शरिरातील अतिरिक्त चरबी ही नेहमीच आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत असते. अनेक आजारांना आमंत्रण तसंच आपला लूक बिघडवणारी ही चरबी कमी करण्यासाठी अनेक जण बराच घाम गाळतात. पण, एका नव्या संशोधनानुसार तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या शरिरातील नको असलेली चरबी कमी करु शकतात. हो.. चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तासं-तास घाम गाळायची गरज नाही. तर केवळ सामान्य व्यायामाद्वारे जास्तीत जास्त श्वासोच्छवासामुळे देखील तुमच्या शरिरातील नको असलेली चरबी कमी होते.
नुकत्याच झालेल्या 'ब्रिटिश मेडिकल जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून हा 'चरबी कम'वाला फंडा समोर आला आहे. ऑस्ट्रेलियातील युनिवर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सच्या रूबेन मीरमान आणि अँड्र्यू ब्रॉउन यांनी हे संशोधन केलं आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार फुफ्फुस हे शरिरातील चरबीचे उत्सर्जक आहेत. त्यामुळं फुफ्फुसाच्या व्यायामानं आपण शरिरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी कमी करु शकतो.
आपल्य़ा आहारातील कार्बोहायड्रेड किंवा प्रोटीन्स हे ट्रायग्लिसराईडमध्ये बदलतात. ज्यात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे तीन प्रकारचे अंश असतात. तुमच्या शरिरात कार्बनच प्रमाण वाढलं की चरबी जमा होऊ लागते. संशोधनकर्त्यांच्या मते, तुमच्या शरिरातील नको असलेली चरबी दूर करण्यासाठी शरिरातील सेल्समधूव कार्बन निघणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला डॉक्टर गरजेचं तेवढंच, कमी खाण्याचा आणि जास्त फिरण्याचा सल्ला देतात.
त्यामुळं जर तुम्हाला अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास ट्रायग्लिसराईडच्या अणुंमधून हा कार्बन अंश कमी करण्याची गरज असते. आणि या प्रक्रियेला ऑक्सिकरण असं म्हटलं जातं. संशोधकांच्या मते आपल्या शरिरात जर, 10 किलोग्रम चरबी ही ऑक्सिकृत असेल, तर यातील 8.4 किलोग्रॅम चरबी ही श्वासोच्छवासाच्या माध्यमातून फुफ्फुसाद्वारे कार्बन डॉयक्साईडच्या रुपात बाहेर पडू शकते. तर उर्वरित 1.6 किलोग्रॅम चरबी ही द्रव रुपात रुपांतरीत होते.
संशोधकांच्या या विश्लेषणावरुन एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे चयापचय (मेटाबॉलिक) प्रक्रियेसाठी आपल्या शरिराला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन गरज भासते. त्यामुळं श्वासोच्छवासाच्या माध्यमातून आपण, जर आपल्या शरिरातील नको असलेली चरबी कमी करत शकत असू तर ही नक्कीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं लाभदायी अशीच बाब म्हणावी लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा