Translate

बुधवार, ४ मार्च, २०१५

श्रीमंत भारतीय आणि त्यांची संपत्ती (फोर्ब्ज यादी)


भारतात पहिले श्रीमंत मार्च २०१५


रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनी श्रीमंत भारतीयांमध्ये पहिलं स्थान कायम राखलं आहे. फोर्ब्ज यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 21 अब्ज डॉलर असून जगभरातील श्रीमंताच्या यादीत ते 39व्या स्थानावर पोहोचले आहेत

भारतात दुसरे  श्रीमंत मार्च २०१५



सन फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप संघवी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 20 अब्ज डॉलर असून जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत संघवी 44 स्थानावर आहेत.

भारतात तिसरे  श्रीमंत मार्च २०१५


विप्रोचे संचालक अजीम प्रेमजी हे 19.1 अब्ज डॉलर संपत्तीसह भारतीय श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जगातील श्रीमंतांमध्ये त्यांचा क्रमांक 48वा आहे.

भारतात चौथे  श्रीमंत मार्च २०१५


शिव नादार भारताचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती 14.8 अब्ज डॉलर आहे. नादार जागभरातील श्रीमंतांच्या यादीत 66 व्या स्थानावर आहेत.

भारतात पाचवे  श्रीमंत मार्च २०१५


हिंदुजा बंधू : संपत्ती 14.5 अब्ज डॉलर, जगातील श्रीमंतांच्या यादीत 69 व्या क्रमांकावर

भारतात सहावे  श्रीमंत मार्च २०१५


जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी आर्सेलर मित्तलचे सीईओ लक्ष्मी मित्तन यांची संपत्ती 13.5 अब्ज डॉलर आहे. ते सहावे श्रीमंत भारतीय असून जगातील श्रीमंतांमध्ये ते 82 व्या स्थानावर आहेत.

भारतात सातवे श्रीमंत मार्च २०१५


आनंदा कृष्णन हे सातवे श्रीमंत भारतीय असून त्यांची संपत्ती 14.8 अब्ज डॉलर आहे. जगभरातील श्रीमंतांमध्ये त्यांचा क्रमांक 66 वा आहे.

भारतात  आठवे श्रीमंत मार्च २०१५


आदित्य बिर्ला समूहाचे संचालक कुमार मंगलम बिर्ला भारतीय उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचं नाव आहे.त्यांची संपत्ती 9 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 142 वा क्रमांक आहे.

भारतात नववे श्रीमंत मार्च २०१५



कोटक महिंद्रा बँकेचे उपसंचालक आणि व्यवस्थापक उदय कोटक यांची संपत्ती 7.2 अब्ज डॉलर असून जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 185वा क्रमांक आहे.

भारतात दहावे श्रीमंत मार्च २०१५

अदानी ग्रुपचे संचालक गौतम अदानी 6.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह श्रीमंत भारतीयांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. तर जगभरातील श्रीमंतांमध्ये त्यांचा क्रमांक 208वा लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा