके पडतील अशा भयानक गरीबीतलं एक छोटं खोपटं. त्यात सुद्धा शेणानं लिंपून दोन भाग केलेले. त्या भिंतीपलिकडे ही 17 वर्षांची पार चोळामोळा झालेली पोर मुटकुळं होऊन पडून होती. गावाची दलित वस्ती अजूनही गावाबाहेर एका बाजूला होती.
तिच्याजवळ बसलो. तिच्याशी, तितक्याच भेदरलेल्या तिच्या आई-वडिलांशी बोलत राहिलो. कायदा तुझ्या बाजूनं आहे, आम्ही सुद्धा तुझ्या बाजूनं आहोत, तू नावं सांगितलीस तर निश्चितपणे कठोर कारवाई करूच... असं सगळं सांगितलं. तेही एकदम भाषण नाही. हळू हळू. तिच्याशी, आईवडिलांशी बोलत. मुलीनं नावं सांगितली.
एवढं होईपर्यंत गावभर पसरलेलंच होतं की अधिकारी स्वत: आलाय. त्या मुलीशी बोलून झाल्यावर मी वस्तीतल्या बुद्ध विहारात जाऊन बसलो. बुद्ध विहार म्हणजे काय, चार लोखंडी खांबांवर टाकलेलं गंजलेल्या पत्र्याचं छत. शोषण आणि दारिद्र्यामधून सुबक वास्तू उभी करण्याची साधनसंपत्ती कुठून येणार? त्या बुद्ध विहारात मांडी घालून बसलो, गावातल्या जाणत्या ज्येष्ठांना तिथे बोलावलं. सरकारी अधिकाऱ्यानं बोलावलं की जातपात सगळं बाजूला ठेवून जाणती माणसं येतात. त्यासाठी आधी त्या सरकारी अधिकाऱ्याच्या मनातून, जीवनातून, जातपात बाजूला झालेली असायला हवी.
बुद्ध विहारात गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींची बैठक घेतली. गुन्हेगार पोरं पोलिसांच्या ताब्यात सापडली पाहिजेत असं सांगितलं. पोरांना देशमुख मंडळींनीच लपवून ठेवलेलं होतं. त्यांना काळजी होती की आपल्या पोरांवर पोलीस ‘थर्ड डिग्री’ वापरतील. मी त्यांना शब्द दिला की कायदा यंत्रणेशी तुम्ही, त्या पोरांनी सहकार्य करा, तर यत्किंचितही ‘थर्ड डिग्री’चा वापर होणार नाही याची मी हमी घेतो. दलित आणि मराठा - दोन्ही बाजूंची वडीलधारी मंडळी पूर्वी मुंबईत गिरणी कामगार होते, युनियनमध्ये काम केलेलं होतं. बोलणी सामंजस्यानं झाली. देशमुख मंडळींनी गुन्हेगार पोरं पोलिसांच्या हवाली केली, कोर्टानं आवश्यक ती पोलीस कस्टडी मान्य केली. गावातून SRPF चा तळ उठवून थोडा लांब नेऊन ठेवला.
गावातली भडकलेली मनं जराशी जागेवर यायला लागली. लष्करी छावणी झालेलं गाव जरा माणसात यायला लागलं.
* * *
होळी दोन दिवसांवर होती.
गावात, तालुक्यात अजून मुंबईहून आलेले ‘पँथर्स’ होते. होळीच्या दिवशी गावात रामदास आठवले यायचे होते.
मी पँथरच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेतलं. त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर एक चेहराभर उतरत गेलेल्या तलवारीच्या घावाची रेष होती, पूर्वी केव्हा तरी मुंबईत झालेल्या कुठल्यातरी दंगलीतली निशाणी. उरलेला बाकीचा चेहरा हसरा. निश्चयी, की कुठलाच अन्याय आता आम्ही गप्प बसून ऐकून घेणार नाही. त्याला मी उचललेल्या पावलांची माहिती देऊन सांगितलं की एकदम आठवलेंना गावात जाण्यापूर्वी आधी मला भेटायचं आहे.
मग परत गावात गेलो. बुद्ध विहारातच गावाची परत बैठक घेतली, एकत्र. आत्तापर्यंत गावात होळीनिमित्त 2 वेगवेगळ्या मिरवणुका निघून 2 वेगवेगळ्या होळ्या पेटायच्या. एक गावभर, सवर्ण समाजाची. ती होळी गावातल्या मध्यवर्ती, वडाच्या पारासमोर पेटायची. त्याच वेळी दुसरी मिरवणूक दलित वस्तीत, होळी पेटायची बुद्ध विहाराशेजारी. मी गावाला सुचवलं, या वर्षी आणि खरंतर यापुढे कायमच, संपूर्ण गावाची एक मिरवणूक निघावी आणि गावाची मिळून एक होळी पेटावी. गावानं कल्पना मान्य केली.
होळीच्या दिवशी पँथरला गावात रामदास आठवलेंची सभा घ्यायची होती, तिला मी मान्यता दिली आणि कायद्यातले अधिकार आणि कलमं वापरून सांगितलं की सभा कोणत्याही परिस्थितीत सायंकाळी 6 वाजता संपली पाहिजे, न संपल्यास 6 वाजता सभा आहे त्या स्थितीत बंद केली जाईल, कारण गावाची होळीची मिरवणूक 6 वाजता सुरू होणार आहे.
सभेला जाण्यापूर्वी रामदास आठवले भेटावेत असं मी पँथरच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं. मला वायरलेसवर रामदास आठवलेंच्या वाटचालीचा अहवाल तासातासाला येतच होता. तालुका मुख्यालयातल्या लॉजवर ते पोचल्याचंही समजलं. पण ते भेटायला येण्याची काही लक्षणं दिसेनात. तेव्हा पँथरच्या पदाधिकाऱ्याला मी सांगितलं की मी येतो लॉजवर भेटायला. सभेला जाण्यापूर्वी, सरकारी यंत्रणेनं उचललेल्या पावलांबाबत त्यांना ‘ब्रीफिंग’ देणं आवश्यक आहे. लॉजवर पोचलो तर तिथून रामदास आठवले आधीच बाहेर पडलेले होते.
मग मात्र मी गाडी सुसाटवली ते थेट गावात, पँथरच्या सभा स्थानावर, व्यासपीठापासून लांब, पण समक्ष ‘मॅजिस्ट्रेट’ उपस्थित हवा, म्हणून छातीशी हात बांधून उभा राहिलो. सहा वाजता सभा न संपल्यास ती बंद करायला आवश्यक तो पोलीस बंदोबस्त होता. रामदास आठवले 5.55 ला सभास्थानावर पोचले. माईकच्या मागे असलेल्या वक्त्याकडून माईक काढून घेऊन, माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले -
सरकारी यंत्रणेनं योग्य पावलं उचलली आहेत, याविषयी मला सांगण्यात आलं आहे, आमच्यावर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे. आपणही शब्द दिलाय की सभा 6 वाजता संपवूच.’
असं सांगून, आठवले म्हणाले,
‘आम्ही दलित पँथर चळवळ सुरू केली तेव्हा दलितांनी दलितांसाठी चालवलेली दलितांची चळवळ अशी आमची भूमिका होती. पण काळाबरोबर आम्ही सुद्धा वाढलो आहोत. आता समताधिष्ठित भारतीय राष्ट्रविचार मानणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.’
ठीक 6 वाजता रामदास आठवलेंनी भाषण आणि सभा संपवली.
गावाची एकच मिरवणूक, ठीक 6 वाजता बुद्ध विहारावरून सुरू झाली.
आणि गावाची एकच होळी गावातल्या मध्यवर्ती वडाच्या पारापाशी पेटली,
दलित दांपत्याच्या हस्ते.
होळीमध्ये दुरितांचे तिमिर जळाले असावेत, त्या वर्षी तरी.
* * *
पुढे कायद्यानुसार सर्व चौकशी, तपास, जबाब, साक्षी-पुरावे गोळा करण्यात काही काळ गेला. आता तपास पूर्ण करून केस कोर्टात दाखल करणार, तेवढ्यात मुलीचे वडील मला भेटायला आले.
म्हणाले, मुलीचं लग्न ठरलंय. सासरकडच्यांनी समजावून घेतलंय. पण कोर्टकचेर्‍या, जबान्या चालू राहिल्या तर दोन्ही घरांची बेअब्रू होत राहणार. काही करता येईल का?
ही एक भयंकर मुस्कटबादी आहे. बलात्कार होतो मुलीवरच. बेअब्रू सुद्धा होते मुलीचीच. धैर्यानं सामोरं जात गुन्हेगारांना कायदेशीर मार्गानं अद्दल घडवायची म्हटली तरी शर्मनाक जबाब, उलटतपासणीला मुलीलाच सामोरं जावं लागतं. बलात्काऱ्यांची फारतर 7 वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका होते. मुलीसाठी सोसावी लागते आयुष्यभरासाठी ‘घोर नाकेबंदी’ - (नामदेव ढसाळांचे शब्द)
माझ्यासमोर धर्मसंकट.
मुलीचं आयुष्य मार्गी लागतंय.
पण बलात्काऱ्यांना जरब बसणारं शासन होणंही आवश्यक आहे.
पण म्हणून केसचे कायदेशीर सोपस्कार चालू ठेवावेत तर दोन्ही व्याही मंडळींची समाजात बेअब्रू होत राहणार, हेही खरंच.
काय करावं... चार्जशीट तयार होतं, पण खटला अजून ‘सेशन कमिट’ झालेला नव्हता. आम्ही न्यायालयासमोर सर्व कागदपत्रांसहित वस्तुस्थिती मांडली. न्यायालयानं गुन्हेगार पोरांचा आजीवन जातमुचलका (बाँड) लिहून घेतला, पोलीस ठाण्यावर हजेरी नेमून दिली.
मुलीचं लग्न लागलं. बहुधा एक आयुष्य मार्गी लागलं.
* * *
त्याला आज पाव शतकापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. पण जातिव्यवस्थेची आग जी हजारो वर्षं जळतेच आहे, ती अजूनही आपला सर्वांचा बळी घेतेय. कधी मुलगी दलित, बलात्कारी मराठा. किंवा कधी मुलगी मराठा, मुलं दलित. किंवा कधी सर्व जातीपातींची कोणतीही उलटसुलट रचना. पण सोसते आहे, ती स्त्री. ज्या दिवशी मनातून जातपात संपेल आणि स्त्री-पुरुष समता स्थापित होईल, त्या दिवशी संस्कृतीच जाळून टाकणारी ही आग विझून त्या जागी दुरितांचे तिमिर जाळून टाकणारी होळी पेटेल.
-- अविनाश धर्माधिकारी