Translate

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

क्रिकेटचा देव - सचिन रमेश तेंडुलकर

44 वर्षांपूर्वी, 24 एप्रिल 1973 दुपारी 1 वाजता, मुंबईतील शिवाजी पार्क जवळील रानडे रोडवर असणाऱ्या निर्मल नर्सिंग होममध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म झाला होता. तेंडुलकरांच्या घरी 2.58 किलो वजनाच्या बाळाचं आगमन झालं होतं. हेच बाळ पुढे जाऊन त्याच्या अविश्वसनीय खेळाच्या जोरावर ‘क्रिकेटचा देव’ बनलं…
baby_sachin_tendulkar
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 44 वाढदिवस आहे. देशभरातूनच नव्हे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Bradman_Sachin
“मी त्याला टीव्हीवर खेळताना पाहिलं आणि त्याच्या टेक्निकचा चाहता बनलो. मी स्वत:ला खेळताना पाहू शकत नाही, पण असं वाटतंय हा खेळाडू अगदी तसाच खेळतो, जसं मी खेळत असे.”
52 कसोटींमध्ये 99.94 सरासरीने 6996 धावा ठोकणारे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचे हे शब्द कोणाबद्दल असतील तर ते फक्त क्रिकेटच्या देवाबाबतच.
सचिन रमेश तेंडुलकर…मास्टर ब्लास्टरने क्रिकेटला अलविदा करुन साडेतीन वर्ष झाली आहेत, पण मैदानात अजूनही सचिन…सचिन…चा आवाज घुमतो.
सचिनसोबत तुलना चुकीची
Virat_Sachin
कसोटी संघाचा नवा कर्णधार आणि भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून उदयास आलेल्या विराट कोहलीची तुलना सचिनसोबत कितीती केली, तरी अनेक गोष्टींमध्ये सचिन आणि कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.
सचिन केवळ पिचवरच बॅटिंग करत नसे, तर त्याचे काही ठेवणीतले शॉट प्रतिस्पर्धी संघाच्या मनाला आणि मेंदूलाही दुखापत करत असत.
त्या काळात सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाचा होता. तर सचिनने सर्वात शानदार कामगिरी कांगारुंविरोधातच केली.
कांगारुंविरोधात तुफानी खेळी
Sachin_Australia
कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सचिनने एकूण 100 शतकं ठोकली आहेत. त्यापैकी 20 ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. 11 कसोटी आणि 9 वन डेमध्ये एकूण 6707 धावा.
हा तो काळ होता, जेव्हा ऑस्ट्रेलियाशिवाय इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज आग ओकत असत.
कसोटीमध्ये यादोन्ही संघांविरोधात सचिन तेंडुलकरची 14 शतकं आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सरासरी 55 च्या पार आहे. तर इंग्लंडच्या विरुद्ध 51 पेक्षा जास्त सरासरी आहे.
पण कर्णधारपदाचं मुकुट पेलवलं नाही
sachin
वन डे क्रिकेटमध्येही त्याची बॅट देशापेक्षा परदेशात जास्त तळपली. एकदिवसीय सामन्यात त्याने भारतीय मैदानात 20 शतकं ठोकली तर देशाबाहेर 29 शतकं.
असं म्हणतात की, “सचिनचा जन्मच फलंदाजीसाठी झाला होता. ही बाब खरंच वाटते. कारण भारतीय संघाचं नेतृत्त्व मिळवण्यासाठी खेळाडू नाही नाही ते करतात, ते सचिनला मिळालं. पण कर्णधारपदाचं काटेरी मुकुट त्याला पेलवला नाही.”
25 कसोटी सामन्यात त्याने भारताचं नेतृत्त्व केलं. पण त्याच्या धावांची सरासरी कमी होऊन 51.35 एवढी झाली.
कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय त्याने 175 सामने खेळले, ज्यात त्याने 54.16 च्या सरासरीने 13,867 धावा ठोकल्या होत्या.
वन डेमध्येही हेच चित्र आहे. कर्णधार बनल्यावर 37.75 च्या सरासरीने 2454 धावा केल्या. पण संघातील केवळ एक फलंदाज म्हणून खेळताना त्याने 46.16 च्या सरासरीने 15972 धावा कुटल्या.
सचिनसारखा संयम आता कुठे?
Sachin_Out
ही गोष्ट फलंदाजीची आहे. मैदानावरील त्याच्या संयमाची, वागणुकीची आहे. तो क्रिकेटचा जेवढा आदर करत होता, की पंचांच्या चुकीच्या निर्णयावरही कोणतीही प्रतिक्रिया न देता पॅव्हेलियनमध्ये परतत असे. असं चित्र हल्ली फारच क्वचित दिसतं.
बाद झाल्यावर ना कधी राग, संताप. गोलंदाजाने कितीही भडकवलं तरी सचिन कधीच काही बोलला नाही. उत्तर दिलं ते त्याच्या बॅटने. त्याची बॅट कधी शांत राहिली नाही.
यामुळेच जगभरातील खेळाडू आणि मैदान त्याच्या सन्मानार्थ आजही झुकतात.
सचिनसारखा कोणी नाही!
sachin-rt-580x395
सचिनला कितीही नावं द्या, उपमा द्या, पण त्याच्यासारखा दुसरा कोणीही बनणार नाही. त्याची जागा कोणीही घेणार नाही. त्याचे काही विक्रम मोडतील तर काही वर्षानुवर्षे तसेच कायम राहतील. मात्र जे स्थान सचिनला मिळालं ते इतक कोणालाही मिळणार नाही, हे नक्की.
सर डॉन ब्रॅडमॅन यांना सचिनमध्ये ते स्वत: दिसले आणि भारताला आशा. मैदानात स्ट्रेट ड्राईव्ह असो वा मध्यमवर्गीय कुटुंबातील संघर्षाची कहाणी, दोन्हीच्या बाबतीत सचिनचं उदाहरण दिलं जातं.
क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीमुळे भारत आणि क्रिकेटचं नुकसान झालं. हो, मात्र फायदा कोणाचा झाला असेल तर जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा, कारण आता तो निवांत झोपू शकतो.

सचिन ‘रेकॉर्ड’ तेंडुलकर
Sachin Tendulkar
200 कसोटी सामन्यात 15,921 धावा. यासोबतच 51 कसोटी शतक, 68 अर्धशतक
13,492 विक्रमी कसोटी धावा, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी
463 वन डे सामान्यात 18,426 धावा. यात 49 शतक, 96 अर्धशतक
विश्वचषकात 2,278 धावा, एका विश्वचषकात (2003) 673 धावा
वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 3,077 धावा, श्रीलंकेविरोधात 3133 धावा
वन डेमध्ये 200 नंबरपर्यंत पोहोचणारा पहिला फलंदाज
62 वेळा सामनावीराचा मानकरी, हा पण एक विक्रम

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

समर्थ रामदासांनी स्थापन केलेले 11 मारुती

समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती
1) शहापूर
सातारा जिल्ह्यातील कराड-मसूर रस्त्यावर असलेल्या शहापूर या गावी समर्थ रामदासांनी पहिल्या मारुतीची स्थापना केली. शहापूरमधील मारुतीची स्थापना समर्थांनी शके 1566 मध्ये केली. हनुमानाची मूर्ती 6 फूट उंचीची आहे. हा मारुती शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
2) मसूर
सातारा जिल्ह्यातील शहापूरजवळच पुणे-मिरज मार्गावर मसूर गावी समर्थांनी दुसऱ्या मारुतीची स्थापना केली आहे. मसूरच्या हनुमानाची मूर्ती 5 फूटी असून ती पूर्णपणे चुन्यात बनवण्यात आली आहे. या मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये करण्यात आली आहे.
3)चाफळ
समर्थ रामदासांनी चाफळमध्ये 1569 मध्ये शिष्य आणि गावकऱ्यांच्या मदतीनं राममंदिराची स्थापना केली. या राममंदिरात शके 1570 मध्ये दास मारुती आणि प्रताप मारुतींची स्थापनाही समर्थांनी केली आहे. प्रतापमारुतीला भीममारुती किंवा वीरमारुती म्हणूनही ओळखलं जातं.
4)शिंगणवाडी
साताऱ्यातील चाफळजवळच शिंगणवाडी टेकडीवर समर्थांनी हनुमानाचं स्थापना केली. शके 1571 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली. हा मारुती खडीचा मारुती किंवा बालमारुती म्हणूनही ओळखला जातो. चाफळपासून अगदी जवळ असल्यानं चाफळमधील तिसरा मारुती म्हणूनच या मारुतीची ख्याती आहे.
5) उंब्रज
सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावी समर्थ रामदासांनी मारुतीची स्थापना केली. चाफळहून रोज स्नानासाठी उंब्रजला रामदास स्वामी जात असत. त्यामुळे त्यांनी उंब्रजमध्ये मारुतीची स्थापना केली असावी असा समज आहे. शके 1571 मध्येच उंब्रजच्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिराशेजारीच कृष्णा नदीचा काठ आहे. हा मारुती उंब्रजचा मारुती किंवा मठातील मारुती म्हणूनही ओळखला जातो.
6) माजगाव
माजगावच्या सीमेवर घोड्याच्या आकाराचा एक दगड होता. याला ग्रामस्थ ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजत असत. समर्थ रामदास माजगावला गेले असता ग्रामस्थांनी त्यांना या मारुतीची प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली. त्यानंतर शके 1571 मध्ये समर्थांनी या सातव्या मारुतीची स्थापना केली.
7) बहे-बोरगाव
साताऱ्यातील वाळवे तालुक्यात कृष्णा नदीकाठी बहे-बोरगावमध्ये शके 1573 मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली.   कृष्ण महात्म्यात या परिसराचा उल्लेख बाहुक्षेत्र असा आढळतो.
8) मनपाडळे
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा आणि पन्हाळगडजवळील मनपाडळे गावी समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. शके 1573 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. साडेपाच फूट उंचीची मूर्ती उत्तराभिमुख आहे.
9) पारगाव
कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर पारगावमध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. शके 1574 मध्ये मारुतीची स्थापना करण्यात आली. 11 मारुतींमध्ये उंचीनं सर्वात लहान मूर्ती असून तीची उंची दीड फूट आहे.
10) शिराळे
सांगलीतील सापांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावी समर्थांनी शके 1576 मध्ये मारुतीची स्थापना केली. 7 फूट उंच चुन्याची मूर्ती उत्तराभिमुख आहे. सुर्योदय आणि सुर्यास्ताला मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडतात.