नवी दिल्ली: 2014 वर्ष संपायला केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गूगलने 2014 साली सर्वात जास्त सर्च झालेल्या व्यक्तींची लिस्ट जाहीर केली आहे. गूगलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सनी लिऑनच्या नावाने सर्वात जास्त सर्च झाल्याचं पाहायला मिळत आहे. गूगलने विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या नावाच्या सर्चची यादी जाहीर केली आहे.
भारतातील गूगल सर्चमध्ये नरेंद्र मोदी यांना मागे टाकत सनी लिऑनने बाजी मारली आहे. 2014 मध्ये सनी लिऑनला सर्वात जास्त लोकांनी सर्च केले आहे. 2014 साली सनी लिऑन स्टारर ‘रागिणी एमएमएस-2’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटातील बेबी डॉल हे गाणं चांगलंच ट्रेंडिंगमध्ये राहिलं. यु ट्यूबवरही या गाण्याला सर्वात जास्त हिट मिळाल्या होत्या. याहू या सर्च इंजिनच्या टॉप टेनमध्येदेखील सनीला स्थान मिळालं आहे.
गूगलच्या सर्च इंजिनमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. 2014 साली भारतात लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत केवळ मोदी यांचीच छाप राहिली होती. निवडणुकांनंतरही ते इंटरनेटवर त्यांचा दबदबा कायम आहे. यामुळेच मोदींचं नाव गूगलवर जास्तीत जास्त सर्च झालं. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या पंतप्रधानांनी ट्विटर आणि फेसबूकवरही चांगलं रेकॉर्ड केलं आहे.
याशिवाय सर्वसाधारण सर्चमध्ये भारतीय रेल्वे बुकींगसाठी वापरण्यात येणारी आय़आरसीटीसी च्या वेब साईटला सर्वात जास्त हिट्स मिळाल्या आहेत. आयआरसीटीसीद्वारे रेल्वेचं बुकींग करणं तसंच रेल्वेचं वेळापत्रक आणि रेल्वे संबंधित गोष्टींची माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील यापेक्षाही या नावाला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे.
मोदींच्या खालोखाल नाव येतं ते बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान याचं. सलमान आपला चित्रपट किक आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमुळे गूगलवर चर्चेत राहिला. याशिवाय सलमानची लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नामुळेही तो चर्चेत राहिला. कटरीनाशी संपुष्टात आलेल्या संबंधामुळेही सलमान चर्चेत राहिला होता.
सलमान पाठोपाठ नंबर लागतो तो कटरीना कैफचा. कटरीना गूगल सर्चच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर राहिली. 2014 हे साल कटरीनासाठी खूपच चांगलं गेलं आहे, कारण कटरीनाचा बँगबँग हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सर्वात जास्त कलेक्शन मिळवण्यात टॉपवर राहिली आहे. कटरीना आपल्या लव लाईफमुळेही चर्चेत राहिली. माध्यमांमध्ये रणबीर कपूरसोबत तीचं नाव सतत्याने चर्चेत राहिलं. तसंच सलमानने आपली बहीण अर्पिताच्या लग्नात कैटला कटरीना कपूर नावाने हाक मारल्याने ती जास्त चर्चेत राहिली.
2014 मध्ये दिपीका पदुकोनही चांगलीच चर्चेत राहिली. दिपीकाचा हँप्पी न्यू इयर आणि फाइंडिंग फेनी या चित्रपटांना लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. याशिवाय दिपीका आणि रणवीर सिंहच्या रिलेशनच्या बातम्यांमुळेही ती चांगलीच चर्चेत राहिली. यासर्व घडामोडींमुळे ती पाचव्या स्थानावर राहिली.
याशिवाय क्रिकेटर विराट कोहलीदेखील टॉपटेनमध्ये स्थान मिळवलं आहे. विराट सर्चच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत असलेल्या संबंधाच्या बातमीमुळे तो कायम चर्चेत राहिला. काही दिवासांपूर्वी रोहित शर्माच्या सत्काराच्या कार्यक्रमावेळी मुंबईत आल्यावर त्याने आपल्या संबंधाचा खुलासा केल्याने तो आणखी चर्चेत आला होता.
याशिवाय गूगलच्या यादीत सहाव्या स्थानावर आलिया भट्ट, सातव्या स्थानावर प्रियंका चोप्रा, आठव्या स्थानावर शाहरूख खान, तसंच नवव्या स्थानावर पूनम पांडे आणि दहाव्या स्थानावर राहिलाय तो विराट कोहली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा