ललितेतर
नाटके
तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहास नाटय़पूर्ण आहे.
जोतिबांनी २८ व्या वर्षी १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू
जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी
शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या नि:पक्षपाती धर्माच्या
आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर
आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात
दक्षिणा प्राइझ कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट
सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या
कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही
वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार
करून आपल्या स्वत:च्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. "
या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. ते प्रथम १९७९ मध्ये ‘
पुरोगामी सत्यशोधक’मधून
एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले.
प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या
संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर
तृतीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. प्रारंभी ‘त्रितीय’ असा
शब्द होता. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स.
१९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाटय़पूर्ण घटनाच
आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण
मराठी नाटय़लेखन १८५६ साली प्रथम झाले आणि ते गो. म. माडगावकर यांच्या
‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय
रत्न (तृतीय नेत्र) या १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी
नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.
आपली परिवर्तनवादीचळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन
पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ,
त्याची पत्नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठच
पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची
संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च
असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब
वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात
आहे.
नाटक म्हणून तृतीय रत्नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची
मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त
संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाटय़ किंवा
वगनाटय़ (वग म्हणजे ओघ. कथानक मधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.)
म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की,
घनदाट जंगल ही जशी लोकनाटय़ात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्नची आहे.
ठराविक नाटय़गृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही
नाटक सादर केलं जावं अशीच याची अत्यंत लवचिक रचना आहे. ‘पथनाटय़’
म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.
या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत
कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्न (किंवा त्रितीय
नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाटय़रचना सुरू केलेली आहे. पण
त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा
खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच
विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न जोतिबांनी केलेला आहे आणि तो
यशस्वीही झालेला आहे.
हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो
निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा
जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे
आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही
तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून
प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले (
अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० -
नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व
स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा
कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून
जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले
पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील
असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध
ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या
कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी
रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.